सप्त ग्रहांची कृपादृष्टी

भविष्य आपल्या हाती
सप्त ग्रहांची कृपादृष्टी

शंकर महादेवन यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी केरळच्या पलक्कड तमीळ कुटुंबात मुंबई येथे झाला. लहानपणीच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय आणि कर्नाटक संगीत शिकले आणि श्री ललिता वेंकटरामनच्या यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापासून विणा वादन शिकण्यास सुरूवात केली. महादेवन यांनी पंडित श्रीनिवास खळे यांच्याकडेही संगीताचे धडे घेतले. महादेवन मुंबई विद्यापीठाची संगणक विज्ञान आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी घेऊन ते 1981 साली पदवीधर झाले. त्यांनी काही दिवस सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

शंकर महादेवन भारतीय संगीत क्षेत्रातील संगीत व गायनाच्या क्षेत्रात एक नवीन ट्रेंड घेऊन जागतिक पातळीवर नेणार्‍या सध्याच्या भारतीय गायक-संगीतकारांपैकी एक मोठे नाव. संगीत क्षेत्रातला वारसा घेऊन आलेले महादेवन यांच्या संगीतात शास्त्रीय संगीताचा नवीन मिलाफ दिसतो. आयटीसीचे व्हिव्हल, हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट आणि शंकर महादेवन यांच्या भागीदारीत भारताची पहिली डिजिटल टॅलेंट हंट - मोबिसर सुरू केली आहे. हे अद्वितीय आणि इनोव्हेटिव्ह मोबाईल आणि इंटरनेट आधारित टॅलेंट हंट प्रत्येक भारतीयांना पुढील गायनातं त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत संगीतक्षेत्रात पुढे जाण्याची संधी देते.

शंकर महादेवन, ज्यांचे शंकर-अहसान-लॉय या त्रिकुटाने ‘सेनोरिटा’ आणि ‘कजरारे कजरारे’ सारख्या हिट गाण्यांची रचना केली. असे म्हणतात की त्यांच्या रचना या त्यांच्या आयुष्यासाठी एक गुरुकिल्ली आहेे. महादेवन व त्यांच्या सहकार्‍यांनी बर्‍याच नवीन संगीतातील रचना दिल्या आहेत. पुढे संगीत जगतात उद्योगातील त्या ट्रेंडीसेटर बनल्या आहेत. जेव्हा आपण संगीत तयार करतो तेव्हा आम्ही नेहमीच त्यात काही नाविण्य आणण्याचा प्रयत्न करतो, कधीकधी आम्ही आपल्या विद्यमान रचनांमधून पुन्हा शोध घेतो आणि यामुळे आम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळतो आणि हिट म्युझिक होते. यापूर्वी असे काहीतरी तयार करणे नेहमीच रोमांचक असते, असे महादेवन म्हणतात. या संगीतकार त्रिकुटाने त्यांच्या बॉलिवूडमध्ये मुकुल आनंदच्या ‘दस‘ या चित्रपटाने सुरुवात केली. त्यांच्या संगीताने रसिकांचे लक्ष वेधले गेले.

शंकर महादेवन यांच्या उजव्या हातावरची भाग्य रेषा

शंकर महादेवन यांच्या उजव्या हाताच्या फोटोकडे बघितले की सर्वात लांब रेषा असलेल्या भाग्य रेषेकडे लक्ष जाते. त्यांच्या हातावरची भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पावत असून ती सरळ शनी ग्रहावर जाऊन पोहोचली आहे. अशी भाग्य रेषा खूप दुर्मिळ आहे. लाखात एखाद्याच्या हातावर असते. ही भाग्य रेषा शंकर महादेवन यांना ऐश्वर्य देणारी आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना आर्थिक चणचण कधीही भासणार नाही.

शंकर महादेवन यांची मणिबंधापासून थेट मधल्या बोटाखाली मधोमध गेली आहे. हि अत्यंत भाग्यकारक रेषा आहे. सध्याच्या युगात आर्थिक सुबत्ता असली की, त्या व्यक्तीला आपल्या अंगभूत कलाकौशल्ये विकसित करण्यात कुठलीही अडचण येत नाही. कारण सध्याच्या काळात आपली नोकरी व्यवसाय सांभाळून जर उपजत कला कौशल्य विकसित करावयाचे असेल तर ते शक्य होत नाही. भाग्य रेषा शनि ग्रहाच्या सानिध्यात असता ती आवक उत्तम देते. सोबत आकृतीत शनी ग्रहाच्या सानिध्यात भाग्य रेषा दाखविली आहे. सामान्य व्यक्तीच्या हातांवर भाग्य रेषेचा उगम हा चंद्र ग्रहावरून होतो व भाग्य रेषा शनी ग्रहाच्या म्हणजे मधल्या बोटाच्या सानिध्यात आल्यानंतरच आर्थिक आवक सुरु होते. त्याची आकृतीही सोबत दिली आहे.

भाग्य रेषेबरोबरच महादेवन यांच्या हातावरील चंद्र ग्रह हा अत्यंत् शुभत्व घेऊन आलेला आहे. चंद्र ग्रहावर मस्तक रेषेचा एक स्वतंत्र फाटा तळहाताच्या मध्यापासून खाली चंद्र ग्रहावर उतरला आहे. ही मस्तक रेषा महादेवन यांना प्रतीभा प्रदान करीत आहे. हातावरील बाकी शुक्र, गुरु, शनी, रवि व बुध हे उत्तम उभार घेऊन आलेले आहेत. त्यामुळे सप्त ग्रहांची त्यांच्यावर मेहेर नजर आहे. रवी रेषा भाग्य रेषेतून उगम पावत असल्याने त्यांनी केलेलं प्रत्येक काम महादेवन यांना यश मिळवून देणारे आहे. शिवाय रवि रेषा भाग्य रेषेच्या साहाय्याने उगम पावलेली असून प्रत्येक यशात त्यांना आर्थिक लाभ मोठा आहे.

गुरु ग्रहावर मस्तक रेषेचा उगम स्वतंत्र होत असून तिच्यात आणि भाग्य रेषेतर अंतर आहे. अशी परिस्थिती असता किंवा मस्तक रेषेचा तळहातावर स्वतंत्र उगम होत असता असे लोक स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वत: ठरवतात. असे लोक व्यवस्थापनात अत्यंत हुशार असतात. कोणतेही नियोजन चोख असते व ते हुशार असतात.

हृदय रेषा थेट गुरु ग्रहाच्या मध्यावर थांबल्याने महादेवन यांच्यात गुरु तत्वाची शुभ फळे प्राप्त झाली आहेत. या हृदय रेषेमुळे महादेवन सुहृदयी, विश्वासू, सात्विक प्रेमभावना त्यांना लाभल्या आहेत. आयुष्य रेषा शुक्र ग्रहाला मोठा घेरा घातलेली आहे व ती थेट मणिबंधापर्यंत निर्दोष गेलेली आहे. अशी आयुष्य रेषा खणखणीत असता व्यक्ती उत्साही असतो काम करण्याची क्षमता जास्त राहून रोग मुक्त असतो.

आयुष्य रेषेच्याच शेजारी वयाच्या 27 वर्षापासून मंगळ रेषेचा उगम झाला आहे व ही मंगळ रेषा आयुष्य रेषेला वय वर्ष 65 पर्यंत साथ देत आहे. मंगळ रेषा व्यक्तीची कार्यक्षमता वाढवितो. अशा व्यक्ती सलग अठरा तास काम करू शकतात. त्यांना थकवा येत नाही. यांच्यात अधिकची ऊर्जा समाविष्ट असते. महादेवन यांच्या हातावरचा अंगठा मजबूत व मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या अंगी निर्धार व काहीतरी करून दाखवायची उर्मी असते. हातावरील अंगठा मोठा असता हे लोक आपले स्वतंत्र करियर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असतात.

अंगठ्याचे पहिले पेर हे स्वच्छ आहे त्यामुळे विचार करण्याची शक्ती अफाट आहे. स्वतःच्या विचारांच्या प्रक्रियेत नविन नवीन कल्पना सुचतात. त्याची अंमलबजावणी अंगठ्याचे दुसरे पेर पहिल्या पेर्‍यापेक्षा थोडे छोटे पण तेही स्वच्छ त त्यावर आडव्या तिडव्या रेषा नाहीत. त्यामुळे मनात आलेल्या कल्पनांची लगेचच अंमलबजावणी होते व संगीतातील एक नवा अविष्कार प्रत्यक्षात येतो.

अंगठ्यावर यव चिन्ह आहे, हे चिन्ह महादेवन यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्येला सामोरे जाऊ देत नाही. भाग्य रेषा जरी आर्थिक बाबींचे प्रतिनिधित्व करते. तरीही आयुष्यातील आर्थिक चढउतारात महादेवन यांना आर्थिक झळा सोसाव्या लागणार नाहीत. परमेश्वराने दिलेल्या अद्भुत जादुई आवाजाची देणगी शंकर महादेवन यांना लाभली आहे. त्यांच्या नसा नसात संगीत आहे. महादेवन यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी पूर्ण वेळ संगीतासाठी दिला व आज ते संगीताच्या जागतिक मंचावर एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त संगीत रचनाकार व गायक आहे. महादेवन यांनी डिजिटल मिडियाचा फार खुबीने उपयोग करून आंतरराष्ट्रीय मंचावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com