ठशे...करिअर अन् परिणाम !

भविष्य आपल्या हाती
ठशे...करिअर अन् परिणाम !

प्रफुुुल्ल कुलकर्णी

मागच्या लेखात आपण डीएमआयटीच्या बोटांवरील ठश्यासंबंधीच्या चाचणीचा परामर्श घेतला. आज आपण नऊ मुख्य ठश्यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ठश्यांची वैशिष्ट्ये एका ठश्यासाठी आहेत. कारण आपण पाहतो की दहाही बोटांवर ठसे असतात. ते एकसारखे नसून ते निरनिराळ्या बोटांवर वेगवेगळ्या संख्येने असतात. प्रत्येक व्यक्तीच्या हातावर सर्व ठसे पाहावयास मिळत नाहीत. परंतु ‘शंख’ आकाराचा ठसा सर्वत्र सापडतो. देशातील जनसंख्येचा विचार केला तर शंख ठसा हा पासष्ट टक्के जणांच्या हातांच्या बोटांवर आहे. या शंख ठश्यांचे वैशिष्ट्य पहिल्यानंतर तो इतक्या मोठ्या संख्येने बोटांवर का सापडतो, त्याची प्रचिती येईल.

1. शुक्ती - आडव्या रेषांचा ठसा

आडव्या रेषांचा ठसा मुलभूत प्रेरणा स्वतःसाठी व इतरांना, विशेषतः त्यांच्या कुटुंबासाठी संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. थोडक्यात या लोकांची प्रवृत्ती आधी स्वयंकेंद्रित व नंतर कुटुंबकेंद्रित असते. यांची समर्पणाची निष्ठा, वचनबद्धता आणि जबाबदारीची भावना दर्शविली जातात. सुरक्षेची त्यांची इच्छा इतरांसोबत एकनिष्ठ राहण्याची इच्छा म्हणून प्रकट होऊ शकते. मग ते कुटुंब, एक गट किंवा राष्ट्र म्हणून असू शकते. समर्थन आणि एकतेची तीव्र भावना यांच्यात असते. सुरक्षिततेची ही भावना व इच्छा एक विशिष्ट सावधगिरी आणि राखीव स्वकेंद्रित असते. आडव्या रेषांचा शुक्ती ठसा हा बदलांना सामोरे जाण्यास अनिच्छुक असू शकतो. नवीन कल्पना आणि अनपेक्षित परिस्थितींना प्रतिसाद देण्यास आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यात त्यांना अडचण येऊ शकते. बदलाचा हा प्रतिकार किंवा जीवनातही कोणताही बदल स्वतःच्या आडमुठेपणा आणि अगदी हट्टीपणा म्हणून प्रकट होऊ शकतो. आडव्या रेषांचा ठसा स्वतःला सिद्ध होईपर्यंत नैसर्गिकरित्या कोणत्याही गोष्टीबद्दल अथवा जेथे संभ्रम आहे, संशय आहे तो स्वीकारीत नाही.

स्वअभिव्यक्तीच्यादृष्टीने, आडव्या रेषांचा ठसा बहुतेक वेळा स्वत: नवीन गोष्टीचे दडपण घेणारा असतो. थोडक्यात नवीन समस्यांना सामोरे जाताना हे स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वअभिव्यक्त व यांचा स्वभाव राखीव असतो. यांना बोलण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे एकतर बोलण्यात मंदपणा येऊ शकतो किंवा बोलण्याचा संकोच किंवा तोतरेपणा येऊ शकतो. या व्यक्तींना विचार करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे आवडते.

आडव्या रेषांची शुक्ती किंवा रेषांनी साधी कमान केलेली असेल तर थोडीशी गोलाई घेतलेली कमान व्यावहारिकता देते. त्यांना व्यावहारिक किंवा विक्रीयोग्य कौशल्ये आत्मसात करायला आवडतात ज्याद्वारे ते स्वतःला समाजासाठी उपयुक्त बनवू शकतात आणि त्याद्वारे त्यांना स्वतःसाठीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेला रोजगार मिळवता येतो. साध्या कमानी असलेल्या लोकांकडे बर्‍याचदा कुशलता किंवा ते जन्मजात कारागीर असतात. यांच्यात वस्तू बनवण्याची किंवा दुरुस्त करण्याची जन्मजात क्षमता असते. ज्यामुळे ते स्थिर, सातत्यपूर्ण आणि उपयुक्त कामगार बनतात.

2. शुक्ती - तंबूसारख्या आकाराचे ठसे

तंबूसारख्या आकाराचे शुक्तीचे ठसे शोधणे तुलनेने दुर्मिळ आहे. त्यापेक्षा अनेक साध्या आडव्या रेषा असणारा शुक्ती ठसा सर्वत्र पाहावयास मिळतो. परंतु कमानी किंवा तंबूसारख्या असलेल्या रेषांचा ठसा व त्यांची वैशिष्ठ्ये म्हणजे हे लोक बंडखोर प्रवृत्तीचे असतात. आज्ञापालन करीत नाहीत. स्वतःच्या मनाला येईल, तेच उद्योग करतात. तंबूसारख्या कमानदार रेषा असता हे लोक हट्टी आणि उघडपणे विरोधक असू शकतात. तंबूच्या आकाराच्या रेषेची कमान जितकी प्रबळ आहे तितकीच ती व्यक्ती अपारंपरिक आहे, तितकीच ती असामान्य आहे. यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ते काम पूर्ण नेण्यास किंवा तडीस लावण्यात हे समर्थ असतात.

शुक्ती-तंबूसारख्या आकाराच्या कमानदार रेषा असल्यामुळे या छापांचा मध्यबिंदू शोधण्यात व रेषा मोजण्यात अडचण येते. डीएमआयटी चाचणीत तर ठशांचा मध्यबिंदू व रेषा मोजणे अनिवार्य आहे. शुक्ती ठश्यांचे आकार दोनही हातावर चार ते सहा संख्येने बोटांवर असता डीएमआयटी चाचणीत अचूकता येत नाही. व्यक्तीचे कौशल्याचे मूल्यांकन चुकीचे येण्याचा संभव असतो.

बोटांवरील दहा ठश्यांपैकी 4 ते 6 या संख्येने आडव्या आकाराच्या अथवा कमानदार रेषा असलेले शुक्ती ठसे असल्यास त्या विद्यर्थ्यांचे अंगभूत कलाकौशल्य ओळखण्यात निश्चितच अडथळे येतात. हस्तसामुद्रिक तज्ज्ञाला या शुक्ती प्रकारच्या ठश्यांचे कारकत्व सांगताना अडचण येत नाही. कारण शुक्ती ठसा कुठल्या ग्रहाच्या बोटावर आहे त्याप्रमाणे त्या ठश्याला त्या ग्रहाचे गुणधर्म असतात.

3. शंख ठसा (लूप पॅटर्न) करंगळीकडे रेषांचा ओघ

हा बोटांवर आढळणारा एकमेव सर्वात सामान्य पॅटर्न आहे. म्हणून असा निष्कर्ष काढू शकतो की लूप पॅटर्न एक पारंपरिक, सामान्य प्रकारची व्यक्ती दर्शवते. मोठ्या संख्येने दहाही बोटांवर शंख ठसा असल्यास हे लोक समूहात राहणे पसंत करतात. ते सामाजिकदृष्ट्या इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न करतात. शंख ठसा लवचिकता आणि अनुकूलता देते. म्हणूनच हे असे लोक चांगले संबंध ठेऊन असतात.

शंख ठसा असणारे लोक सर्व गोष्टींसाठी अत्यंत प्रतिसाद देतात. नवीन कल्पना व बदलत्या परिस्थिती, वातावरणात स्वतःला स्थापित करतात. मानसिकदृष्ट्या शंख ठसा बहु आयामी आणि गोष्टी आत्मसात करणारे असतात, त्यांचा कल्पना विस्तार मोठा असू शकतो. शंख ठश्यांच्या शेपटाचा ओघ हा करंगळीकडे जाणार हवा. या ठश्यात सामान्य गुणधर्म समाविष्ठ असतात. परंतु शंख ठश्यांचा ओघ जर अंगठ्याकडे जाणारा असेल तर असामान्य गुणधर्म या व्यक्तीमध्ये पाहावयास मिळतात. अर्थात तो कोणत्या ग्रहाच्या बोटावर आहे, त्याप्रमाणे त्याचे अंगभूत गुण समाविष्ट असतात.

4. शंख ठसा

शंख ठश्यांचा ओघ अंगठ्याकडे या ठश्याबाबत आपण त्याच्या स्वतंत्र आकृतीसोबत त्याचे गुणधर्म पुढच्या लेखात स्वतंत्रपणे पाहणार आहोत. हे मात्र नक्की कि शंख ठश्याचे शेपूट किंवा ओघ हा अंगठ्याकडे जात असेल तर तो विरुद्ध बाजूला जातो. मग तो चार बोटांपैकी कुठल्याही बोटांवर असू शकतो. असामान्य गुणधर्म या व्यक्तीमध्ये पाहावयास मिळतात.

5. चक्राचा ठसा - गोल गोल रेषांचा

चक्राचा ठसा बोटांवर असलेले लोक अत्यंत स्वयंभू आणि प्रभावी व्यक्ती असतात. ते स्वतंत्र, प्रेमळ, स्व-प्रेरित आणि अत्यंत प्रतिभावान असतात. चक्र ठसा असलेल्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वात जास्त जागरूक असतात. बहुतेकदा ते खूप व्यक्तिवादी असतात. ते इतरांद्वारे प्रभावित होण्यास विरोध करतात किंवा त्यांचे तत्वज्ञान त्यांना पटत नाही. चक्र ठसा असणारे लोक इतरांच्या हस्तक्षेप सहन करीत त्यास त्यांची तीव्र नापसंती असते. या लोकांना प्रतिबंधित केल्यास किंवा त्यांचे म्हणणे खोडून काढल्यास ते बंड करतात.

त्यांना वैयक्तिक स्वायत्ततेची तीव्र गरज वाटते. त्यांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण, इतर सर्वांपेक्षा स्वतंत्र राहण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे गर्दीतील अनेक व्यक्तीपेक्षा स्वतःची स्वतंत्र ओळख बनण्याकडे त्यांचा कल असतो. थोडक्यात हातावरच्या बोटांवर 5 ते सहा चक्र असतील तर व्यक्ती अत्यंत विद्वान असते.

6. चक्र ठसा स्प्रिंगसारख्या आकाराचा

या ठश्यात गोल गोल रेषांच्या आकारांनी बनलेल्या चक्र ठश्याप्रमाणे अत्यंत प्रतिभावान गुणधर्म समाविष्ठ असतात. परंतु हे लोक समाजात मिसळत नाही. यांना मित्र कमी असतात. हे लोक कोणाचे ऐकत नाही.आपल्या हुशारी व तत्त्वज्ञानाला चिकटून असतात. त्याचे समर्थन करतात. हे लोक हुशार असले, प्रतिभावंत असले तरी त्यांची प्रतिभेचे व्यावहारिकरण त्यांना जमत नाही. थोडक्यात त्यांच्या प्रतिभेचा वापर पैसे कमावण्यासाठी किंवा व्यापार करण्यात यांना अडचण येते. बोटांवर चार संख्येच्या पूढे चक्र चिन्ह असेल तर त्यांचा विचारशील आणि विश्लेषणात्मक स्वभाव असतो. त्यांचे स्वतःचे मत असते व ते त्यावर ठाम असतात. चक्र ठसा असता बॉस बनणे आवडते आणि म्हणून ते अशा कामाकडे आकर्षित होतात. ज्यामध्ये स्वयं-रोजगार किंवा कामाचा समावेश असतो, स्वतःचे नियंत्रण असते. बोटांवर स्वतःला नेहमी केंद्रस्थानी ठेवतात. चक्र ठश्यांचे लोक एकाकी किंवा स्वत:मध्ये मश्गुल दिसून येतात. त्यांच्याकडे काही अद्वितीय आणि जन्मजात प्रतिभा देखील असते. ज्याद्वारे त्यांचे वेगळेपण दिसून येते.

7 चक्र - लंबकार गोलाई

चक्र ठश्याचे सर्व गुण अवगुण या ठश्यात लंबकार गोलाईच्या ठश्यात आहेत. हा चक्र ठसा दोनही बाजूने दाबला गेल्याने तो लंबकार होतो. लंबकार गोलाईचा चक्र ठसा हा त्या व्यक्तीत विद्वत्ता असूनही ती प्रदर्शित करण्यात यांना अडचणी येतात. आपला मुद्दा मांडू शकत नाहीत. त्यांचेकडे हुशारी असते. परंतु एक अनामिक दडपण कायम त्यांचेवर असते. त्यामुळे लंबकार चक्र असणार्‍या व्यक्ती आपल्या कार्यात मागे राहतात.

8. मोरपिसासारखा ठसा

मोराच्या पिसासारख्या ठश्यात केंद्रस्थानी चक्र आहे. त्यामुळे चक्र ठश्याचे गुण व अवगुण समाविष्ठ आहेत. परंतु मोराच्या पिसाप्रमाणे त्याला कमी होत जाणारे रेषा ह्या शंख छापासारख्या असल्याने शंख छापाचे हुशारीचे गुणधर्म या ठश्यात येतात. मोराच्या पिसाचा बारकाईने अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते कि त्यात दिखाऊपणा जास्त आहे. मोराच्या पिसाचा ठसा हा तिसर्‍या बोटांवर म्हणजेच रवीच्या बोटांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रवीचे गुणधर्म म्हणजे मान, सन्मान, प्रसिद्धी कीर्ती, कला हे असल्यामुळे रवीच्या बोटांवर हा ठसा असल्यास दिखाऊपणा जास्त असतो. मोराच्या पिसाचा ठसा असल्यास नेतृत्व करणे आवडते. लोकांना आकर्षित करण्याची त्यांच्यात हातोटी असते. हातावरील कोणत्या ग्रहाखाली हा ठसा आहे, त्यावर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अवलंबून असते.

9. दोन शंख विरुद्ध दिशेने एकत्र (डबल लूप)

या ठश्यात दोन दिशांना जाणारे दोन शंख आहेत. दुहेरी शंख हे विचारांच्या प्रगटीकरणाचे, जे बहुतेक वेळा आंतरिक संघर्ष, गोंधळ आणि आत्मविश्वास गमावतात. त्यांचे मन द्विधा असते. या ठश्यात विचारांच्या प्रगटीकरणात व्यक्तीला सर्वात जास्त गोंधळ आणि संघर्षाचा अनुभव येतो. त्यांना वारंवार पश्चात्ताप होतो आणि त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याव्यतिरिक्त त्यांनी काहीतरी दुसरे केले असते तर बरे झाले असते असे त्यांना कायम वाटते.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com