Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधयाद आ रहा है तेरा प्यार!

याद आ रहा है तेरा प्यार!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

बप्पीदांना लाभला कौटुंबिक संगीताचा वारसा

आलोकेश अपरेश लाहिरी (बप्पीदा) (Bappida) यांचा जन्म कोलकाता येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात 27 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. त्याचे आई-वडील, अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी, दोघेही बंगाली गायक आणि शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते. ते पूर्व बंगाल (आता बांगलादेश) सिराजगंज येथील लाहिरी मोहन कुटुंबातील होते. त्याचे आई-वडील दोघेही गायक होते. ऑल इंडिया रेडिओसाठी सादरीकरण करत. बप्पीदा त्यांचा एकुलता एक मुलगा. तर किशोरकुमार (Kishore Kumar) हे त्यांचे मामा.

- Advertisement -

बप्पीदा (Bappida) यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षी तबला वाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना त्यांच्या पालकांनी प्रशिक्षण दिले. बप्पी यांनी लहानपणी तबला वाजविण्याची प्रतिभा दाखवली आणि लता मंगेशकर यांच्या सल्ल्यानुसार समता प्रसाद यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. ते वयाच्या 19 वर्षी मुंबईत आले. त्यांना दादू (1974) या बंगाली चित्रपटात पहिली संधी मिळाली व त्या गाण्याच्या पोर्शगायिका होत्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) . बप्पीदा (Bappida) लोकप्रिय डिस्को-इलेक्ट्रॉनिक संगीताचे प्रणेते मानले जात. या व्यतिरिक्त त्यांना सोन्याच्या साखळ्या, सोनेरी अलंकार, मखमली पेहेराव आणि काळा चष्मा भलताच आवडे. ही त्यांची खास ओळख होती.

1986 मध्ये त्यांनी एका वर्षात 33 चित्रपटांसाठी 180 हून अधिक गाणी रेकॉर्ड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम केला. मानवाच्या अंगी विविध कला कौशल्य उपजत असतात, काही मूर्तिकार, चित्रकार, वास्तू रचनाकार, गणित, अनेक शास्त्रामधील प्रतिभा काही व्यक्तींना बहाल असते. या उपजत कलाकौशल्यात काही लोक सर्वोत्तम असूनसुद्धा त्यांचे नशीब त्यांना मोठे होण्यास मदत करीत नाही. म्हणून उपजत कला कौशल्याची परमेेशराची देणगी असूनही ते लोक सामान्य राहतात. ते प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचत नाहीत. कलेच्या जोरावर श्रीमंतीही त्यांच्या वाट्याला येत नाही. ज्यांच्याकडेस कलकौशल्याची देणगी आहे, ते सर्वच महान कलाकार होत नाहीत किंवा दैदिप्यमान यश प्राप्त करू शकत नाहीत.

थोडक्यात व्यक्तीच्या अंगी कितीही प्रतिभा असली तरी ते बाजारमूल्यात परावर्तीत होत नाही. त्यांची प्रतिभा सव दूर जनतेपर्यंत पोहोचत नाही. प्रतिभावान असलेले लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना किंवा मित्रांना ज्ञात असतात. प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा सर्वदूर पोहोचण्याचा एक विशिष्ठ काळ असतो. थोडक्यात त्या व्यक्तीचा चमकण्याचा काळ हा काही वर्षांपर्यंत मर्यादित असतो. त्या काळात भाग्योदय असतो. भाग्योदयाचा काळ संपला की, कितीही मोठा प्रतिभावान व्यक्ती असो त्याची चलती संपलेली असते. हा भाग्योदयाचा काळ 12 वर्षे ते 30 वर्षापर्यंत व्यक्तीच्या भाग्यानुसार असू शकतो. ज्यांच्या नशिबात भाग्योदय नाही, ते प्रतिभावान असले तरी त्यांच्या पदरी निराशा येते.

ते पुढे जाऊ शकत नाहीत. स्व. लता मंगेशकर यांचा असामान्य प्रसिद्धीचा काळ हा साठ वर्षावून अधिक होता. परंतु बॉलिवूडमधील संगतीकर किंवा त्यांच्या जोड्या दोन दशकापेक्षा अधिक काळ प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या नाही. अर्थात यात काही अपवादही असतातच. मोठे यश प्राप्त होण्यासाठी नशिबाची साथ लागते. त्यात रवी ग्रह व रवी रेषा, भाग्य रेषा, गुरु, मंगळ व बुध ग्रह यांचे शुभत्व लाभलेले असावे लागते. त्याशिवाय प्रतिभा असली तरी त्या प्रतिभेचे सोने होत नाही.

व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रातील प्रतिभा असता हस्तसामुद्रिकदृष्ट्या त्या व्यक्तीच्या हातावरील चंद्र ग्रह बलवान असतो. मग ती प्रतिभा सलीम-जावेद यांच्यासारख्या लेखकाची असो अथवा रोहित शेट्टी यांच्यातील दिग्दर्शनाची. सर्व प्रतिभांचा कारक शुभदायी चंद्र ग्रह असतो. हातावरील चंद्र ग्रहाबरोबरच मस्तक रेषेचे योग दान खूप मोठे असते. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरल्यावर व्यक्तीची वारसा म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिभेला झळाळी येते. मस्तक रेषेची हुशारी किंवा विद्वता यांचा लाभ होतो. मस्तक रेषा व चंद्र ग्रह दोघेही बलवान असता त्या व्यतीच्या अंगी असलेली प्रतिभा द्विगुणित करतात. त्या प्रतिभेला लकाकी येते.

हातावरील चंद्र ग्रहाचे स्थान – बप्पीदा यांच्या हातावरील चंद्र ग्रहाचे स्थान अत्यंत वैशिष्ठयपूर्ण आहे. हातावरील करंगळीपासून सलग हाताच्या डाव्या बाजूवरील कडेस स्वतंत्र एकसंघ दिसणारी हाडाची रचना आहे. ते स्पष्टपणे करंगळीपासून मनगटापर्यंत अखंड आहे. हा अखंड हाडाच्या भागावर स्वतंत्रपणे चंद्र ग्रहाचा उभार हाताच्या कडेला व हाताच्या मध्य भागापर्यंत विकसित आहे. अशी चंद्र ग्रहाची वैशिष्ट्यपूर्ण रचना लाखात एखाद्याला असते व या प्रकारच्या चंद्र ग्रहाची रचना सलीम -जावेद लेखकांपैकी जावेद यांच्या हातावर स्पष्टपणे आहे. म्हणजेच चंद्र ग्रहाचा स्वतंत्र उभार हा प्रतिभा प्रदान करीत असतो. बप्पी दा यांचे हातावरील रवी रेषा ही मनगटापासून थेट रवी ग्रहापर्यंत अखंड गेली आहे. ही देश-विदेशात मानसन्मान देण्याचे काम करते.

रवी रेषेतूनच भाग्य रेषेचा उगम आहे. तिची एक शाखा रवी ग्रहाकडे व दुसरी थेट शनी ग्रहावर जाऊन थांबते. म्हणजेच प्रसिद्धी मागे पैसा हा येणारच आहे. रवी रेषेतूनच बुद्ध रेषेचा उगम आहे. ही बुध रेषा आत्यंतिक व्यावसायिक हुशारी दर्शवित आहे. स्वतःला कायम चर्चेत व पुढे राहण्याचे यांचे कसब बुध रेषेमुळे लाभले आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर मनगटाकडे खालपर्यंत उतरली आहे. ही विविध धून बनविण्याच्या कल्पना विकसित करण्याचे काम करते व त्याचा उपयोग श्रवणीय गाण्याच्या रचनेत बप्पी दा यांना झाला आहे. त्यांची आयुष्य रेषा व मस्तक रेषा वयाच्या 15 वर्षापर्यंतच एकत्र आहे. अशी स्थिती असता ती व्यक्ती आपल्या करिअरचा ठाम निर्णय 15 व्या वर्षीच घेते. बप्पी दा यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्या गाण्याला संगीत दिले. त्यांच्या करियरची सुरवात तरुण वयातच झाली. संगीतकार बनण्याचा निर्णय त्यांच्या मस्तक रेषा व आयुष्य रेषा उगमापाशी फक्त दीड सेंटिमीटरच एकत्र आहेत. नंतर त्या वयाच्या 15 व्या वर्षी स्वतंत्र झाल्या आहेत. आयुष्य रेषा व मस्तक रेषा खूप लांबपर्यंत एकत्र राहिल्या तर त्या वय वर्षापर्यंत ती व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. आणि तोपर्यंत ही व्यक्ती दुसर्‍याच्या अधिपत्याखाली राहते. बप्पीदा यांच्या हाताची बोटे लांबीला छोटी आहेत. पहिले पेर छोटे व नंतरची दोन्ही पेरे जाड आहेत.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या पहिल्या पेर्‍याने मानवी मन त्याच्या संवेदनांचे ग्रहण करीत असते व या संवेदना निमुळत्या बोटाच्या पेर्‍यातून बोथट व जाड पेर्‍यापेक्षा वेगाने आत्मसात केल्या जातात. ही आत्यंतिक संवेदनशील कलाकाराची लक्षणे आहेत. त्यामुळे बप्पीदा यांना हातावरची सर्व बोटांची पहिले पेर हे प्रतिभा देते आहे. या प्रतिभेमध्ये -पहिले गुरुचे बोट – अध्यात्म, दुसरे शनी चे पेर प्रवृत्ती, तिसरे रवी चे बोट कला व चौथे बुद्धीचे बोट श्रवणीय आवाज देत आहे. अंगठ्याचे पहिले पेर सुद्धा निमुळते आहे. ते इच्छाशक्ती व कल्पना देते. हाताची बोटे तळहातापेक्षा आखूड असल्याने जलद निर्णय ते घेऊ शकत होते. त्यांच्या हातावर आयुष्य रेषेतून शनी ग्रहाकडे मार्गस्थ झालेली अतिक्रश रेषा वयाच्या 35 वर्षी आहे. त्यामुळे बप्पी दा यांना वयाच्या 35 व्या वर्षीच खूप मोठी प्रसिद्धी व मान सन्मान प्राप्त झाला. महान संगीतकार म्हणून ते बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाले.

बप्पी दा यांच्या हातावरील सर्व ग्रह हे प्रमाणात उभार घेतलेले आहेत. त्यामुळे ग्रहांची शुभदायी साथ त्यांना कायम लाभली. त्यांचे आयुष्य 70 वर्षांचे होते. त्यांना जीवनात मान सन्मानाबरोबरच संगीताची प्रतिभा लाभली. त्यांना लाभलेला संगीताचा वारसा हा त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून व परमेेशरी कृपेने आला होता.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या