जड्डूचा जादुई डावा पंजा!

भविष्य आपल्या हाती
जड्डूचा जादुई डावा पंजा!

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि संघातील सहकारी ज्यास क्रिकेटविश्वास जड्डू या टोपणनावाने ओळखले जाते, त्या रवींद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी झाला. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये काही काळ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. जडेजा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. दशकातील सर्वोत्तम अष्टपैलू आणि क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

जडेजा माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये मलेशियामधील विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा उपकर्णधार होता. 8 फेब्रुवारी 2009 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले. त्यानंतर 4 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण झाले. डिसेंबर 2012 रोजी नागपूर येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना तो खेळला. 2012 च्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला संघात घेतले. नंतर गुजरात लायन्सने साडेनऊ कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघाकडे ओढले. 22 जानेवारी 2017 रोजी तो 150 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज बनला.

भारतात व भारतीय उपखंडात क्रिकेट खेळाला मोठे वलय आहे. महेंद्रसिंग धोनी, विरोट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, युवा फलंदाज शुभमन गिल असे अनेक स्टार खेळाडू तरुणाईचे आयडॉल आहेत. त्यामुळे भारतात अनेकांना क्रिकेटपटू होण्याची इच्छा असते. मुलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकही प्रशिक्षणासाठी मोठा खर्च करतात. दहा बोटांच्या ठश्यावरून व्यक्तीतील अंगभूत कला व उपजत कल हा ओळखता येतो. फक्त बोटांच्या ठश्यावरून निर्णय करता येतो. माझे असे निरीक्षण आहे कि अंगामध्ये कितीही उपजत कलागुण असले तरी प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी नशीबाची साथ लागते. परंतु सर्वात आधी दोनही हातावरील मुख्यतः आयुष्य रेषा व मंगळ रेषा खणखणीत असावी लागते. याशिवाय मैदानी खेळात यश मिळणे कठीण ठरते. आयुष्य रेषा सुद़ृढ असता निरोगी शरीर व मंगळ रेषा हातावर आयुष्य रेषेच्या सोबत असता या रेषा अधिकची ऊर्जा, निरोगी, काटकपणा व उत्साह प्रदान करतात.

भारतात लाखो मुले क्रिकेटच्या खेळात करियर करण्यासाठी धडपडत असतात. ते क्रिकेट खेळाचे कसब शिकण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊन मैदानावर घाम गाळतात. कसब आत्मसात करतात. फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षण प्रशिक्षणात कसब पणाला लावतात.देशांतर्गत कसोटी, एक दिवसीय, 20-20 इत्यादी प्रकारात प्रचंड स्पर्धा आहे. लाखो खेळाडू क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात येण्यासाठी धडपडत असतात. पण अंतिम संघात स्थान मिळते 16 खेळाडूंना. आयपीएल क्रिकेट लीगमुळे संधी अधिक वाढली आहे. त्यात चमकणार्‍यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार होतो. त्यातून राष्ट्रीय संघासाठी सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज लाभला. क्रिकेट खेळात वय वर्ष 18 ते 36 पर्यंतचा काळ हा उमेदीचा व शारीरिक तंदुरुस्तीचा असतो. या वयात खेळाडूला तंदुरुस्त राहून कौशल्य व कसब पणाला लावावे लागते. या उमेदीच्या काळात यशस्वी खेळाडू होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, प्रशिक्षण, मेहनत व त्याचबरोबर बुद्धी कौशल्य महत्वाचे असते. सर्व बाबी खेळाडूत असूनसुद्धा त्याच्या नशिबाने दिलेली साथ अत्यंत महत्वाची असते. हाताचा व बोटांचा आकार, एकूणच हाताच्या पंज्याची ठेवण व मनगटातील असामान्य ताकद महत्वाची ठरते.

क्रिकेट हा प्रावीण्याचा खेळ आहे. वैशिष्ट्यपूणर्र् हाताचा पंजा असणे व त्या पंज्याच्या साहाय्याने गोलंदाजी करताना चेंडूवर नियंत्रण मिळविणे. खेळातील प्राविण्य वाढविताना, बोटे, तळ हातावरील उंचवटे, अंगठा व मनगटातील ताकद यांचा उपयोग विशेषतः फिरकीपटू जास्त करतात. जडेजा डावखुरे आहे. त्याच्या डाव्या हाताचा पंजा वैशिष्ठयपूर्ण आहे. तो फिरकी गोलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. डाव्या हाताची बोटे व हाताचा पंजा, हातावरील उभार व अंगठा हे वैशिष्ठय पूर्ण आहेत व यांचे वैशिष्ट्ये आज पाहणार आहोत.

लवचिक अंगठा व पहिल्या बोटातील असामान्य ताकद- पहिल्या फोटोत चेंडूची शिलाई उभी आहे व दुसर्‍या फोटोत चेंडूची शिलाई हि आडवी आहे. क्रिकेटचा चेंडू व त्यावरील पकड व षटक टाकताना त्याची यष्टीकडे हव्या त्या दिशेला वळविण्याची ताकद पहिल्या बोटातील ताकद व लवचिकता अंगठ्याने साध्य झाली आहे. पहिल्या फोटोत, पहिले बोट व अंगठा यांचे कार्य मोठे आहे व दुसर्‍या फोटोत पहिले बोट व अंगठा एकत्र आहेत. दुसर्‍या बोटाने चेंडूला पकड दिली आहे. अंगठा व अंगठ्या खालील उन्नत उभार घेतलेल्या शुक्र ग्रहाच्या गादी ने आधार देऊन चेंडू स्विंग करण्याची जडेजाने अवगत केली आहे. पहिल्या व तिसर्‍या बोटात अंगठा व शुक्र ग्रह यांच्या उभारने चेंडूच्या आडव्या शिलाईवरून चेंडू स्विंग करण्याची क्षमता जडेजा यांनी अथक मेहनतीने प्राप्त केली असणार यात दुमत नाही. परंतु वळणारी व फाकणारी बोटे अंगठ्यातील ताकद, शुक्र ग्रहाचा उभार याची वैशिष्ट्यपूर्ण ठेवण ही जडेजा यांच्या यशाचे गुपित आहे. म्हणजेच हाताचा पंजा, बोटांचा आकार व लांबी, अंगठा यांच्यातील लवचिक पणा व ताकद, शुक्र ग्रहाचा उभार यांची देणगी हि परमेश्वराने प्रदान केली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण डावे बोट- वैशिष्ट्यपूर्ण डाव्या बोटांचा फोटो हा हाताच्या बाहेरच्या बाजूने घेतलेला आहे. या फोटोत जडेजाच्या हाताचे पहिले गुरु ग्रहाचे बोट बुटके आहे. तिसरे रवि ग्रहाचे त्या मानाने लांब आहे. सामान्यतः पहिले आणि तिसरे हाताचे बोट हे सारख्या उंचीचे असते. त्यात थोडाफार फरक हा असतोच परंतु पहिले बोट बुटके व तिसरे बर्‍यापैकी लांब हे मिश्रण सहसा पाहावयास मिळत नाही. या बोटांच्या लांबीचा जडेजा यांना फिरकीचा चेंडू टाकताना खूप उपयोगाचा झाला आहे. कारण फिरकी टाकताना पहिले तिसरे बोट व अंगठा हे महत्वाचे ठरतात. अंगठा अत्यंत लवचिक आहे तो ताठर नाही, त्यामुळे चेंडूला गती देतांना लवचिक अंगठ्याची खूप मदत होत आहे. डाव्या हाताच्या पहिल्या तीनही बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यात सांधे आहेत, हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या बोटांमध्ये सांधे असतात अश्या व्यक्ति अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात. बोटांच्या पेर्‍यात सांधे असले कि अशी व्यक्ती विचारी असते. व्यक्ति प्रयेक संवेदना ग्रहण करताना ती संवेदना बोटांच्या टोकांकडून ग्रहण करते. निमुळते बोट विचार न करता संवेदना ग्रहण करतात किंवा त्यावर विश्वास ठेवतात. बोटांची अग्रे गोल व बोथट असता संवेदनांचे पृथकरण उत्तम होते. त्या संवेदना ग्रहण करताना डोळे, कान व मेंदू हे कार्यरत असतात व नंतर व्यक्ती संवेदनावर प्रतिक्रिया देत असते.

बोथट टोकांच्या बोटांच्या आकार असलेले लोक संवेदना पृथकरण करूनच घेतात. परंतु त्याच बरोबर बोटांमधे सांधे असल्यास संवेदनांचे पृथकरण आणखी एकदा होते व संवेदनांचे ग्रहण अत्यंत हुशारीने होत असते. जडेजा यांच्या डाव्या हातावरील पहिले तीन बोटाची अग्रे बोथट आहेत. शिवाय या तिन्ही बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यात सांधे आहेत. या वैशिष्ठय पूर्ण बोटांचा प्रशिक्षणा दरम्यान खूप फायदा झाला, तसेच प्रयेक फलंदाजाचे विक पॉईंट व चेंडू परतून लावण्याच्या प्रकारचा अभ्यास करताना त्याच्या बारीक सारीक हालचाली व खेळण्यातील कसब प्राविण्य ओळखुन समय सुचक्ते नुसार गोलंदाजी व फलंदाजी करण्याची क्षमता, त्याच्या बोटांच्या वैशिट्यपूर्ण आकारा मुळे, पंजाच्या ठेवणी मुळे व अंगठ्यातील व मनगटातील असामान्य क्षमतेमुळे प्राप्त झाली आहे.

डावा हात- डाव्या हातावरील रेषा, ग्रह व अंगठा अंगठा मजबूत, शुक्र व चंद्र ग्रह यांचा उभोर मोठा, आयुष्य रेषा खणखणीत, त्याला मंगळ रेषेची साथ वय वर्ष पन्नास पर्यंत, मस्तक

रेषा पूर्ण लांबीची व थोडी चंद्र ग्रहाकडे झुकलेली, चंद्र ग्रह मनगटाकडे सरकलेला. अंगठा मजबूत असल्याने निर्णय क्षमता, मस्तक रेषा चंद्र ग्रहाकडे उतरल्याने कल्पना शक्ती, शुक्र ग्रहाचा उभार मनमौजी व दिलखुलासपणा दाखवितो. आयुष्य रेषेसोबत मंगळ रेषा असल्याने अधिकचा उत्साह व कार्यक्षमता, काटकपणा या सर्व गुणांचे मिश्रण डाव्या हातात असल्याने जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा असल्याने त्यांचा डावा हात हा सक्रिय आहे व तोच कर्माचा आहे. उजवा हात हा संचिताचा आहे. उजवा हाताचा फोटो उपलब्ध न झाल्याने त्याचे कारकत्व समाविष्ट केले नाही. भाग्य रेषा शुक्र ग्रहावरून उगम पावते आहे. ती आयुष्य रेषेला छेद देऊन शनि ग्रहाकडे जाऊन पोहोचली आहे. त्यामेुळे जडेजा भाग्यवंत आहे. केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना, कष्टाला व क्रिकेट खेळावर केलेल्या एकाकग्रतेला यश मिळत आले आहे. त्यामुळे महान खेळाडू होण्याचे सर्व गुण आहेत.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com