
किंग चार्ल्स तिसरे यांचे सरकार स्थापनेचे आमंत्रण ऋृषी सुनक यांनी स्वीकारल्यानंतर, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून 25 ऑक्टोबर 2022 रोजी ते इंग्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. सुनक यांनी हाऊस ऑफ कॉमन्स येथे भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यात वाटेला आलेला वर्णद्वेष आणि 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थलांतरित असताना कुटुंबाला करावा लागलेल्या वेदना त्यांनी इंग्लंडच्या संसदेसमोर कथन केल्या.
प्रफुुुल्ल कुलकर्णी
त्यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथॅम्प्टन, हॅम्पशायर येथे पंजाबी वंशाच्या यशवीर आणि उषा सुनक यांच्या घरात झाला होता. त्यांचे पालक 1960 च्या दशकात पूर्व आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये स्थलांतर झाले. शिक्षण विंचेस्टर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि फुल ब्राइट स्कॉलर म्हणून कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. रॉम्से येथील स्ट्राउड स्कूल या प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर विंचेस्टर कॉलेजमध्ये डेबॉय म्हणून शिक्षण घेतले. कॉलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळविला.
सुनक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये साउथॅम्प्टनमधील करी हाऊसमध्ये वेटर म्हणून काम करत. लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना त्यांनी कंझर्व्हेटिव्ह कॅम्पेन हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप घेतली आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षात सामील झाले. 2006 मध्ये सुनक यांनी फुलब्राइट स्कॉलर म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. स्टॅनफोर्डमध्ये असताना त्यांची ओळख भारतीय अब्जाधीश आणि इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. पुढे दोघांनी लग्न केले.
सुनक हे 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंडसाठी हाउस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले होते. सुनक यांनी 2016 च्या युरोपियन युनियन सदस्यत्वासाठी सार्वमतामध्ये ब्रेक्झिटच्या यशस्वी मोहिमेला पाठिंबा दिला. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, 2018 च्या मंत्रिमंडळ फेरबदलात सुनक यांची पंतप्रधान थेरेसा मे यांच्या दुसर्या सरकारमध्ये कनिष्ठ मंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली. 2019 च्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या निवडणुकीदरम्यान सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह नेते आणि पंतप्रधान म्हणून मे या यशस्वी होण्यासाठी जॉन्सनच्या यशस्वी बोलीला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांची जुलै 2019 मध्ये इंग्लंडच्या सरकारी खजिन्याचे (ट्रेझरीचे) मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. किंग चार्ल्स तिसरे यांचे सरकार स्थापनेचे आमंत्रण सुनक यांनी स्वीकारल्यानंतर, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून 25 ऑक्टोबर 2022 रोजी ते इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले ब्रिटिश आशियाई आणि हिंदू आहेत. ऊर्जा पुरवठा संकटाच्या दरम्यान त्यांनी पदभार स्वीकारला. एकेकाळी गोर्या लोकांनी संपूर्ण जगावर राज्य केले. याच इंग्लंडमध्ये हिंदू वंशाचे व सावळ्या वर्णाचे सुनक पंतप्रधान बनले. सुनक यांच्या पंतप्रधान होण्यात त्यांची हुशारी, विद्वत्ता व बुद्धी चातुर्याबरोबरच इंग्लंड या देशातील उदात्त आणि विकसीत लोकशाही व्यवस्थेचा वाटा आहे. सध्या इंग्लंडचे राजकारण व अर्थकारण युरोपियन युनियनपासून वेगेळे झाल्यानंतर ढवळून निघाले आहे. याचाही सुनक यांना फायदा झाला. तसेच इंग्लंडची अर्थव्यवस्था व कमालीची महागाई यामुळे जनता मेटाकुटीस आली असताना सुनक यांच्या सारख्या विद्वान अर्थतज्ज्ञांच्या योजनांची भुरळ ब्रिटिश जनतेवर व राजकारणावर असल्याने व त्यांच्यावर विश्वास बसल्याने इंग्लंड सुब्बतेचे स्वप्न पाहत आहे. सुनक यांची विद्वत्ता वादातीत आहे.
ऋषी सुनक यांच्या हातावरील मुख्यतः विद्वत्ता,बुद्धिमत्ता व राजयोग हे कुठल्या रेषा व ग्रहांमुळे घडून आले त्याची उत्सुकता होती. त्यांचे दोनही तळहाताच्या फोटो उपलब्ध झाल्यानंतर हस्तसामुद्रिक शास्त्रावर लेख लिहिण्याचे नक्की केले.
उजवा हात- ऋषी सुनक हे बुद्धिमान अर्थ व राजकीय तज्ञ मानले जातात. त्यांचा या विषयात दांडगा अभ्यास आहे. मनुष्य आयुष्याच्या विविध टप्प्यात मार्गक्रमण करताना एक एक यशस्वी टप्पा पार करताना त्याच्या,श प्रयत्नांची, बुद्धिमत्तेची व निर्णय क्षमतेची कसोटी लागते. ऋषी यांनी त्यांच्या आयुष्यात घेलेलले निर्णय, शिक्षण चालू असताना वेटरची केलेली नोकरी व शाळेत पहिल्या क्रमांकाने व पुढे महाविद्यालयीन पदव्या प्राप्त करताना त्यांना मिळालेले भरघोस यश त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दलची चुणूक व त्यांच्या अथक प्रयत्नांचे यश आहे. राजकीय पक्ष्याचे घेतलेले सदस्यत्व व त्यापुढील पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास विस्मयकारी आहे. कदाचित राजकारणात ऋषी आले नसते तर ते एखाद्या कंपनीत मोठ्या हुद्यावर असते.
राजकारणात येण्यासाठी आर्थिक सुबत्ता मजबूत असेल तर प्रगती वेगाने होते. त्याशिवाय राजकारणाला पूर्ण वेळ देता येत नाही. मुळातच असलेली आर्थिक हुशारी, त्यातून बँकर म्हणून नावाचे वलय आणि नारायण मूर्ती यांचे जावई असलेल्या ऋृषी यांची श्रीमंती अनेकदा इंग्लंडमध्ये चर्चेचा विषय ठरतो. अर्थात त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अधिक संपत्तीच्या मालक आहेत, हे ओघाने आलेच. ऋषी सुनक भाग्यवान असल्याशिवाय ते ग्रेट ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर पोहोचले नाही, यात दुमत नाही. ऋषी यांचा उजवा हातावरील मस्तक रेषेकडे आधी लक्ष जाते. याला आपण बुद्धी रेषा म्हणतो.
सर्वसाधारणपणे ही बुद्धी रेषा हातावर आडवी असलेली एकच रेषा असते. तिची लांबी जितकी लांब, तितकी ती व्यक्ती हुशार व बुद्धिवान असते. ऋषी यांची बुद्धी रेषा व आयुष्य रेषा उगमाशी एकत्र वय वर्ष 20 पर्यंत आहे. आयुष्य रेषा व मस्तक रेषा या वीस वर्षांपर्यंत एकत्र असल्याने ते संस्कारक्षम आहेत. वडीलधार्यांच्या आज्ञेत राहिले आहेत. वीस वर्षानंतर मस्तक रेषा (बुद्धी रेषा) स्वतंत्र झाल्याने ऋषी यांच्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली. ही बुद्धी रेषा हातावर सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे आडवी गेली आहे. अशी स्थिती असता असे लोक खूप निश्चयी, मेहनती व कामाप्रति निष्ठा ठेवून असतात. विना आळस ठरवलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी यांचा आटोकाट प्रयत्न असतो. वरच्या मंगळ ग्रहावर मुख्य बुद्धी रेषा जाऊन थांबल्याने यांचे सर्व निर्णय विचाराअंती घेतलेले असतात. ते आपल्या निर्णयावर ठाम असतात.
ऋषी सुनक यांच्या हातावरच मुख्य आडवी बुद्धी रेषा सोडून करंगळीखाली मंगळ व चंद्र ग्रह मिळून आणखी चार बुद्धी रेषा आहेत. मंगळ ग्रहावर मुख्य बुद्धी रेषेशिवाय आणखी तीन बुद्धी रेषेचे आडवे तुकडे व आणखी एक बुद्धी रेषा मुख्य बुद्धी रेषेच्या खाली तळहाताच्या खाली मधोमध उगम पाऊन तिरकी खाली सरळ चंद्र ग्रहावर मनगटाचे जवळ जाऊन थांबली आहे. या चंद्र ग्रहावर स्वतंत्रपणे उतरलेल्या बुद्धी रेषेने ऋषी यांचा कल्पनाविस्तार व त्याप्रमाणे नियोजन करणे त्यांना अत्यंत सोपे होत आहे. तीन तुकड्यांच्या बुद्धी रेषा वरच्या मंगळ ग्रहावर आहेत. अश्या प्रकारच्या रेषा मी तरी कधी कुठल्याही हातावर पहिल्या नाहीत. वरच्या मंगळ ग्रहावरील तीन बुद्धी रेषा ऋषी यांना सारासार विचार करण्यासाठी मदत करतातच शिवाय शांतपणे राजकारणात डावपेच आखण्यातही मदत करतात. या तीन बुद्धी रेषेंमुळे विरोधकांना पद्धतशीरपणे कुठलीही घाई न करता चितपट करण्याचे चातुर्य देतात.
ऋषी यांच्या तळहातावर असलेल्या पांच बुद्धी रेषा त्यांना अतिविद्वता व हुशारी देण्यात मदत करीत आहेत. एका मस्तक रेषेला शेवटी दोन फाटे असले तरी अशी व्यक्ती अत्यंत बुद्धिवान असते. दोन बुद्धी रेषा असलेले अलौकिक बुद्धिवान असतात. त्यांच्या हातावर तर पांच बुद्धी रेषा असल्याने त्यांची विद्वत्ता काय वर्णावी. चंद्र ग्रह मनगटाकडे शुक्र ग्रहाच्या उभारापेक्षा जास्त खाली सरकलेला असेल तर अशावेळेस व्यक्ती विद्वान असतेच शिवाय त्या व्यक्तीला चंद्र ग्रहाचे बळ मिळते व त्यांचे विचार वा कल्पना या आभासी नसतात. किंवा नुसते दिवास्वप्न नसते, तर त्या प्रत्यक्ष व्यवहारात टिकणार्या, यशस्वी होणार्या व प्रबळ कल्पना असतात.
तळहाताच्या मध्यभागी ऋषी यांचे हातावर चंद्र ग्रहाकडे जाणार्या मस्तक रेषेतून रवि रेषा उगम पाऊन ती थेट रवी ग्रहावर गेली आहे. या रेषेमुळे रवि ग्रह अति शुभ आहेत. ऋषी यांना रवी रेषेमुळे बुद्धी चातुर्य लाभले आहे. त्यामुळेच त्यांना इंग्लंडचे पंतप्रधान पद व जागतिक मान सन्मान प्राप्त झाला आहे.
8888747274
ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड