बादशाहला शुक्र रेषेचे वरदान!

भविष्य आपल्या हाती
बादशाहला शुक्र रेषेचे वरदान!

बादशाह हा हिंदुस्थानी रॅपर संगीताचा नावामाणे बादशाह आहे. जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी झाला. बादशाहच्या पंजाबी-हरियाणवी ढंगाच्या रॅप संगीताने तरुणाईला वेड लावले आहे. युट्यूबवर त्याच्या संगीत अल्बम्स्नेे नवे रेकॉर्ड केले आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

आदित्य प्रतिकसिंग सिसोदिया हे त्याचे खरे नाव. बादशाहने 2006 मध्ये हनी सिंगसोबत हिपहॉप ग्रुप माफियातून संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. बादशाह 2012 मध्ये हनीपासून वेगळा झाला. त्याचे स्वतंत्र हरियाणवी गाणे ‘लडकी ब्युटीफुल’ रिलीज होताच हिट झाले. 2016 साली बॉलिवूड चित्रपट ‘कपूर अँड सन्स’, 2014 मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘खूबसुरत’सारख्या चित्रपटांसाठी बॉलीवूड साउंडट्रॅकमध्ये बदल करून रॅप सादर केले.

पूर्णवेळ गायक-संगीतकार होण्याआधी वाराणसीतील प्रतिष्ठित बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचा विद्यार्थी म्हणून नावनोंदणी केली आणि पीईसी, चंदीगड येथे त्याने सिव्हिल इंजिनीअरींगसाठी प्रवेश घेतला होता. त्याचा पंजाबी संगीताचा परिचय झाला. ज्यामुळे रॅप लेखन करण्यास प्रोत्साहन मिळालेे. रॅपर बनला नसता तर कदाचित आयएएस अधिकारी असतो, असे बादशाह सांगतो. संगीत उद्योगात त्याने ‘कुल इक्वल’ या नावाने आपली कारकीर्द सुरू केली, परंतु नंतर त्याने नाव बदलून बादशाह केले. 7 ऑगस्ट 2020 रोजी, रॅपरने ‘द पॉवर ऑफ ड्रीम्स ऑफ अ किड’ नावाचा क्लासिक पॉप आणि हिप-हॉप अल्बम रिलीज केला. 2019 मधील ‘पागल’ या गाण्याने 24 तासांत युट्यूबवर 74.8 दशलक्ष लोकांनी पहिले होते. हा तेव्हा एक विक्रमच होता. ‘पाणी पाणी’, ’डीजे वाले बाबू’ या गाण्यांनीही विक्रम केला. ही गाणी आजही पार्टी साँग्स् म्हणून वाजतातच. 2017, 2018 आणि 2019 मध्ये तो फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींपैकी एकमेव रॅपर होता.

प्रसिद्धी व श्रीमंतीचे वरदान !

हातावरील रेषा व ग्रह यांचा एकमेकांशी शुभ संयोग होत असेल तर शुभदायी घटना आयुष्यात घडून येतात. तळहातावर आडव्या रेषा असल्यास अशा व्यक्ती जीवनात त्यांच्याकडे हुशारी असून सुद्धा अयशस्वी होतात. आडव्या रेषा ह्या बोटांखालील हृदय रेषा व त्याखालील आणखी एक आडवी मस्तक रेषा या जीवनात अडथळा म्हणून नसतात. मस्तक रेषा व हृदय रेषा ह्या तळहातावर आडव्या असल्या तरी त्या मुख्य रेषा आहेत. या दोन रेषा सोडून बाकीच्या अंगठ्याकडून करंगळीकडे जाणार्‍या आडव्या प्रभाव रेषा जीवनात यशस्वी होऊ देत नाही. अंगठ्याकडून उगम पावून आयुष्य रेषा, भाग्य रेषा, मस्तक रेषा व हृदय रेषेला ज्या वयात छेदत असतील त्या वयात प्रचंड दुःख सहन करावे लागते. शिवाय आयुष्यभर त्या आडव्या रेषेमुळे निर्माण झालेल्या समस्येला आयुष्याला दीर्घकालीन सामोरे जावे लागते. तळहातावरील या आडव्या रेषा जीवनात दुःख देतात, हे मात्र निश्चित. मग ते आर्थिक, शारीरिक, मानसिक, वैवाहिक असो वा मानहानी, त्यातून सुटका नाही .

धन की बरसात

बादशाह यांच्या हातावरच्या शुक्र ग्रहावरून बोटांकडे जाणार्‍या अतिशुभ रेषा हातावरच्या रेषा आडव्या न जाता त्या जर बोटांच्या रोखाने जात असतील किंवा, गुरु, शनी, रवी बोटांच्या सानिध्यात प्रवेश केल्यावर त्या ग्रहांचे कारकत्व लाभते व शुभ लाभ प्राप्त होतात. बादशाह यांच्या हातावर शुक्र ग्रहाकडून एकूण चार रेषा उगम पावत असून त्या मंगळ रेषा व आयुष्य रेषेला छेद देऊन मस्तक रेषेला जाऊन मिळते आहे. 2 व 3 नंबरची रेषा भाग्य रेषेला जाऊन मिळत आहे व 4 नंबरची रेषा रवी रेषेला जाऊन मिळते आहे. शुक्र ग्रह हा ऐश्वर्य देणारा ग्रह आहे. तो अत्यंत शुभ लाभ देणारा त्याच्या हातावर आहे. मस्तक रेषेला एक रेषा जाऊन मिळत असल्याने आर्थिक स्थितीबाबत कायम जागरूकता दाखवते आहे. दोन रेषा या शुक्रावरून भाग्य रेषेला जाऊन मिळत असल्याने बादशाह यांनी सांगितलेल्या मानधनात कमी येत नाही. म्हणजेच बादशाह मागतील तेवढ्या मोठ्या रक्कमेचे करार त्यांना प्राप्त होते. चौथी रेषा रवी रेषेत जाऊन मिळाल्याने त्यांचा रॅपच्या गाण्यांना अमाप प्रसिद्धी मिळत आहे. बादशाह यांच्या हातावर असलेल्या चार प्रभाव रेषा शुक्र उंचवट्यावरून उगम पावत असून त्यांच्या आयुष्यात धन कि बरसात घेऊन आल्या आहेत. अशा प्रकारच्या प्रभाव रेषा करोडो लोकांमध्ये एखाद्या भाग्यवंताच्या नशिबी असतात.

बुद्धी चातुर्याची बुध रेषा

बादशाहच्या तळहातावर शुक्र ग्रहावरून बोटांकडे जाणार्‍या चार प्रभाव रेषेबरोबरच एक बुध रेषा आयुष्य रेषेतून उगम पावते आहे. ही बुध रेषा थेट बुध ग्रहावर जाऊन थांबलेली असल्याने चातुर्य, व्यवहार व स्वतःला कायम प्रसिद्धीत ठेवण्याचे तंत्र अवगत झाले आहे. या बुध रेषेमुळे कदाचित बादशाहपेक्षा जास्त कला अवगत असलेले कलाकार असतील, पण त्यांना स्वतःची वाह वाह करून घेता येत नसल्याने ते मागे पडतात. बुध रेषेला म्हणूनच चलाखीची रेषा म्हणून संबोधले जाते. आयुष्य रेषेतून थेट रवी ग्रहावर जाणारी रवी रेषा

आयुष्य रेषेतून थेट रवी ग्रहावर जाणारी रवी रेषा

रवि रेषा मानसन्मान, प्रसिद्धी तर देतेच शिवाय त्यामागे आर्थिक उत्पन्न सुद्धा देते. रवि ग्रह मानसन्मान कीर्ती प्रदान करतो. या ग्रहावर जाणारी कोणतीही प्रभाव रेषा अगर मुख्य रेषा कोणत्याही रेषेतून उगम पावत असेल तर ती जास्त बलवान असते.

रवी ग्रहावर एकच रेषा जाऊन पोहोचत असेल तर तर रवी ग्रह शुभ लक्षणी होतो. रवी रेषा मस्तक रेषा, हृदय रेषा व बुध रेषेतूनही उगम पावते अथवा स्वतंत्रपणे चंद्र ग्रहावरून उगम पावत असते. रवी रेषा रवी ग्रहाकडे जाताना मणिबंधापासून रवी ग्रहापर्यन्त रवी ग्रहाच्या मधोमध जाताना जितकी लांबीला जास्त तितकी ती शुभ असते. रवी रेषा लांबीला मोठी असता लहानपणापासूनच व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात राहते. तिचे छोटेसे कार्य प्रसिद्धी देऊन जाते. रवी ग्रहावर रवी रेषा पोहोचताना ती जितकी लांबीला छोटी तितकी त्या व्यक्तीला प्रसिद्धी उशिराने मिळते. हातावर रवी रेषा बिलकुल नसेल तर त्या व्यक्तीच्या नशिबी मानसन्मान अजिबात असत नाही.

रवी ग्रहावरील एकच रेषा कला प्रदान करते.

बादशाह कलाकार आहेत. रवी रेषा मान सन्मान कीर्तीबरोबर विविध कला प्रदान करते. रवीचे बोट म्हणजे हातावरील तिसरे बोट लांब असेल तर किंवा पहिल्या बोटापेक्षा लांबीला जास्त असेल तर अश्या व्यक्ती कलाकार असतात. बोटाची लांबी कमी असेल तर अशा व्यक्ती कलेची जाण असणार्‍या असतात. कला कुठल्याही क्षेत्रातील असू शकते. रवीचे बोट अधिक लांब असता असे लोक सट्टेबाज असतात. प्रत्यक्ष सट्टा खेळलाच पाहिजे असे नव्हे तर याची वृत्ती व्यवहारात धाडसी असते.

बादशाह यांची रवी रेषा रवी ग्रहावर पोहोचल्यानंतर द्विशाखी झाली आहे. एक फाटा शनी व रवि ग्रहाच्या बोटामध्ये व दुसरा रवी ग्रहावर रवी व बुध ग्रहाच्या पेर्‍यात गेल्याने शनी ग्रह आर्थिक लाभ देतो आहे व रवी- बुध ग्रह जागतिक कीर्ती, प्रसिद्धी प्रदान करतो आहे.

बोटे निमुळती...

बोटे निमुळती असल्याने यांच्याकडे कलेला पोषक ग्रहण शक्ती आहे. मनात कल्पना आल्या किंवा सुचल्या की त्यावर अंमलबजावणी त्वरित होत असते. करंगळी लांब असल्याने व्यवहारा बरोबरच श्रवणीय गळा लाभला आहे. स्वतःची एक शैली विकसित केलेली आहे. अंगठा मजबूत आहे. अंगठ्यावर पहिल्या पेर्‍यानंतर यव चिन्ह असल्याने आयुष्यभर आर्थिक चणचण भासणार नाही. शुक्र ग्रहापेक्षा चंद्र ग्रह मोठा आहे. तो मणिबंधाकडे अधिक सरकल्याने चंद्र ग्रहाची शुभ कारकत्व लाभली आहेत. चंद्रग्रहाचे कारकत्व म्हणजे कल्पना विलास, योजना, योेजनांचे किंवा मनांतील कल्पनेप्रमाणे सादरीकरण याचा लाभ बादशाह यांना होत आहे, झाला आहे. बादशाह भारतात रॅपद्वारे तरुणाईला भूरळ घालून त्यांच्या ठेक्यावर बेभान नृत्य करण्यात तरुणाई रमणार हे निश्चित आहे. बादशाह यांना त्यांच्या आयुष्यात रॅपचा हा पाश्चात्य नृत्यप्रकार त्यांच्या जीवनात अमाप पैसा व प्रसिद्धी देऊन जाणार आहे, हे मात्र निश्चित!

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com