Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधबुध-रवीच्या युतीनेेे खर्गेंना दिला हात!

बुध-रवीच्या युतीनेेे खर्गेंना दिला हात!

मल्लिकार्जून खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला प्रदीर्घ काळातनंतर गांधी परिवाराबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळाला आहे. वयाने ज्येष्ठ असलेले खरगे अद्यापही आपली उत्स्फूर्तता जपून आहेत. त्यांच्या हातांवरील रेषाही ते दर्शवितात. विशेष म्हणजे आज त्यांच्यावर गांधी परिवाराचा शिक्का मारला जात असला तरी स्वतंत्र निर्णय आणि मुडी स्वभाव हे गुणही त्यांच्या हातांवरील रेषांत दिसत असल्याने ते काँग्रेसला की उभारी देणार, याची प्रतीक्षा असेल. तिसर्‍या व चौथ्या बोटांच्या पेर्‍यात गेलेल्या रवी रेषेला अनुक्रमे रवी व बुध ग्रहाचे शुभत्व लाभले आहे. त्यामुळे त्यांना पक्षसंघटनेतील सर्वोच्च पद मिळाले आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी या गावात एका दलित कुटुंबात झाला. त्यांनी गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि गुलबर्गा येथील सरकारी महाविद्यालयातून कला शाखेची पदवी आणि गुलबर्गा येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या कार्यालयात कनिष्ठ म्हणून कामाची सुरूवात केली. गुलबर्गा येथील शासकीय महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून खरगे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

- Advertisement -

त्यांनी प्रथम 1972 ला कर्नाटक राज्य विधानसभा निवडणूक लढवली आणि गुरुमितकल मतदारसंघातून विजय मिळवला. 1973 मध्ये त्यांची जकात निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ज्याने कर्नाटक राज्यातील नगरपालिका आणि नागरी संस्थांच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन केला. त्याच्या अहवालाच्या आधारे तत्कालीन देवराज उर्स सरकारने अनेक ठिकाणी जकात आकारणी रद्द केली. 1976 मध्ये त्यांची प्राथमिक शिक्षण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या काळात शिक्षकांच्या 16,000 पेक्षा जास्त अनुशेष रिक्त जागा त्यांना थेट सेवेत भरती करून भरण्यात आल्या. 1980 मध्ये ते गुंडू राव मंत्रिमंडळात महसूल मंत्री झाले. यावेळी जमीन सुधारणांवर लक्ष केंद्रित केले गेले. परिणामी लाखो जमीन नसलेल्या शेतमजुरांना आणि मजुरांना भोगवटा हक्क देण्यात आला. 400 पेक्षा जास्त जमीन न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली होती. जेणेकरून जमिनीच्या अधिकारांचे हस्तांतरण जलद गतीने व्हावे. 1983 मध्ये ते गुरमितकलमधून कर्नाटक विधानसभेवर तिसर्‍यांदा निवडून आले. 1985 मध्य ते गुरमितकलमधून कर्नाटक विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले. त्यांची कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1989 मध्ये ते गुरुमितकल येथून पाचव्यांदा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले. 1990 मध्ये ते बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून सामील झाले. त्यांनी यापूर्वी भूषवलेले खाते आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.

1992 ते 1994 दरम्यान ते वीरप्पा मोईली यांच्या मंत्रिमंडळात सहकार, मध्यम आणि मोठे उद्योग मंत्री होते. 1994 मध्ये ते गुरुमितकलमधून कर्नाटक विधानसभेवर सहाव्यांदा निवडून आले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. 1999 मध्ये ते सातव्यांदा कर्नाटक विधानसभेसाठी निवडून आले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ते आघाडीवर होते. 2004 मध्ये ते सलग आठव्यांदा कर्नाटक विधानसभेसाठी निवडून आले आणि पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर मानले गेले. 2005 मध्ये त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेचच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजप आणि जेडी(एस)च्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकल्या. 2008 मध्ये ते विक्रमी नवव्यांदा चितापूरमधून विधानसभेवर निवडून आले. 2004 च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी, काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पराभव पत्करला. 2008 मध्ये त्यांची दुसर्‍यांदा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 2009 मध्ये खर्गे यांनी गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि सलग दहावी निवडणूक जिंकली.

12 फेब्रुवारी 2021 रोजी खर्गे यांची राज्यसभेतील ेविरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 2014 मध्ये आसाम, 2021 मध्ये पंजाब आणि 2022 मध्ये राजस्थान या राज्यांसाठी पक्ष निरीक्षक म्हणून कामगिरी बजावली. 1 ऑक्टोबर 2022 रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 24 वर्षात गांधी घराण्यातील नसलेले ते पहिले काँग्रेस अध्यक्ष आहेत.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी विविध ग्रह रेषा व चिन्हांच्या साथीने ती व्यक्ती नशीबवान बनते. राजकारणात यशस्वी होण्यासाठी निर्णय क्षमता, नम्रता, हुशारी,समयसूचकता, जनमानसातील आदरभाव, संधीचा फायदा घेण्याची कुवत व पैसा असावा लागतो. हस्तसामुद्रिकशास्त्रात हातावरील रेषा, ग्रह व चिन्हे व हाताचा आकार जो परमेश्वराने प्रदान केला आहे. त्यांच्या सूक्ष्मशास्त्रीय विश्लेषण व अभ्यासाने व्यक्तीच्या आयुष्यतील घटनांचा मागोवा घेता येतो. शिवाय भविष्यातील कारकीर्द व सुख दुःखांचा काळ अचूक सांगता येतो. राजकारणात जनमानसातील प्रसिद्धी कायम उपयोगाला पडते.

आयुष्य रेषा – खर्गे यांची आयुष्य रेषा वयाच्या नव्वद वर्षापर्यंत उत्तम आहे. म्हणजेच खर्गे अजूनही दहा वर्षे राजकारणात योगदान देणार आहेत. खर्गे यांची हृदय रेषा वयाच्या 82 च्या वयापासून नाजूक आहे. त्यांनी मानसिक दडपण घेतले नाही तर हृदय त्यांना साथ देणार आहे. दोनही हातावरील आयुष्य रेषा आयुष्मान योगाची असावी लागते. डाव्या किंवा ऊजव्या हातावरील आयुष्य रेषेत गंडांतर योग असतील तर मृत्यू अटळ असतो. आयुष्य रेषेला मंगळ रेषेची साथ असेल तर गंडांतर योग टळतो. हृदय रेषेत मोठा दोष असेल तर आयुष्य रेषा उत्तम असून चालत नाही कारण आयुष्य रेषा व्यक्तीची शारीरिक क्षमता किती याचे प्रतिनिधित्व करते. ती हृदय आघातांपुढे हतबल असते. थोडक्यात गंडांतर योगाते हृदयाचे काम थांबल्याने अथवा मेंदूतील बिघाडाने येतो त्या वेळेस परमेश्वरच तारण हारण असतो.

मंगळ व शुक्र ग्रह, वादाला कारणीभूत – हातावरील खालचा मंगळ व शुक्र ग्रह हे एका आडव्या ठळक रेषेने वेगळे व स्वतंत्र झाले आहे. अशी परिस्थिती हातावर असता मूड कसा आहे यावर त्यांचे निर्णय असतील. कारण मंगळ क्रोधाचा कारक आहे. अस्वस्था देणारा आहे. चीडचिडेपणा आणणारा आहे. तर शुक्र ग्रह हा आनंदी, उत्साही व मूडमधे राहण्यासाठीचा कारक आहे. मंगळ व शुक्र ग्रह एका आडव्या स्वतंत्र रेषेने अलग झाल्याने खर्गे यांचा दिवसभरातील मुड बदलत राहणार आहे व याची प्रचिती नजीकच्या काळात नेत्यांना व कार्यकर्त्यांना येणार आहे. त्यांच्या बदलत्या मूडमुळे काही निर्णय हे गांधी घराण्याला रुचणारे नसतील व वादाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.

हातावरील गुरु ग्रह अत्यंत शुभ – हातावरील गुरु ग्रह अत्यंत शुभ आहे. आयुष्य रेषेतून एक रेषा गुरु ग्रहावर आल्याने ती व्यक्तीला तिच्या आयुष्यात यशस्वी करते व तशी रेषा खर्गे यांच्या गुरु ग्रहावर आहे. गुरु ग्रहावर पहिल्या म्हणजे गुरु ग्रहाच्या बोटाखाली गुरु वलय आहे. हे गुरु वलय खर्गे यांना विद्वत्ता, इमानदारी, धार्मिकपणा, सचोटी, न्याय बुद्धी व शुद्ध आचरण प्रदान करते आहे. याच गुणांमुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली गेली.

मस्तक रेषा – त्यांच्या हातावरील मस्तक रेषा आयुष्य रेषेतून वयाच्या 13 व्य वर्षी उगम पाऊन हातावर आडवी थेट हाताच्या दुसर्‍या कडेला गेली आहे. ही रेषा बुद्धिमत्ता प्रदान करते. पूर्ण लांबीची मस्तक रेषा चंद्र ग्रहाकडे न वळता थोडीशी झुकून वरच्या मंगळ उंचवट्याकडे गेली आहे. वरचा मंगळ ग्रह उभार घेतलेला आहे. हृदय रेषा व मस्तक रेषेच्या मध्ये हाताच्या कडेला असलेला हा मंगळ ग्रह विचारी व साधक बाधक निर्णय क्षमता असलेला आहे. खर्गे यांचा वरचा मंगळ प्रभावी आहे. त्यामुळे त्यांचे निर्णय विचार पूर्वक होतात. वरच्या मंगळ ग्रहावर हाताच्या बाहेरून आता येणार्‍या दोन ठळक व एक पुसट छोट्या आडव्या रेषा आहेत. या आडव्या रेषा म्हणजे खर्गे यांच्या आयुष्यातील त्रासदायक ठरणारे तीन शत्रू होत. या पैकी ठळक दोन रेषा हे प्रबळ शत्रू व त्या मानाने फिक्की रेषा कमी त्रासदायक शत्रू आहे.

अंगठा व बोटे – खर्गे यांचा अंगठा मजबूत आहे. अंगठ्याच्या सुरवातीला टोक आहे. त्यामुळे ते संवेदनशील आहेत. परंतु अंगठ्याचे पहिले पेर व दुसरे पेर प्रमाणात आहे. त्यावर आडव्या रेषा नाहीत. त्यामुळे खर्गे यांना आळस माहित नाही. योजलेले काम वेळेपूर्वी व्हावे, असा त्यांचा दंडक आहे. बोटे मुळाशी जाड आहेत. टोकाला निमुळते होत पहिल्या पेरावर गोलाई युक्त आहेत. त्यामुळे संवेदनांचे विश्लेषण विचारपूर्वक होत आहे. तळहाताच्या आकारापेक्षा बोटे लांबीला छोटी असल्याने जलद निर्णय क्षमता आहे. सर्व बोटे स्वतंत्र आहेत. प्रत्येक बोटात फट आहे. त्यामुळे बोटांखाली असलेले ग्रह शुभ परिमाण देत आहे. हातावरील सर्व ग्रह उभार घेतलेले व अत्यंत शुभ आहेत. त्यामुळे ग्रहांची कृपा आहे. चंद्र ग्रहाचा उभार स्वच्छ आहे. त्यावर मस्तक रेषा खाली न उतरल्याने ते विचारी व व्यवहारी आहेत.

बुध व रवी ग्रहाची शुभ युती – बुध रेषा आयुष्य रेषेतून उगम पाऊन थेट करंगळीच्या खाली बुध ग्रहावर जाऊन थांबली आहे. बुध रेषा हुशारी व चाणाक्षपणा देते. बुध ग्रहाचे शुभ कारकत्व लाभते. यामधे चौकस, व्यवहारी व बोलबच्चन, थोडक्यात सफाईदार वक्तृत्व व हजरजबाबीपणाचा लाभ व्यक्तीला होत असतो. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे कुठलीही रेषा प्रमुख रेषेतून उगम पावत असेल तर तिचे शुभत्व प्रचंड वाढते. ती ज्या ग्रहावर जाऊन थांबते, त्या ग्रहाचे शुभ गुण वृद्धिंगत होतात. खर्गे यांच्या हातावर बुध रेषेतून रवी रेषा उगम पावते आहे व ती थेट तिसर्‍या बोटाच्या खालील रवी ग्रहावर जाऊन थांबलेली आहे. ही रवी रेषा लांबीला मोठी आहे त्यामुळेच खर्गे यांना त्यांच्या जीवनात राजकारणात उतुंग यश मिळविता आले. हृदय रेषेतून रवी ग्रहाखाली आणखी रवी रेषेची आणखी एक शाखा उगम पावते आहे व ती बारीक चमकदार व अतिशुभ आहे या रेषेने खर्गे यांच्या जीवनात वयाच्या 55 व्या वर्षापासून उतुंग यश दिले आहे. रवी व बुध ग्रहांच्या पेर्‍यात गेलेली रवी रेषा अंतर राष्ट्रीय ख्याती व प्रसिद्धी देते.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisment -

ताज्या बातम्या