शक्तिशाली महिला नेतृत्व

भविष्य आपल्या हाती
शक्तिशाली महिला नेतृत्व

सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी झाला, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात दीर्घकाळ अध्यक्षा होत्या. सोनिया यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी 1998 मध्ये त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा पदभार स्वीकारला आणि 22 वर्र्षेे अध्यक्षपद सांभाळले.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

इटलीतील विसेन्झा जवळील एका छोट्या गावात जन्मलेल्या सोनिया गांधींचे पालनपोषण रोमन कॅथलिक कुटुंबात झाले. स्थानिक शाळांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्या केंब्रिज येथे भाषेच्या अभ्यासासाठी गेल्या. जिथे त्यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली आणि नंतर 1968 मध्ये त्यांच्याशी विवाह केला. सोनिया यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांना काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु त्यांनी नकार दिला. 1997 मध्ये काँग्रेस नेत्यांकडून खूप विनंती केल्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचे मान्य केले. 1998 मधे पक्षाध्यक्षपदासाठी त्यांची निवड एकमताने झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2004 च्या निवडणुकीनंतर अन्य पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. 2009 मध्ये पुन्हा सत्तेवर निवडून आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) संघटित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2004 च्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्विकारण्यासाठी आग्रह झाला. परंतु त्यांनी ते नाकारले. त्याऐवजी त्यांनी सत्ताधारी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे नेतृत्व केले व सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला .

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने माहितीचा अधिकार व नंतर अन्न सुरक्षा विधेयक आणि मनरेगा यांसारख्या अधिकार आणि कल्याणकारी योजनांच्या स्थापनेसाठी आणि त्यानंतरच्या अंमलबजावणी केली. सोनिया यांचेवर बोफोर्स घोटाळा आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोप झाले. त्यांचा परदेशात झालेला जन्म हा देखील विरोधकांनी राजकीय वादाचा विषय ठरवला. सोनिया गांधींचे वर्णन देशातील सर्वात शक्तिशाली राजकारण्यांपैकी एक म्हणून केले जाते. अनेकदा जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये त्या सूचीबद्ध आहेत.

महिला दिनाचे औचित्य साधून भारतातील व जगातील शक्तिशाली महिला सोनिया गांधी यांच्या उजव्या हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे व हाताच्या व बोटांच्या आकारावरून त्यांच्या भविष्याचा वेध घेत आहोत. व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता हि जन्मजात असते. भाव भावना, स्वार्थी व व्यवहारीपणा, हुशारी शिकवून येत नाही ती अंगभूत व परमेश्वरी देणगी असते. प्रत्येक व्यक्ती नशीब घेऊन जन्माला आलेली असते. प्रत्येकाचे नशीब हे वेगळे असते. जुळ्यांच्या जन्मात एक दोन मिनिटाचा फरक असला तरी त्यांचे नशीब हे भिन्न असते. सोनिया या इटली वरून भाषा शिकण्यासाठी लंडनला आल्या, उपजीविकेसाठी त्या रेस्टारंट मधे अर्धवेळ काम करीत होत्या. त्यांना हवाई सुंदरी व्हायचे होते. राजीव गांधी व सोनिया यांची ओळख लंडनच्या हॉटेलमधे झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले व नंतर त्यांचे गांधींच्या राजघराण्यात लग्न झाले. हा मोठा महान योगायोग हा नशिबाचाच भाग आहे. कारण सोनिया सामान्य कुटूंबात जन्मलेल्या परंतु पती हा प्रभावी राजघराण्यातील मिळाला हा योगायोग नसून नशिबाचा भाग आहे. सोनिया यांचा हृदय रेषेचा एक फाटा मस्तक रेषेत जाऊन थांबला आहे. हस्तसामुद्रिकदृष्ट्या हा प्रेमयोग असून ज्यांचे हातावर हृदय गुरूच्या बोटाखाली मस्तक रेषेत जाऊन थांबत असेल तर यांचे प्रेम होत असते. प्रेमाचे रूपांतर लग्नातच होईल हे इतर ग्रह रेषांवर अवलंबून असते.

उजवा हात - सोनिया यांच्या उजव्या हातावरील भाग्य रेषा, रवि रेषा व बुध रेषा आयुष्य रेषेतून उगम पावत आहे. त्यामुळे त्या अत्यंत भाग्यवान आहेत. आयुष्य रेषेतून उगम पावणार्‍या भाग्य रेषा, रवि रेषा व बुध रेषा या तीनही रेषांनी सोनिया यांना अनुक्रमे, ऐश्वर्य, मान सन्मान व अधिकार बहाल केले आहेत. लाखो करोडो हातामधे एखादा हात असा असू शकेल कि, जो त्या व्यक्तीला रंकाचा राव करेल. इटलीमधे सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबात सोनिया यांचा जन्म झाला त्या लग्नानंतर राजकन्या झाल्या व तो योग इटलीत नव्हे तर लंडनसारख्या परराष्ट्रात घडून आला याला नशीबच बलवत्तर लागते. सोनिया यांच्या उजव्या म्हणजेच कर्माच्या हातावरील शनि, रवि व बुध रेषा ह्या भाग्यशाली आहेतच, शिवाय ह्या रेषा आयुष्य रेषेतून थेट शनी, रवि व बुध ग्रहाच्या उंचवट्यावर जाऊन थांबल्याने शनी, रवि व बुध ग्रह उच्चीचे व अति शुभ बनले आहेत. हृदय रेषेचा उगम शनी व गुरु ग्रहाच्या पेर्‍यामधून झाल्याने सोनिया अत्यंत व्यवहारी आहेत. त्यांना आपला स्वार्थ समजतो. लोकांचा उपयोग पुढे जाण्यासाठी कसा करून घ्यावा याचे उपजत बाळ कडू त्यांना प्राप्त आहे. सोनिया यांच्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषेत उगमापासून मोठे अंतर आहे किंवा या दोन रेषेचा उगम हा सरासरी पेक्षाही जास्त अंतरावर गुरु बोटाच्या खाली झाला आहे. मस्तक रेषा व आयुष्य रेषेतील उगमापाशी अंतर मोठे असता अशा व्यक्ती कोणाच्याही अधिपत्याखाली राहू शकता नाहीत. यांचे स्वतःचे निर्णय असतात व ते अंतिम असतात. या रेषा अत्यंत चोख व काटेकोर व्यवस्थापन प्रदान करतात. मनाविरुद्ध झालेली गोष्ट सहन होत नाही.

मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली नाही. हृदय रेषा व मस्तक रेषेतील अंतर येथून तेथून एकसारखे आहे. वरच्या मंगळ ग्रहावर मस्तक रेषा पोहोचताना ती चंद्र ग्रहाकडे थोडीशी झुकली आहे. त्यामुळे वरचा मंगळ प्रभावी झाला आहे. वरचा मंगळ प्रभावी झाला असल्याने विचारपूर्वक निर्णय क्षमता व शत्रूला शह देण्याची कूट नीती लाभली आहे. मस्तक रेषा लांब व बर्‍यापैकी आडवी होऊन वरच्या मंगळ ग्रहावर जाऊन थांबल्याने कामाचा उरक खूप मोठा आहे. कामे मागे ठेवण्याची यांची प्रवृत्ती नसते. मस्तक रेषेला शेवटी दोन फाटे आहेत. मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांच्यात उगमस्थानी असलेले मोठे अंतर आहे. या दोनही रेषांची रचना विद्वत्ता देते परंतु त्याचबरोबर क्रोध पण देते. आयुष्य रेषा उत्तम आहे व आयुष्य रेषेच्या जोडीला मंगळ रेषा आहे. मंगळ रेषा जास्त उर्जावान बनविते उत्साह देते व त्या बरबरच क्रोधाच्या मात्रेत वृद्धी करते. हाताच्या चारही बोटावरचे पेरे प्रमाणात आहे. त्यामुळे गुरु, शनी, रवी व बुध ग्रहाचे शुभ कारकत्व वाढले आहे. चार बोटांपैकी पहिले गुरुचे बोट बाकीच्या तीन बोटांपेक्षा रुंद व लांबीला मोठे आहे. या गुरूच्या बोटांमुळे नेतृत्व करण्याची उपजत प्रवृत्ती आहे. सर्व सूत्र आपल्याच हातात असावी असा यांचा आग्रह असतो. सर्वांनी त्यांचे नियम व अनुशासन मान्य करावेत अशी यांच्या मनाची धारणा असते. ज्या व्यक्ती त्यांच्या चौकटीत बसत नाहीत त्यांच्यावर नेहमी अवकृपा राहते. अंगठा लवचिक असला तरी तो मजबूत आहे. बोटांची पेरे टोकाला गोल आहेत, बोटे लांब व हात निमुळता आहे. हातावरील सर्व ग्रहांचा उभार शुक्र सोडला तर शुभ आहे.

शुक्राने वैवाहिक सौख्यात कमतरता दिली असली तरी ऐश्वर्य भरभरून दिले आहे. करंगळीखालील मनगटापयर्र्ंत चंद्राचा उभार बुध रेषेमुळे स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे यांच्या कल्पना व विचार करण्याची प्रवृत्ती आत्मकेंद्रित आहे. सत्तेतील विकेंद्रीकरण यांना मंजूर नाही. हाताची वज्रमूठ पुरुषा इतकी मजबूत आहे. त्यामुळे हम करे सो कायद्या ही प्रवृत्ती आहे. हाताच्या पंज्या सामर्थ्याच्या आहे. त्यासाठी हाताच्या पंज्याचा स्वतंत्र फोटो दिला आहे. स्त्री सुलभ हात सोनियाजी यांचा नाही. त्यांच्या हाताच्या आकारात व ठेवणीत पुरुष तत्व जास्त समाविष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्यात निर्णय क्षमता आहे. सोनिया यांनी राजकारणात प्रवेश करताना त्यांच्या घराण्याच्या पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व सूत्रे त्यांनी स्वतःकडे ठेवली. त्या किंगमेकर बनल्या. त्यांनी निवडणुका लढविल्या परंतु सरकारात कुठलेच पद स्वीकारले नाही.

हृदय रेषा कमानदार आहे. त्यामुळे त्या संवेदनशील आहेत. परंतु हृदय रेषा वय वर्ष 78 ते 80 च्या दरम्यान बिघडलेली असल्याने त्यांना हृदयविकारापासून सावध राहायला हवे. ही खराब झालेली हृदय रेषा तिसर्‍या बोटाच्या खाली चौथे बोटाच्या सुरवाती दरम्यान आहे. चौथ्या म्हणजे बुध ग्रहाच्या बोटाच्या अलीकडे खराब झालेल्या हृदय रेषेतुन एक रेषा उगम पावत असून ही रेषा संपूर्ण हाताला आडवी गेली आहे व या रेषेने बुध, मस्तक, रवी, भाग्य, आयुष्य व मंगळ रेषेला छेद देऊन ती खालच्या मंगळ ग्रहावर जाऊन थांबली आहे. बुध ग्रहावरून हृदय रेषेतुन उगम पावलेली तळहातावरील आडवी रेषा ती थेट खालच्या मंगळ ग्रहावर अंगठ्याच्या पेर्‍यापर्यंत आहे. या हातावरील आडव्या रेषेने सोनिया यांच्या आयुष्यात कायम स्वरूपी अडथळा निर्माण केला आहे. या आडव्या रेषेने संपूर्ण भारतावरील सत्तेपासून त्यांना वंचित ठेवले आहे. सोनिया यांचे हातावरील भाग्याला आडवी येणारी रेषा आयुष्य रेषेवर वयाच्या 44 वर्षाच्या दरम्यान आहे. याच वय वर्षात त्यांचे पती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. सोनिया यांनी 1998 च्या दरम्यान काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतली तेंव्हा त्यांचे वय 50 होते. याच वर्षी त्यांचे हातावर उच्च उत्कर्ष रेषा आहे. त्यांच्या जीवनातील उच्च पद मिळणारी ही रेषा आहे. परंतु या उत्कर्ष रेषेला वयाच्या 44 वर्षी आडव्या गेलेल्या रेषेने छेदले आहे. त्यांचा स्वतःचा उत्कर्ष झाला असला तरी काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षाची गती मंद करण्याचे काम या आडव्या रेषेने केले.

रवी रेषा आयुष्य रेषेतून रवी ग्रहावर गेली आहे. ते वय वर्ष 60च्या दरम्यान आहे. या वय वर्षात सोनिया या जगातील शक्तीशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली . सोनिया यांच्या कारकिर्दीतच काँग्रेस पक्षाचे पतन झाले. आज जागतिक मंचावर आजही त्या प्रभाशाली महिला आहेत. परंतु त्यांच्या कारकिर्दीतच काँग्रेस पक्षाची वाताहात झाली. केवळ हातावर नशिबाला असलेल्या आडव्या रेषेमुळे हे घडले

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com