सप्त ग्रहांचे सिसोदियांना बळ

भविष्य आपल्या हाती
सप्त ग्रहांचे सिसोदियांना बळ

मनीष सिसोदिया यांचा जन्म 5 जानेवारी 1972 रोजी झाला. जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात झाला. पदविका पूर्ण केल्यानंतर पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एफएम रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले. 1996 मध्ये ऑल इंडिया रेडिओसाठी झिरो अवर सारखे अनेक कार्यक्रम सादर करायचे. त्यानंतर 1997 ते 2005 दरम्यान झी न्यूजसाठी रिपोर्टर, न्यूज प्रोड्यूसर आणि न्यूज रीडर म्हणून त्यांनी काम केले. फेब्रुवारी 2015 पासून दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पटपरगंज मतदारसंघातून तिसर्‍यांदा आमदार आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

राजकारणात मोठे होण्यासाठी घराची श्रीमंती लागते, असा समज आज दृढ झाला आहे. आर्थिक सक्षम असलेलेच राजकारणात टिकतात. राजकारणाचा वारसा असल्यास राजकारणात प्रवेश सहज होतो, असा आताचा काळ. या काळात आपच्या नेत्यांनी पारंपरिक अनेक राजकीय प्रथांना धक्का दिला. मनिष सिसोदिया व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना कोणताही राजकीय वारसा नाही. घराची गर्भश्रीमंती नाही. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून ही नावे पुढे आली. या नेत्यांनी भारतीय राजकारणाला एक नवी दिशा देण्याच्या प्रयत्न चालवला आहे.

गुरु बळ असल्याने नेतृत्व - परिस्थितीचा फायदा उचलणे किंवा आलेली संधी साधणे, हे ग्रह मेहेरबान असल्याशिवाय होत नाही. गुरु ग्रह अनुकूल असल्यानेच सिसोदिया यांना हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची बुद्धी झाली. या आंदोलनात सक्रिय होताना त्यांना आपल्या पत्रकारिता व भारतीय राजकारणाच्या अभ्यासाचा अनुभव कामास आला. लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करताना त्यांची मोलाची मदत झाली. सिसोदिया यांचे पत्रकारेतील शिक्षण व नंतर झी न्यूज सारख्या न्यूज चॅनेलसोबत कामाचा अनुभव हा गुरु बळातून मिळाला. अनुभवातून भारतीय जनमानसाची नस, राजकारण कळले.

गुरु ग्रह हा नेतृत्वाचा व समाजकारणाचा कारक ग्रह असल्याने व सिसोदिया यांच्या हातावर गुरु ग्रह शुभ असल्याने त्यांना राजकारणातील संधीच्या वाटा सहजासहजी मिळाल्या. जनलोकपाल आंदोलनात सक्रिय असलेल्या केजरीवाल व सिसोदिया यांना आयती प्रसिद्धी व संधी मिळाली. सिसोदिया यांची राजकारणातील कोरी पाटी दिल्लीच्या राजकारणात कामाला आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले परिवर्तन हे केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित नाही. त्यांनी उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदलांसाठी पुढाकार घेतला आहे. ज्यात तीन नाविन्यपूर्ण राज्य विद्यापीठे, ज्यात दिल्ली कौशल्य आणि उद्योजकता विद्यापीठ ,दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा समावेश आहे.

सप्त ग्रहांची कृपा- सिसोदिया यांच्या हातावर सप्तग्रहांची कृपा आहे. कारण हातावरील ग्रहांचे उभार मोठे आहेत. ग्रहांवर आडव्या तिडव्या रेषा नाहीत. सिसोदिया यांच्या हातावर मुख्य रेषा सोडून बाकीच्या प्रभाव रेषा नगण्य आहेत. त्यामुळे त्यांचे हातावरील चार बोटांखाली अनुक्रमे पहिल्या बोटापासून असलेले, गुरु, शनि, रवी, बुध हे ग्रह शुभ आहेत. या ग्रहावरील बोटे व त्यांची पेरे प्रमाणात आहेत. बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यावर यव चिन्ह असल्याने बोटाखालील ग्रहात शुभतेची आणखी भर घातली आहे. हातावरील दोनही मंगळ ग्रह, शुक्र व चंद्र ग्रह स्वच्छ उभार घेतलेले व आडव्या तिडव्या रेषा नसलेले आहेत व स्व स्थानी आहेत, त्या मुळे सिसोदिया यांच्या हातावर सप्त ग्रहांची शुभ साथ लाभली आहे. संपूर्ण तळहातावरील ग्रहांचे उभार इतके स्वच्छ व शुभदायी क्वचितच आढळतात, सिसोदिया यांच्या हाताकडे बघितले कि हातावर नरम गुबगुबीत गादिसारखे उभार दिसून येतात. हृदय रेषेने गुरु ग्रह छोटा केला आहे व तसेच शनि ग्रहावर सुद्धा हृदय रेषेची एक सिस्टर लाईन, हृदय रेषेचा तुकडा शनी ग्रहावर आडवा आहे या दोन रेषा जर सोडल्या तर हातावर आडव्या रेषा नाहीत.

हृदय रेषेतील दोष- सिसोदिया यांच्या हातावरील हृदय रेषेत दोष आहे. कारण हृदय रेषा गुरु ग्रहावरून उगम पावताना ती सरळ रेषेत करंगळीच्या खाली बुध ग्रहावर गेली आहे. वस्तुतः हृदय रेषा ही धनुष्याच्या आकारासारखी कमानदार असल्यास ती अत्यंत उत्तम समजली जाते. हृदय रेषा कमानदार असता असे लोक सहृदयी, प्रेम व वात्सल्ययुक्त, निस्वार्थी, धार्मिक, कायदे पाळणारे, नीतिवान व त्यांच्या उत्पन्नाचे साधन हे नेहमी नेक मार्गाने असते. हृदय रेषा हातावर येथून तेथून सरळ रेषेत असता असे लोक मायाळू नसतात. प्रेम वात्सल्य असले तरी तो स्वार्थासाठी असतो. असे लोक स्वतः च्या उद्धाराचा जास्त विचार करतात. भावनशीलता अत्यंत कमी असते. गुरु ग्रहावर असलेल्या या आडव्या सरळ हृदय रेषेच्या अशुभ फळापासून बचाव करण्यासाठी सिसोदिया यांना अंगठीतील पुष्कराज रत्न हाताच्या आतल्या बाजूने ठेवण्याचा ज्योतिषाचा सल्ला असावा.

मस्तक रेषेवरील चौकोन चिन्ह - हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हृदय रेषा व मस्तक रेषेवरील त्रिकोण चिन्ह हे स्थावर जंगम मालमत्ता किंवा गुंतवलेली मोठी रक्कम दर्शवितात. चौकोन चिन्ह जितके मोठे तितकी गुंतवणूक मोठी असते सिसोदिया यांच्या हातावरील त्रिकोण चिन्ह मस्तक रेषेपासून सुरु होऊन ते जवळजवळ हृदय रेषेपर्यंत गेले आहे. त्रिकोण चिन्ह हृदय रेषेच्या खाली आहे. हृदय रेषेजवळ भाग्य रेषा छेद देताना सरासरी वय 55 येते. हातावर भाग्य रेषेच्या आधाराने झालेला मोठा त्रिकोण वय वर्ष 50 दाखविते. म्हणजे वयाच्या 50 व्या वर्षी त्यांच्या भाग्याचा त्रिकोणानुसार मोठी प्रॉपर्टी होणार हे निश्चित आहे. सिसोदिया यांचा जन्म 5 जानेवारी 1972 चा आहे. 5 जानेवारी 2023 रोजी ते 51 वर्ष पूर्ण करतील.

भाग्य रेषा - भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेच्या तुकड्यातून हाताच्या तळहाताकडून झाल्याने सिसोदिया भाग्यवंत आहेत. 90टक्के राजकारण्यांच्या हातावरची भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावताना दिसते किंवा असते. भाग्य रेषा हातावर उगम पावताना ती आयुष्य रेषेतून उगम पावत असेल तर अशा लोकांची कामे सहज होतात. यांच्या नशिबी यश हे यांच्या प्रत्येक प्रयत्नात असते. कामे सहज होतात. आयुष्यात अडथळे आले तरी त्याचे निराकरण थोड्या अवधीत होते. आयुष्यात कायमस्वरूपी अडथळा किंवा खोडा असत नाही. जीवनातील प्रश्न सुटत जातात व म्हणूनच हे लोक भाग्यवंत म्हटले जातात.

मजबूत अंगठा - हस्तसामुद्रिकशास्त्रात मजबूत अंगठ्याचे माहात्म्य खूप मोठे आहे. संपूर्ण व्यक्तीचे व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, कामाची उरक, बुद्धी, कौशल्य, कल्पना, निर्धार व स्वतःच्या तत्वाशी बांधिलकी असणारे लोक हे मजबूत अंगठ्याचे असतात. अंगठ्याच्या पहिल्या व दुसर्‍या पेर्‍यावर आडव्या रेषा नसाव्यात. ह्या आडव्या रेषा कामात व्यत्यय, आळस, घिसडघाई व कल्पनांच्या विचारात अडथळे आणणारे ठरतात. म्हणूनच अंगठ्याचे पहिले व दुसरे पेर मोठे व स्वच्छ असावे लागते. ते सिसोदिया यांचे आहे.

शनि ग्रहाच्या च्या दरम्यानच्या आडवी रेषा- गुरु शनि ग्रहाच्या दरम्यानच्या हृदय रेषेच्या एका तुकड्याची आडवी रेषा सिसोदिया यांचे हातावर आहे. ही रेषा सिसोदिया यांच्या आयुष्यात अडथळा ठरणार आहे. हातावरील शुक्र, दोनही मंगळ चंद्र व बुध ग्रह उच्चीचे आहेत. सिसोदिया यांच्या तळहातावरील सप्त ग्रह शुभ आहेत. त्यांच्या ग्रहांच्या शुभत्वाचा आलेख पहिला तर सर्वात शेवटी सहा व सात नंबर गुरु व शनि ग्रहाचा लागतो. व्यक्तीच्या हातावर तीन ते चार उच्चीचे ग्रह असता व्यक्ति भाग्यवान समजली जाते. सिसोदिया यांचे हातावर पांच ग्रह उच्चीचे व दोन ग्रह शनि व गुरु कमी ताकदीचे आहेत,तरी पण शनि व गुरु ग्रह निष्प्रभ नाहीत त्यांच्यातील 60 व 70 टक्के असलेल्या शुभत्वाचा फायदा सिसोदिया यांना होतच रहाणार आहे. तीस ते चाळीशी टक्क्याने शनि व गुरूच्या अशुभ फळामुळे सिसोदिया यांची राष्ट्रीय राजकारणातीळ घोडदौड सीमित राहणार आहे व त्याला शनि व गुरु ग्रहावरील आडव्या रेषेचा हृदय रेषेचा तुकडा कारणीभूत आहे.

गुरु बोटात पुष्कराज रत्नाची अंगठी- हृदय रेषेने गुरु बळ कमी केल्याने व त्याचे शुभत्व वाढावे या हेतूने सिसोदिया यांना पुष्कराज रत्नाची अंगठी घालण्याचा ज्योतिष्याने सल्ला दिला असणार आहे. तसेच पुष्कराज रत्नाची अंगठी सिसोदिया हे उलटी परीधान करतात. हा सल्ला सुद्धा ज्योतिषाचाच. कारण पुष्कराज रत्न हे हाताच्या पहिल्या बोटात घातले असता ते रत्न बोटाच्या बाहेरच्या बाजूने परिधान करायाचे असते. सिसोदिया यांना त्यांच्या गुरु बोटातील दोष घालविण्यासाठी पुष्कराज रत्न तळहाताच्या बाजूने ते परिधान करतात. ते हृदय रेषेच्या समीप येऊन गुरु ग्रहावर प्रत्यक्ष्य जवळून प्रभाव पडावा हा हेतू ज्योतिषाचा सल्ल्यात दिसतो. पुष्कराज रत्न तळहाताकडे गुरु-शनिच्या ग्रहाकडे ठेवल्याने गुरु व शनि ग्रहाच्या शुभ कारकत्वाची वृद्धी होईल. हा एक रत्न शास्त्रानुसार उपाय आहे. शनी ग्रहाकडे चुकीला माफी नाही. त्यामुळे सिसोदिया यांनी त्यांच्या आयुष्यात चुका केल्या तर शनि नाराज होणार तसेच समाजकार्य करताना स्वतःचा स्वार्थ पाहिला तर शनि महाराज राष्ट्रीय नेतृत्वाची घोडदौड थांबविणार असे संकेत आहेत.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com