शनि ग्रहाने केली खडसेंची अडचण

भविष्य आपल्या हाती
शनि ग्रहाने केली खडसेंची अडचण

एकनाथ खडसे यांचा जन्म 2 सप्टेंबर 1952 रोजी झाला. खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. 2019 पर्यंत सलग सहा वेळा मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. खडसे हे 1987 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. कोथळी गावात ग्रामपंचायत निवडणूक लढवताना खडसे यांचा पहिला पराभव झाला. नंतर 1984 मध्ये गावचे सरपंच झाले. 1987 पर्यंत ते सरपंच होतेे. 1989 मध्ये ते मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

खडसे यांना 3 जून 2016 रोजी पुण्यातील जमिन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील तीन एकर (1.2 हेक्टर) औद्योगिक भूखंड पत्नीच्या नावे बेकायदेशीरपणे बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन खरेदी केल्याचा आरोप झाला. पुणे जमीन व्यवहार आणि खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या इतर आरोपांची योग्य चौकशी करू असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. खडसे यांनी नंतर दावा केला की पुणे येथील जमीन त्यांच्या पत्नी मंदा खडसे यांनी खरेदी केली होती आणि त्यांचा वैयक्तिकरित्या काहीही संबंध नाही. मात्र याच प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्द माघारली.

खडसे यांनी 1980 च्या दशकात भाजप कार्यकर्ता म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि भाजप पक्षाला उत्तर महाराष्ट्रात पाय रोवण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. 1990 च्या दशकात खडसेंनी रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवकांचे नेतृत्व केले. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी येथे अटक केली आणि एक महिन्यासाठी तुरुंगात टाकले होते. त्यांनी भाजपत एकनिष्ठ राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सुमारे चार दशके ते भाजपत होते. संधी आली तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. त्यांनी अनेक मंत्रालयाचा कारभार यशस्वी सांभाळला. परंतु स्पष्टवक्ता असल्याने ते मीडियात कायम चर्चेचा विषय राहिले. राजकारणात कायम खच्चीकरण करण होत राहिल्याने ते कायम असुरक्षित व अस्वस्थ आहेत. एवढे असूनही त्यांची जनमानसावर व राजकारणावर पकड कायम आहे.

आज आपण खडसे यांच्या उजव्या हातावरील भाग्य जाणून घेणार आहोत. एकनाथ खडसे यांच्या हाताचा आकार रुंद, बोटे तळहातापेक्षा लांबीला बुटके, अंगठा व पंजा मजबूत आहे. लांबीला छोटी बोटे जलद निर्णय घेण्याची क्षमता असते. मागचा पुढचा विचार न करता जलद निर्णय यांचा होत असतो. कधी कधी घाईनं घेतलेल्या निर्णयामुळे तोटेसुद्धा सहन करावे लागतात. चारही बोटाखालील गुरु, शनी, रवि व बुध ग्रह यांचा विस्तार सामान्यापेक्षा जास्त आहे. या चार ग्रहाचा विस्तार अति झाल्याने या चार ग्रहात थोडी न्यूनता आली आहे. गुरु, शनी, रवि व बुध ग्रह यांचा जास्तीचा विस्तार हा हातावरील हृदय रेषा सामान्यापेक्षा खूपच खाली उगम पावत असल्याने झाला आहे. गुरु ग्रहाचा विस्तार तर खूपच मोठा आहे. या गुरु ग्रहाच्या विस्तारामुळे गुरु ग्रहाची काही अंशी अशुभ फळे प्राप्त होतात. त्यात कोणाचे ऐकून न घेणे ही प्रवृत्ती असते. परंतु मस्तक रेषा, आयुष्य रेषा वय वर्ष जवळजवळ चाळीस वर्षांपर्यंत उगमापासून एकत्रित असल्यान यांच्यात निष्ठा व ऐकण्याची प्रवृत्ती असते. ते संस्कारक्षम असतात.

अंगठा - खडसे यांचा अंगठा मजबूत व मोठा आहे. त्यावरील दोनही पेरे प्रमाणात आहेत. अंगठ्याच्या या आकारामुळे खडसे यांची कोणाच्या अधिपत्याखाली कायम राहण्याची प्रवृत्ती नाही. त्यांचे निर्णय स्वतंत्र असतात व त्यांची अंमलबजावणीही विनाविलंब असते. खालचा मंगळ ग्रह अंगठ्याच्या आतील आयुष्य रेषेच्या खाली असलेला खालचा मंगळ ग्रह बलवान आहे. हा मंगळ ग्रह, अरे ला कारे म्हणण्याची ताकद व धाडस प्रदान करतो आहे. अंगठ्याच्या मजबुतीसोबत असलेल्या या बलवान मंगळ ग्रहांमुळे एकनाथ कोणाला घाबरत नाहीत व घेतलेल्या निर्णयांची व त्यांच्यामुळे होणार्‍या परिणामांची पर्वा करीत नाहीत.

मंगळ रेषा - आयुष्यरेषेच्या आत असलेली व वयाच्या 35 वर्षानंतर उगम पाऊन मणिबंधापर्यंत गेलेली मंगळ रेषा खडसे यांना अधिकची ऊर्जा प्रदान करीत आहे. 70 च्या वयात ही उर्जावान ठेवणारी मंगळ रेषा पुढेही आयुष्यभर खडसेंना ऊर्जा देत राहणार आहे. खालचा मंगळ मोठा, मंगळ रेषा मोठी त्यामुळे खडसे यांच्या स्वभावात चटकन येणार्‍या क्रोधाची मात्रा अधिकची आहे. त्यातच त्यांना खोटेपणा सहन होत नसल्याने शीघ्रकोपाची भावना वाढीस लागते. मंगळ रेषा, खालचा मंगळ ग्रह हे खडसे यांच्या अंगात धाडस प्रदान करीत आहे. आयुष्यात न डगमगता वाटचाल करण्याची शक्ती प्रदान करीत आहेत.

भाग्य रेषेचा मणिबंधातून उगम - भाग्य रेषेचा मणिबंधातून उगम होऊन ती थेट शनि ग्रहावर गेली आहे, त्या मुळे खडसे हे भाग्यवान आहेत. त्यांना त्यांचा आयुष्यात आर्थिक आवक संबधी कधीही अडचण आली नाही. कारण त्यांना लक्ष्मी प्रसन्न आहे. कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य असेल किंवा पोटापाण्याची चिंता नसेल तर अशा व्यक्ती त्यांच्या जीवनात सामाजिक, धार्मिक कामात, राजकारणात, अथवा व्यवसायात यशस्वी होतात. कारण त्यांच्या जीवनात त्यांचे योगदान हे शंभर टक्के समर्पित असते व त्या मुळेच अश्या व्यक्ति त्यांच्या यशस्वी होतात व उत्तुंग शिखरे गाठतात.

बुध रेषेतून रवी रेषेचा उगम- रवी रेषा, बुध अथवा भाग्य या रेषेंचा उगम हा जर हातावरील प्रमुख रेषेतून होत असेल तर अश्या वेळेस त्या रेषेचे कारकत्व वाढते व या रेषा आप आपल्या ग्रहावर एकेरी किंवा एकट्या जाऊन पोहोचत असतील तर अनेक पटीने त्या व्यक्तीला शुभत्व प्रदान करतात. खडसे यांच्या हातावर बुध रेषेतून रवी रेषेचा उगम झाल्याने त्यांनी आपल्या हुशारीने समाज मानसात मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. मस्तक रेषा शनि ग्रहाकडे ओढली गेली. खडसे यांच्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषा 37 वर्षापर्यंत एकत्र आहेत. या काळात त्यांना स्वतंत्र निर्णय करण्यात अडचणी येत असणार, परंतु पुढे मस्तक रेषा आयुष्य रेषेपासून स्वतंत्र झाल्यावर त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीत व निर्णय क्षमतेत निश्चित वाढ झाली असणार आहे. परंतु मस्तक रेषा आयुष्य रेषेतून स्वतंत्र झाल्यानंतर ती खाली चंद्र अथवा वरच्या मंगळ ग्रहाकडे न जाता वय वर्ष 50 पर्यंत क्रमाक्रमाने मधल्या बोटाकडे म्हणजेच शनि ग्रहाकडे वरती खेचली गेली आहे. मस्तक रेषा ज्या वेळेस शनी ग्रहाकडे खेचली जाऊन ती हृदय रेषेच्या समीप जाते त्या वेळेस व्यक्ति अस्वस्थ असते, काळजीत राहते. स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास उडतो आणि माझे काय होईल, माझे स्वप्न पूर्ण होईल का नाही या बद्दल साशंक राहते.

काळजीच्या व साशंकतेच्या फेर्‍यात मस्तक रेषा व हृदय रेषा एकमेकाच्या अगदी समीप आल्याने त्यांचा जवळच्या व्यक्तीवरील विश्वाससुद्धा कमी होतो. त्यांना वाटणार्‍या काळजीत ते स्पष्ट व परखड बोल बोलतात. त्यामुळे त्यांच्या जिवाभावाचे लोक त्यांच्यापासून दुरावले गेले असणार. खडसे यांच्या वय वर्ष पन्नास नंतर हृदय रेषेजवळ गेलेली मस्तक रेषा वय वर्ष 69 व 70 पर्यन्त परत खाली उतरत गेली आहे. या वेळेसच त्यांनी भाजपा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. मस्तक रेषा हृदय रेषेकडे खचली जाताना ती तीव्रपणे टोकदार होऊन परत वळतानाचा प्रवास हा मानसिकदृष्ठ्या खूप क्लेशकारक व अस्वस्थ करून सोडणार असतो व अशा वेळेस अनेक संकटांची मालिका सुरु होते. मस्तक रेषा निर्णय क्षमतेची व हुशारीची रेषा आहे. ती जेव्हा शनीकडे खेचली जाते त्यावेळेस काळजी, चिंता व मनासारख्या घटना घडून येत नाहीत. सारासार बुद्धी काम देत नाही, निर्णय चुकतात व याच शनी ग्रहाकडे मस्तक रेषा खेचली गेल्याने व ती हृदय रेषेच्या खूप समीप आल्याने मनाची अवस्था शंकेने ग्रासली जाते. शनी ग्रहाच्या अवकृपेमुळे खडसे यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याचे दिसते.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com