सोमय्यांवर गुरुचा वरदहस्त

भविष्य आपल्या हाती
सोमय्यांवर गुरुचा वरदहस्त

प्रफुुुल्ल कुलकर्णी

भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांचा जन्म मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी 1979 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पदवी संपादन केली आणि अखिल भारतीय गुणवत्ता यादीतही स्थान मिळवले. त्यांना 2005 मध्ये मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांनी मेधा सोमय्या यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आहे.

विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून सोमय्या यांनी 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या बिहार चळवळीत भाग घेतला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या मुलुंड विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1995 मध्ये सोमय्या यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्राचा लघु गुंतवणूकदार संरक्षण कायदा, कोरोनर्स कोर्ट कायदा रद्द करणे आणि गृहनिर्माण संस्था कन्व्हेयन्स बिल सादर केले.

सोमय्या यांनी यूपीए सरकार आणि त्याच्या मित्रपक्षांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम चालवली. 16 राज्ये आणि 100 जिल्ह्यांतून अनेक घोटाळ्यांवर ते भुमिका मांडत राहिले. सोमय्या यांनी आपल्या अनेक मंत्री आणि ज्येष्ठ राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

गुरु ग्रहाचा वरदहस्त - किरीट सोमय्या यांचे नावाचा दबदबा आहे. किरीट सोमय्या यांच्या हातात एखादे आर्थिक भ्रष्टचाराचे प्रकरण आले कि त्याच्या मुळाशी जाऊन त्याची तड लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. गुरु ग्रहाचा अति शुभ प्रभाव किरीट सोमय्या यांना लाभला आहे. थोडक्यात सोमय्या यांचेवर गुरु महाराज प्रसन्न आहेत. गुरु हा शुभ फळ देणारा ग्रह आहे. तो व्यक्तीला प्रभावशाली, विश्लेषकी, अचूक पृथकरण, अभ्यासू, अनुशासन, शिस्त, न्यायिक विचार व विद्वत्ता प्रदान करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे नेतृत्व करण्यास उद्युक्त करतो.

हस्तसामुद्रिकदृष्टया गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव व्यक्तीवर असता ते तपासण्यासाठी हातावरील पहिले बोट; गुरु चे बोट व त्याचा आकार, बोटांच्या पेर्‍यांची लांबी,गुरु ग्रह, गुरु ग्रहावरची चिन्हे, गुरू वलय, गुरु ग्रहावरील मस्तक रेषेचा उगम, गुरु ग्रहाखाली असलेली आयुष्य व मस्तक रेषेंचा उगम. गुरु ग्रहाकडे वळलेली भाग्य रेषा या सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो. गुरु ग्रहाच्या शुभ प्रभावाखाली असलेले व्यक्ती सात्विक, न्यायी, विद्याभूषित व कायद्याचे पालन करणारी व त्यांचे आर्थिक लाभाचा व्यवसाय किंवा त्यांना येणारे उत्पन्न हे नेहमी नेक मार्गाने आलेले असत. गुरु प्रभावी व्यक्ती कधीही आर्थिक लाभासाठी लबाडीचा मार्ग अवलंबत नाहीत.

गुरुचे बोट- उजव्या हातावरील गुरुचे बोट शनी बोटाइतके लांब असल्याने सोमय्या यांना उपजत नेतृत्व करण्याची व लोकोपयोगी सामाजिक कार्यात झोकून द्यायची प्रवृत्ती अंगी प्राप्त आहे. गुरु बोटाची तीनही पेरे स्वच्छ व निर्दोष आहेत त्यामुळे पेर्‍यांचे कारकत्व अनुक्रमे अध्यात्म,महत्वाकांक्षा व ज्ञान यांचा मिलाफ झाला आहे. सोमय्या यांच्या गुरु ग्रहाच्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍याला स्पर्श करून हृदय रेषेचा उगम आहे. असा हृदय रेषेचा उगम हातावर असता या व्यक्ती निष्ठावान, पापभिरू व सज्जन असतात. गुरु ग्रहावर गुरु वलय झाले आहे. त्यामुळे गुरु ग्रहाची सात्विकता लाभली आहे. गुरु वलय असता असे लोक व्यापारी नसतात. रुपयाचे दहा रुपये कसे होतील ह्या प्रवृत्तीचे नसतात.

सरळ मार्गाने यांच्या आयुष्याचे मार्गक्रमण असते. गुरु ग्रहाच्या सांनिध्यात मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांचा एकत्रित उगम होत आहे. या आयुष्य व मस्तक रेषा उजव्या हातावर सोमय्या यांच्या वय वर्ष 30 पर्यंत आहे. आयुष्य रेषा व मस्तक रेषा यांचा उगम एकत्रित असता असे लोक आज्ञाधारक व संस्कारी असतात. सहसा हे वडीलधार्‍यांची व श्रेष्टींची आज्ञा मोडत नाही. सामाजिक, धार्मिक बंधनांचा आदर करतात. सोमय्या यांचे उजव्या हाताचे गुरुचे बोट शनि बोटाकडे खेचले गेले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या स्वभावात अस्वस्थता व काळजी असल्याचे दिसते. गुरूच्या बोटाच्या दुसर्‍या पेर्‍यावर यव चिन्ह झाले आहे, हे यव चिन्ह गुरु च्या शुभ तत्वात भर घालणारे आहे. तळहातावर यव चिन्ह हे ग्रहांवर व रेषांवर असता अशुभ समजले जाते. यव चिन्ह बोटांच्या पेर्‍यावर, अंगठ्यावर, अंगठ्याच्या मुळाशी व मणिबंधात असता अत्यंत शुभ समजले जाते.

उजव्या हातावरील शनि ग्रह व बोट - सोमय्या यांच्या उजव्या हातावरील मधले म्हणजे शनिचे बोट बाकीच्या बोटांपेक्षा खूप जाड आहे. त्यामुळे शनी ग्रहाच्या शुभ कारकत्वाचा लाभ झाला आहे. शनी ग्रह उभारयुक्त आहे. यामुळे तो उच्चीचा आहे. शनी ग्रह स्वच्छ आहे.

शनी ग्रहावर एक आडवी रेषा शनि व गुरु ग्रहाच्या बोटांच्या पेर्‍यात गेली आहे. ही रेषा भाग्य रेषेला जोडल्या गेल्याने सामाजिक व धार्मिक कामासाठी सोमय्या स्वतःचे धन खर्ची करतात. शनिच्या बोटाच्या दुसर्‍या पेर्‍यावर यव चिन्ह आहे. यामुळे शनिच्या शुभ गुणधर्मात वाढ झाली आहे. शनी ग्रह व शनीचे बोट यांना शुभत्व लाभल्याने सोमय्या यांच्या अंगी चिकाटी लाभली आहे. या चिकाटीमुळे व किचकट गणिती अभ्यासात सीए पदवी प्राप्त करताना अखिल भारतीय परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

त्यांनी शेयर बाजारावर संशोधन करून पीएचडी मिळविली आहे. शनि ग्रहाच्या कारकत्वात नीतिवान प्रवृत्ती, अवघड गणित व त्याचे संशोधन, शास्त्राची आवड व चिकाटीशिवाय पुराव्यासहित शत्रुत्व स्वीकारण्याची हिम्मत दिली आहे. भ्रष्टाचारी लोकांच्या कागदपत्रांचा अभ्यास व त्यांचे संतुलित अचूक निदान व खुलेआम आरोप करणारे सोमय्या यांना गुरु व शनि या ग्रहांनी खूप मोठे पाठबळ दिले आहे.

उजव्या हाताचे रवी बोट- सोमय्या यांच्या उजव्या हाताचे रवी बोट मधल्या शनिच्या बोटाएव्हडेच लांब आहे. त्यामुळे प्रसिद्धीची लालसा आहे. रवी ग्रहावरीळ रवी रेषा गोलाकार होऊन बुध रवीच्या बोटांच्या पेर्‍यात गेली आहे. ही रेषा अंतरराष्ट्रीय कीर्ती प्रसिद्धी देते. रवी रेषा रवी ग्रहावर अर्ध वर्तुळाकार आहे व तिचा गोलाईची भाग शनी ग्रहाकडे खेचला गेलेला आहे. शनि ग्रहाकडे खेचल्या गेलेल्या याभागाने, चिकाटीने अभ्यासपूर्ण भ्रष्टाराच्या प्रकरणात कागदपत्रांची जंत्री जोडल्याने त्यांची ख्याती वाढली गेली. रवी बोटावर सुद्धा दुसर्‍या पेर्‍यावर यव चिन्ह आहे व ते शुभत्व देत आहे.

त्यांच्या हातावरील भाग्य रेषा ते आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटूंबात जन्माला आलेले आहेत हे दाखविते. डाव्या व उजव्या हातावरची भाग्य रेषा हि सोमय्या यांच्या वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत अति सामान्य आहे. सोमय्या यांच्या हातावरील आयुष्य रेषा उत्तम असून वयाच्या 25 वर्षापासून मंगळ रेषा उदित झाल्याने त्यांना मंगळ रेषेने अधिकची शारीरिक ऊर्जा प्रदान केली आहे. हातावरील अंगठे मजबूत आहे. ह्या अंगठ्यात निर्णये क्षमता व स्वातंत्र्य आहे. ते कोणाच्याही अधिपत्याखाली राहू शकत नाही.

अंगठ्यांच्या वरील दोनही पेरे स्वच्छ पूर्ण लांबीचे आहेत, त्या मुळे पहिल्या पेर्‍याकडून विविध कल्पनांचे ग्रहण होत असतात त्या आलेल्या कल्पनेप्रमाणे त्यावर अंमलबजावणी त्वरित होते. कारण, अंगठ्याचे दुसरे पेर हे व्यक्तीला ठरवलेले कामाविना आळसपूर्ण करण्याची क्षमता देते. दोन्ही हातावरची मस्तक रेषा लांब असल्याने सोमय्या बुद्धिवान आहेत व या मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेल्या नाहीत, त्या थोड्याश्या तिरक्या होऊन करंगळीच्या खाली हाताच्या कडे पर्यंत गेल्या आहे. या मस्तक रेषेंच्या थोड्याश्ेया तिरक्या वळणाने वरचा मंगळ ग्रह प्रमाणात विस्तारित झाला आहे. या वरच्या मंगळ ग्रहाला बाहेरून उभार असल्याने तो बलवान झाल्याने विरोधकांचा बिमोड करताना बोलण्यापेक्षा कृतीतून म्हणजेच पुरावे जमा करून मात व शह देण्याची हुशारी दिली आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com