
खा. नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुबंईत झाला. 2019 साली अमरावती मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या. खा.नवनीत या आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. त्या अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांनी मुख्यत्वे तेलुगू सिनेमात काम केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या. 3 फेब्रुवारी 2011 रोजी अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा मिळाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा आंदोलनामुळे त्यां प्रसिद्धीच्या झोतात आल्या. मुंबई पोलिसांनी त्यांना याप्रकरणी अटक केली होती.
प्रफुुुल्ल कुलकर्णी
उजवा हात - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून त्यांना पराभव झाला. मात्र 2019 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली. नवनीत कौर राणा यांच्या राजकीय विजयातील भाग्याची बाजू पाहणार आहोत. त्यांच्या हातावरची भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पावून शनी बोटाच्या क्षेत्रात थेट बोटाखाली शनी ग्रहावर येऊन विराजमान झाली आहे. भाग्य रेषा हातावरची सर्वात लांब रेषा आहे. आयुष्य रेषेचा फाटा वय वर्ष 55 मध्ये भाग्यरेषेत विलीन झाला आहे. भाग्य रेषा अत्यंत शुभ असल्याने आयुष्यात ऐश्वर्य आहे. भाग्याची साथ असल्याने खूप कमी वयात त्या खासदार म्हणून निवडून आल्या. राजकीय जीवनात गुरुची साथ महत्वाची असते, गुरु ग्रह प्रसन्न असल्याशिवाय नेतृत्वाची संधी मिळत नाही. त्यांच्या हातावरील गुरु ग्रह शुभ आहेच, शिवाय गुरु ग्रहावर गुरु वलय आहे. गुरु ग्रहावरील गुरु वलय आध्यात्मिक, धार्मिक, नैतिक आचरण देते. अनीतीच्या कामापासून परावृत्त करते.
प्रभावशाली व्यक्तिमत्व
जनमानसातील स्वच्छ प्रतिमेचा प्रभाव, हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांच्या संवाद प्रभावशाली आहे. आपली भूमिका जनमानसात ठसविण्यासाठी त्यांना याचा उपयोग झाला. प्रभावशाली व्यक्तिमत्व जनमानसावर भुरळ घालणारे आहे. नवनीत यांचे शुक्र प्रभावी आकर्षक व्यक्तिमत्व आहे. जनतेसमोर येताना त्यांचा पेहराव महाराष्ट्रीयन पद्धतीचा असतो.त्यामुळे त्या आपल्यापैकी एक आहेत, ही भावना जनमाणसात राहते. व्यक्तित्व खुलविण्यासाठी त्यांच्या हातावरील शुभ असलेल्या शुक्र व बुध ग्रहाची मौलिक साथ त्यांना आहे. आकर्षक व्यक्तिमत्व हे भाग्यातच असावे लागते. आकर्षक व्यक्तिमत्वात शुक्र ग्रहाची साथ असावी लागते. शुक्र ग्रह प्रसन्न असता अलौकिक सौंदर्य बहाल होते.
राजकारणात नवीन असल्याने त्यांची राजकीय पाटी कोरी होती. रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या जनसंपर्काचा व कार्याचा लाभ नवनीत यांना झाला. राजकीय आघाडीवर पारंपरिक तूल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने व दोनही काँग्रेस पक्षांनी तत्कालीन स्थितीत पाठिंबा दिल्याने त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सोपी ठरली. त्यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. परंतु त्यांनी जसंपर्क कायम ठेवला. नवनीत राणा यांच्या खरा भाग्यविधाता रवी राणा आहेत. त्यांची राजकारणातील दूरदृष्टी, जनतेतील संपर्क व अमरावतीतील राजकीय परिस्थितीचा अचूक अंदाज असल्याने त्यांनी नवनीत राणा यांना राजकारणात उतरविले. पुढे नवनीत राणा यांना त्यांच्या भाग्याची साथ लाभली.
चंद्र प्रभावी प्रतिभा रेषा
नवनीत कौर राणा यांच्या हातावर चंद्र प्रभावी प्रतिभा रेषा मणिबंधापासून उगम पाऊन भाग्य रेषेत जाऊन विलीन होत आहे. ही रेषा प्रगल्भ प्रतिभेची आहे. त्यामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीत यश मिळविले व राजकारणही गाजवत आहेत. शुक्र ग्रहाच्या खाली एक प्रभाव रेषा मंगळ रेषा व भाग्य रेषेला छेद देऊन चंद्र ग्रहावर गेली आहे. चंद्र ग्रहावरून एक आडवी येणारी रेषा शुक्र ग्रहावरून येणार्या रेषेस जाऊन मिळत असल्याने चंद्र शुक्र युती योग झाला आहे. या चंद्र शुक्र युती योगाने चंद्र व शुक्र ग्रहाचे शुभ गुण प्रदान झाले आहेत.
मंगळ रेषा अधिकची ऊर्जा प्रदान करते
नवनीत कौर यांच्या हातावर मंगळ रेषा वय वर्ष 20 पासून उगम पावत असून अखंड मणिबंधापर्यंत गेली आहे. आयुष्य रेषा भाग्य रेषेत विलीन होत असल्याने भाग्य रेषा आयुष्य रेषेचे काम करीत आहे. ही भाग्य रेषा मणिबंधापर्यंत खाली जाताना आयुष्य रेषेचे काम करीत आहे. भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पाऊन ती मधल्या बोटांकडे जाते. नवनीत कौर यांच्या हातावरील भाग्य रेषा आयुष्य रेषेचेही काम करीत असल्याने, जीवनदायी तत्व मणिबंधाकडे प्रवाहित करीत आहे. भाग्य रेषेचे तत्व, म्हणजे आयुष्याचे आर्थिक गणित मधल्या बोटांकडे वर प्रवाहित करीत आहे.
भाग्य रेषेतून बुध रेषेचा उगम
भाग्य रेषेतून बुध रेषेचा उगम होत असल्याने त्यांना बुध ग्रहाच्या चातुर्याची भाग्याला साथ लाभली आहे. रवी राणा यांची पती म्हणून निवड, वयाच्या 30 व्या वर्षी राजकारणात प्रवेश व लोकसभेसाठी उमेदवारी, 35 व्या वर्षी पुन्हा लोकसभेसाठी प्रयत्न व विजयी पताका. लग्न झाल्यानंतर चित्रपटसृष्टीला पूर्ण विराम. हनुमान चालीसा आंदोलन, दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या अटकेविरुद्ध व महाराष्ट्र पोलीस यंत्रणेविरुद्ध उठवलेला आवाज इत्यादी अनेक फंडे बुध ग्रहाच्या हुशारीने नवनीत राणा यांनी अंमलात आणले.
शनी ग्रहावरील भाग्य रेषेला ग्रासलेली आडवी रेषा
नवनीत राणा यांच्या हातावरील शनी ग्रहावर आडवी रेषा आहे. आडवी रेषा भाग्य रेषेवर आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या जीवनात राजकारणातील जय पराजयाची मालिका चालूच राहाणार आहे. परंतु राजकारणापासून नवनीत राणा दूर राहू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथ त्यांना निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते. परंतु भाग्य त्यांना साथ देणारे ठरणार आहे. नवनीत राणा व रवी राणा यांचे राजकीय निर्णय व नेत्यांशी अबाधित राहिलेले संबंध निवडणुकीपर्यंत कसे राहतात यावर बर्याच गोष्टी अवलंबून राहतील. एक हुशार व प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या नवनीत राणा लोकसभेत गाजत राहाणार व युवा खासदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्यांचेकडून होत राहणार हे मात्र निश्चित.
8888747274
ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड