विद्वत्तेतून राजकारणात...जयराम रमेश

भविष्य आपल्या हाती
विद्वत्तेतून राजकारणात...जयराम रमेश

जयराम रमेश यांचा जन्म 9 एप्रिल 1954 रोजी कर्नाटकातील चिकमंगळूर येथे झाला. त्यांचे वडील सी.के. रमेश आणि आई श्रीदेवी रमेश. त्यांचे वडील आयआयटी बॉम्बेमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक होते. ते स्वत:ला बौद्ध धर्मात रुजलेला हिंदू मानतात आणि स्वत:ला हिंद-बुद्ध म्हणतात. लहानपणापासून जयराम यांच्यावर जवाहरलाल नेहरूंचा प्रभाव होता. नेहरूंचा जीवनाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टीकोन, त्यांनी पारंपरिक समाजात बदल घडवून आणला आणि जीवन, धर्म, पुरुष आणि नागरी बाबींबद्दलचा त्यांचा उदारमतवादी, मानवतावादी, तर्कसंगत दृष्टीकोन पाहून त्यांना भुरळ पडली. ते स्वतःला अनेक अर्थांनी नेहरूयुगीन काळातील उत्पादन मानतात. एक अतिरिक्त प्रभाव महात्मा गांधींचा होता. जसजसे ते मोठे होत गेले आणि गांधींना अधिक वाचले आणि ज्या राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भात त्यांनी कार्य केले त्या संदर्भात त्यांना पाहिले, त्यांना गांधींचे अधिक कौतुक आणि मान्यता मिळाली. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचाही सखोल अभ्यास केला आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

जयराम यांनी सेंट झेवियर्स स्कूल, रांची 1961-1963 मध्ये 3 ते 5 इयत्तेत शिक्षण घेतले. जयराम यांनी 1975 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक. यांत्रिक अभियांत्रिकी विषयात केले. 1975-77 च्या दरम्यान त्यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या हेन्झ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि पब्लिक पॉलिसी आणि पब्लिक मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली.

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आहेत. ते खासदार म्हणून राज्यसभेत कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करतात. जुलै 2011 मध्ये जयराम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे ग्रामीण विकास मंत्री आणि मंत्री (अतिरिक्त प्रभार) म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी मे 2009 ते जुलै 2011 या काळात ते पर्यावरण आणि वन मंत्रालयात भारतीय राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री होते.

उजवा हात - विद्वत्ता - परमेश्वर कृपेनेच विद्वत्ता बहाल होते. विद्वत्ता हाताच्या व बोटाच्या आकारावरून, ग्रहांच्या उभारावरून, हातावरील मुख्य व गौण रेषेंच्या पोतावरून त्यांच्या उगम व अस्ताच्या मार्गावरून, बोटांच्या ठश्यांवरून व्यक्तीची विद्वता मोजता येते. हातावरील वर उल्लेख केलेल्या बाबी ब्रह्माचे देणं आहेत. म्हणजे विद्वत्ता अंगी असण्यासाठी किंवा येण्यासाठी कृपा असावी लागते. आईच्या पोटात बाळ 6 महिन्यांचे होईपर्यंत हातावरील रेषा, ठसे व हाताचा आकार बनतो, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. बाळाचा जन्म मात्र नऊ महिन्यांनी होतो. म्हणूनच मानवाच्या हातात प्रयत्नपूर्वक विद्वान बनण्याची किंवा विद्वत्ता अंगी येण्याची कुठलीही कला व तंत्र कामाला येत नाही. शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेत यश मिळविणारेच फक्त विद्वान असतात, असे नव्हे तर, शिक्षणाचा गंध नसणारे अंगठे बहाद्दर सुद्धा विद्वान असतात. शिक्षणाचा अभ्यासक्रम मानवाने बनविला आहे. परंतु जे शिक्षणापासून वंचित राहिले ते विद्वान असत नाहीत असे म्हणता येत नाही. कारण त्यांना कदाचित शिक्षणाची संधी नशिबी मिळाली नसेल किंवा उपलब्ध नसेल.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या व्यक्तीतील विद्वत्ता किती किंवा विद्वत्तेची पातळी किती याचे अचूक सरासरी अनुमान काढता येते. विद्वत्तेच्या पातळीत समाविष्ट होणारे मुख्य ग्रह गुरू, शनी, बुध व चंद्र आहेत ह्या ग्रहांचे शुभत्व किती? यावर बुद्धिमत्ता अथवा विद्वत्तेची पातळी ठरते. विद्वत्तेची पातळी ठरविताना हाताचा व बोटांचा आकार, मजबूत अंगठा, मुख्य रेषा त्यांचा पोत रेषांचा ग्रहांकडील प्रवास व त्यांचा उगम व अस्त, हातावरील प्रभाव रेषेचं कारकत्व इत्यादींचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यात महत्त्वाची भूमिका बोटांवरील शंख, चक्र व शुक्ति सारखे ठसे निर्णायक भूमिकेत असतात व हे ठसे विद्वत्तेची कमाल मर्यादा मोजताना महत्वाचे ठरतात. हातावर प्रभाव रेषांचे जाळे असेल तर विद्वत्ता विखुरली जाते. त्यासाठी हातावर मुख्य रेषा व गौण रेषे व्यतिरिक्त रेषा किंवा रेषांचे जाळे असेल तर विद्वत्ता अनेक कारणाने प्रभावित होते. हातावरील चिन्हांचे सुद्धा मोठे योगदान विद्वत्ता बहाल करण्यात आहे, शुभ चिन्ह जसे कि त्रिकोण, चौकोन, त्रिशूल विद्वत्तेत निखारे आणतात. हातावर सर्व रेषांना आडव्या जाणार्‍या रेषा असतील तर भाग्य साथ देत नाही, विद्वत्ता असूनही ती व्यक्ति नियतीपुढे हतबल असते. हातावरील विद्वान रेषा शनि व रवी ग्रहाच्या बोटांच्यामधून खाली हातावर उतरते, तिची लांबी अर्धा ते एक सेंटीमीटर असते या रेषेला हस्तरेषाशास्त्रात सरस्वती रेषा म्हणून संबोधतात.

हाताचा व बोटांचा आकार जाड व ओबडधोबड असेल, तळहाताची त्वचा खरबुडी असेल, हातावर कायम घाम येत असेल तर अशा व्यक्ती विद्वान असत नाही. हात हातात घेतला की हातावरच्या त्वचेचा स्पर्श खरबरीत लागत असेल तर अशा व्यक्ति विद्वान नसतात त्यांना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो व त्यांचे तर्क व चिकित्सा मर्यादित असते. हात मऊ, गादीसारखा, स्निग्ध, गुलाबी रंगाचा व उबदार असेल तर अशा व्यक्तींकडे सारासार विचारशक्ती, तर्क व कोणतीही गोष्ट सहज समजण्याची व आकलनशक्ती मोठी असते. हातावर सारखा घाम येत असेल तर अशा व्यक्तींची शारीरिक क्षमता कमी असते व रोग प्रतिकारक शक्तीही कमी असते व विषयवासना जास्त असते. वर नमूद केलेल्या बाबी व्यक्तीच्या विद्वत्तेत बाधा आणतात किंवा त्यात भर घालणार्‍या असतात. हाताची मजबूत पकड असेल त्यावेळी अंगठ्याचे सामर्थ्य लक्षात येते, अंगठा मजबूत असता निर्णयक्षमता ठाम असते. जयराम रमेश यांच्या हाताचा पंजा व बोटे यांचा आकार मजबूत आहे, बोटांच्या टोकाला गोलाई आहे,जयराम ज्या संवेदना घेतात त्या प्रत्येक संवेदनांचे पृथ्थकरण त्यांचेकडून होऊन योग्य प्रतिसाद ते देतात.

हाताचा पंजा रुंद व मांसल आहे, हातावर गुलाबी अभा आहे, बोटांची उंची व पेरे प्रमाणात आहेत टोकदार बोटे असतील तर संवेदनांचे पृथ्थकरण न होता त्या आहे तशा आत्मसात केल्याने त्यांचे मूल्यमापन होत नाही व त्यावर विश्वास ठेवला जातो व काही काळानंतर त्या फोल आहेत हे लक्षात आल्यावर त्या सोडून दिल्या जातात. जयराम यांच्या हातावरील सर्व ग्रहांचा उभार प्रमाणात आहे. त्यात शुक्र ग्रह थोडा मोठा आहे. हातावरील मुख्य रेषांचा पोत उत्कृष्ठ प्रतीचा व एकसारखा आहे. जयराम यांच्या हातावरील रेषांचा पोत जाड, पसरट, कमी जास्त जाडीचा व गडद रंगाचा नाही तो एकसारखा असून रेषा थाड्याशा खोल व चमकदार असून एकसारख्या पोताच्या आहेत. हातावरील रेषा वर नमूद केल्याप्रमाणे असतील तर व्यक्ति भाग्यवान असते कारण हातावरून रेषांचा प्रवास हा विविध ग्रहांवरून जाताना त्या त्या ग्रहाचे शुभत्व या रेषा प्राप्त करतात. रेषा एखाद्या ग्रहावर अशुभ झाली कि त्या ग्रहाचे अशुभ परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात.

जयराम रमेश यांच्या हातावरील हृदय रेषा कमानदार व उत्कृष्ठ प्रतीची असून गुरु ग्रहावर पोहोचल्याने गुरु ग्रहाच्या शुभ तत्वाचा लाभ झाला आहे. मस्तक रेषा व आयुष्य रेषा उगम स्थानी वय वर्ष 28 पर्यंत एकत्र आहेत व नंतर त्या अलग झाल्या आहेत. या संयोगामुळे रमेश हे संस्कारक्षम, आज्ञाधारकपणा व सचोटी त्यांच्या कडेस आली आहे. मस्तक रेषा हातावर आडवी लांब पर्यंत आहे ती 15 अंशाने खाली चंद्र ग्रहावर उतरली आहे. त्यामुळे त्यांच्या अंगी व्यवहारीपणासोबत त्यांचे कल्पनाविश्व समृद्ध झाले आहे. वरच्या मंगळ ग्रहावर एक मस्तक रेषेचा फिकट तुकडा हाताच्या बाहेरपर्यंत गेला आहे. ही दुहेरी मस्तकरेषा वरच्या मंगळ ग्रहावर असल्याने त्या रेषेस वरच्या मंगळ ग्रहाचे गुण म्हणजे सारासार विचार शक्ती, युक्तीने कार्य करण्याची कला व शांत चित्ताने शत्रूवर मात करण्याची मानसिकता लाभली आहे. आयुष्य रेषेतून भाग्य रेषा उगम पावते आहे. त्यामुळे जयराम रमेश यांना भाग्याची साथ आहे. आयुष्य रेषा पूर्ण लांबीची व कणखर आहे, गुरु ग्रहावर आयुष्य रेषेतून एक फाटा गेलेला असून हा फाटा जयराम यांना आयुष्यात यशस्वी करणारा आहे. हातावर रवि रेषा जेमतेम आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ छोटा होता व सल्लागाराचा कार्यकाळ मोठा राहिला आहे व राहणार आहे. हातावरील बुध रेषा उत्तम आहे. परंतु स्वतःला पुढे करण्यात ते कमी पडले आहेत. कारण बुध रेषा हृदय रेषे समीपच थांबली आहे. जयराम रमेश यांच्या हाताच्या अभ्यासाने एक विद्वान व्यक्ति राजकारणात स्थिर झाली मंत्रिपद पद प्राप्त केले, तरी त्यांची राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एकनिष्ठ सल्लागाराची भूमिका मोठी होती व आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com