
राजकारणाचा वारसा लाभलेल्या कुटुंबात जन्माला आलेले असदुद्दीन ओवेसी यांची नकीब-ए-मिल्लत (समुदायाचे नेते) म्हणून त्यांची त्यांचे समर्थक प्रशंसा करतात. कारण ते लांब शेरवानी, इस्लामिक टोपी घालतात आणि मुस्लिम पद्धतीची दाढी ठेवतात. ओवैसी यांचे उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांचा जन्म 13 मे 1969 रोजी झाला. राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे ते अध्यक्ष आहेत. भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत, हैदराबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात व 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटरद्वारे जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिम समाजातील नेतृत्वांच्या यादीत त्यांचे नाव आहे.
प्रफुुुल्ल कुलकर्णी
ओवैसी यांचे आजोबा अब्दुल वाहेद ओवैसी यांनी 18 सप्टेंबर 1957 रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यांचे वडील सुलतान सलाउद्दीन 1962 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते. ते 1984 मध्ये पहिल्यांदा हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि 2004 पर्यंत निवडणूक जिंकत राहिले. ते व्यवसायाने बॅरिस्टर आहेत आणि त्यांनी लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेतले.
हस्तसामुद्रिकशास्त्र समस्त मानव जमातीला लागू आहे, त्यात जात पंथ येत नाही. सामुद्रिकशास्त्र हे वैश्विक स्थरावर मान्य असलेले शास्त्र आहे. हातावरच्या रेषा, ग्रह,चिन्ह व बोटांच्या व हाताच्या आकारावरून त्या त्या व्यक्तीचे त्याच्या आयुष्याच्या भविष्य कथना बरोबरच त्या व्यक्तीचे भाग्य व व्यक्तित्व जाणता येते. केवळ भाग्य जाणता येत नाही तर त्या व्यक्तीतील मानसिकता पूर्ण उमजते. ओवेसी हे भाग्यवान आहेतच कारण राजकीय घराण्यात जन्म झाला. पुढे लंडनला जाऊन बॅरीस्टर होण्याची संधी मिळाली. ओवेसी यांचा उजवा हात करंगळीच्या बाजूने जास्त स्पष्ट व स्वच्छ हाताचा फोटो उपलब्ध झाला त्याचे प्रथम विश्लेषण पाहुया.
उजवा संचिताचा हात - हृदय रेषा सरळ बुध ग्रहावरून गुरु ग्रहावर जाऊन पोहोचली आहे, हृदय रेषेला जो धनुष्यासारखा आकार शुभ मानला जातो. परंतु तो सरळ रेषेचा आहे. सरळ रेषेची हृदय रेषा असेल तर व्यक्ति तिचा अंतिम निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठीच कायम घेते. थोडक्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा व्यक्ती अतिशय व्यवहारी निर्णय घेते. ओवैसी यांचे राजकारण स्वतः चे अस्तित्व टिकविण्याचे राहिले आहे, कायम प्रसार माध्यमात ते दिसतात. कारण त्यांच्या हातावरील रवीचे बोट, म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट पहिल्या बोटापेक्षा लांब आहे. त्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहावयास आवडते. मस्तक रेषा व आयुष्य रेषेचा उगम वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत एकत्र आहे. त्यामुळे घरातील धार्मिक संस्काराचा पगडा मोठा आहे.
धार्मिक संस्काराची पकड मस्तक रेषा व आयुष्य रेषा एकत्र राहिल्याने जास्त आहे. लहानपणापासूनच धर्म विचारसरणीची शिकवण व त्याचा प्रभाव ओवेसी यांच्या जीवनात झाला आहे. समोरून घेतलेल्या दुसर्या उजव्या हाताच्या फोटोत रवीचे बोट तिरके झाल्याने ते छोटे दिसत आहे. मस्तक रेषा व आयुष्य रेषा लांबपर्यंत एकत्र आहेत ते स्पष्ट दिसते. हृदय रेषेला मोठा बाक नसला तरी ती गुरु ग्रहावर थांबल्यामुळे गुरु ग्रहाची शुभ तत्वे ओवैसी यांच्यात समाविष्ट आहेत. गुरु ग्रहाचा आकार मोठा आहे. त्यामुळे त्यांचा हम करे सो कायदा आहे. त्यामुळे ते कोणाच्या ऐकण्याच्या मूड मध्ये नसतात. उजव्या हाताच्या पहिल्या फोटोत अंगठ्याचा आकार मजबूत व गोलाईयुक्त आहे. मुळापासून टोकापर्यन्त अंगठा एकसारख्या जाडीचा व सामान्यापेक्षा रुंद आहे. हातावरील अंगठा जाड गोल आकाराचा असला कि असे लोक धाडसी निर्णय घेतात. मागचा पुढचा विचार करीत नाहीत व निर्णयाच्या परिणामांची फिकीर करीत नाहीत.
उजव्या हातावरील करंगळी लांब आहे. त्यामुळे त्यांना बुध ग्रहाची शुभ साथ आहे. ओघवते वक्तृत्व व हुशारी आहे. करंगळी बाकीच्या बोटापेक्षा स्वतंत्र उघडत असल्याने त्यांची स्वतंत्र विचारसरणी व स्वतः साठीची आर्थिक धोरणे आहेत. करंगळीच्या खाली बुध ग्रहावरची विवाह रेषा उत्तम आहे व ती वैवाहिक सौख्य उत्तम दाखविते. बुध रेषा भाग्य रेषेतून उगम पावते आहे व ती बुध ग्रहावर जास्त ठळक होऊन करंगळीच्या पेर्यात जाऊन थांबली आहे. बुध रेषा करंगळीच्या पेर्यात जाऊन रुतली कि अति हुशारीत बाधा येते, चलाखी, आडाखे व केलेली विधाने अंगलट येतात.
डावा संचिताचा हात - हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार डावा हात हा संचिताचा असतो. वाड वडिलांकडून आलेल्या संस्काराचा, वैवाहिक सौख्य दाखविणारा व मूळ स्वभाव व व्यक्तिमत्व दर्शविणारा डावा हात असतो. तसेच डावा हात हा पूर्व जन्मीचा पाप पुण्याच्या लेखाजोखानुसार आयुष्यात होणार्या शुभ-अशुभ घटनांचा कारक असतो. डाव्या हातावर परमेश्वराने दिलेल्या मूळ स्वभावाचे बीज असते व उजव्या कर्माच्या हातावर कर्तृत्व असते. व्यक्तीच्या आयुष्यातील मार्गक्रमणाचा आराखडा असतो.
आयुष्यात स्वतःच्या पायावर व्यक्ती उभी राहिली की, उजव्या हातावरील रेषा, ग्रह, चिन्हे अधिक सक्रिय होतात. मनुष्याच्या सक्रिय हातावरील रेषा कामाला लागतात. मग त्या व्यक्तीचा डावा हात सक्रिय असला तर उजवा हात हा संचित दाखवितो. उजव्या सक्रिय हातावरील कर्माच्या रेषा डाव्या हातापेक्षा भिन्न असल्या व ग्रहांचे कारकत्व शुभकारी दाखवीत असले तरी त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व व स्वभाव हा डाव्या हातावरील ग्रह रेषेवर वरील कारकत्वाने कायम डोकावत असतो. थोडक्यात डाव्या हातावरील रेषा त्या व्यक्तीच्या अंतर्मनाच्या स्वभावानुसार कार्यरत असतात. निर्णय घेण्याची वेळ आली की,व्यक्ती हातावरील संचिताचा व्यक्तिमत्वानुसार निर्णय घेते.
थोडक्यात मराठी म्हणीप्रमाणे, सुंभ जळाला तरी पीळ कायम राहतो या म्हणीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा संचिताचा हात हा निर्णय क्षमतेत अंतिम असतो. डाव्या हाताच्या या कारकत्वाचा संदर्भ येथे नमूद कारण कि ओवैसी यांचे डाव्या व उजव्या हातावरील रेषा, ग्रह यांची स्थिती खूपच भिन्न आहे. डाव्या व उजव्या हातावरील रेषा, ग्रह, चिन्हे व हाताचा व बोटांचा आकार हा भिन्न असू शकतो. त्या वरील शंख, चक्र, शुक्ती सारखे ठसे सुद्धा भिन्न असतात.
दोन्ही हातावरील भिन्न ग्रह, रेषांची स्थिती असतात असे लोक दोन व्यक्तिमत्वाचे असतात. यांचे दाखवायचे बोलायचे व्यक्तिमत्व भिन्न असते व प्रत्यक्षात कृती व त्यामागील उद्देश हा वेगळाच असतो. त्यांच्या दोन्ही हातावरील अंगठे जाडजुड आहेत व पहिले पेर हे खुंटीसारखे आहे. असा आकार असता असे लोक अरेला कारे करणारे असतात. ओवैसी यांच्याबद्दल बोलले जाते कि ते एकीकडे जिहादी दहशतवादाला आक्रमक विरोध करतात मात्र दुसरीकडे धार्मिक राजकारण तेवढ्याच त्वेषाने करतात. हा स्वभाव ओवेसी यांच्या डाव्या व उजव्या हातावरील आक्रमक अंगठ्याच्या आकारामुळे आहे. डाव्या हाताच्या वरील हृदय रेषा ही भिन्न आहे. उजव्या हातावरची हृदय रेषा गुरु ग्रहावर थांबल्याने प्रेम भावना व सहिष्णुता दाखविते तर डाव्या हातावरची हृदय रेषा अतिरेकी व स्वार्थी स्वभावाची, परिणामांची फिकीर न करणारी व आत्मकेंद्रित आहे. डाव्या हातावरची हृदय रेषा संपूर्ण हातावर येथून तेथून आडवी आहे. मस्तक रेषा नगण्य आहे.
हृदय रेषेतून मस्तक रेषेचा फाटा मधल्या बोटाच्या खाली उगम पावत असून तो चंद्र ग्रहावर उतरला आहे. हृदय रेषेतून उगम पावलेला मस्तक रेषेचा फाटा हा ओवेसी यांना कट्टर धर्माचरण व त्याचे राजकारण करण्यास भाग पाडत आहे. शुक्र ग्रहावरून उगम पावलेली बुध रेषा बुध ग्रहावर जाऊन थांबली आहे. त्यामुळे वारसाने अत्यंत चलाखपणा प्राप्त झाला आहे. बुध रेषेमुळेच अल्पसंख्याक समाजाचे ते आकर्षण आहेत. या शुक्र बुध रेषेच्या युतीनेच त्यांच्या आयुष्यात त्यांनी आर्थिक तरतूद करून ऐश्वर्य प्राप्त केले आहे. बुध रेषेने जागतिक मुस्लिम समाजात त्यांनी मानाचे स्थान मिळविले आहे.
8888747274
ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड