Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधकाँग्रेसच्या भावी हायकमांड!

काँग्रेसच्या भावी हायकमांड!

प्रियंका गांधी वड्रा यांचा जन्म 12 जानेवारी 1972 रोजी झाला. त्या भारतातील राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावी नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्या आहेत. सध्या त्यांच्याकडे काँग्रेसने संघटनेतील कोणतेही मोठे पद दिलेले नसले तरी भविष्यात त्याच पक्षाच्या हायकमांड ठरतील, असे योग आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

प्रियंका गांधीचे शालेय शिक्षण डेहराडून येथील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव राहुल आणि प्रियंका दोघांनाही दिल्लीतील दैनंदिन शाळेत हलविण्यात आलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, सततच्या दहशतवादी धमक्यांमुळे प्रियंका आणि भाऊ राहुल दोघेही घरीच शिकत होते. जीसस अँड मेरी कॉलेज दिल्ली येथून त्यांनी मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली. नंतर 2010 मध्ये बौद्ध धर्माच्या अभ्यासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1997 मध्ये त्यांचे दिल्लीस्थित व्यापारी रॉबर्ट वड्रा यांच्याशी लग्न झाले.

- Advertisement -

प्रियंका यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पद स्विकारून 23 जानेवारी 2019 अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. 11 सप्टेंबर 2020 रोजी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांनी जनतेच्या अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर व भाजपच्या विरोधात अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले.

2021 मध्ये उत्तर प्रदेश निवडणूक काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वात लढवली. त्यात काँग्रेसचा पराभव झाला. उत्तर प्रदेश व चार राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेस पक्षाने विचारमंथन केले आणि संघटनात्मक आणि कार्यात्मक बदल घडवून आणले. या बदलांवर प्रियंका यांचा प्रभाव दिसून आला. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. 2022 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले. राजकीय वारसाची भक्कम साथ असताना त्या पक्षाच्या कोणत्याही मोठ्या पदावर नाहीत किंवा त्या कोणत्याही संवैधानिक सभागृहाच्या सदस्यही नाहीत. राजकारणात अधिकार, निर्णय व सत्तेला खूप महत्व आहे. काँग्रेसच्या या निर्णय प्रक्रियेवर पुढील काळात त्यांचे नियंत्रण राहणार आहे. मात्र त्या सत्तेत प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत.

डावा व उजवा हात

राजकारणात व्यक्तीला सत्ता उपभोगायला मिळण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते. नेहरू परिवारातील सदस्य भारत स्वतंत्र झाल्यापासून साठ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत होते. प्रियंका यांच्याकडे थेट सत्तेच्या चाव्या आल्या नाहीत आणि भविष्यातही तशी शक्यता नाही. सत्तेत येण्यासाठी नशीब बलवत्तर लागते. अखिल भारतीय सत्तेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय ख्यातीचा लाभ होण्यासाठी प्रियंका यांच्या हातावरील हस्तसामुद्रिकदृष्टया रेषा, ग्रह व चिन्हे लाभदायक नाहीत. त्यांच्या हातावरील रेषा शुभकारक नाहीत. हातावरील रेषांचा संबंध त्या रेषेचा उगम स्थान व उगम स्थानावरील ग्रह, रेषेचा प्रवास ज्या ज्या ग्रहावरून होतो ते ते ग्रह, रेषा ज्या ग्रहावर जाऊन थांबते तो ग्रह असा रेषेच्या लांबीनुसार रेषेच्या प्रवासातील सर्व ग्रहांचा संबंध येत असतो. अशा वेळेस रेषा जर उत्तम प्रकारची असेल तर ग्रहांचे कारकत्व किंवा बळ वृद्धिंगत होते.

रेषा हस्तसामुद्रिकदृष्ट्या अति उत्तम, उत्तम, मध्यम, साधारण, बिघडलेली, अति बिघडलेली असू शकते. हातावरील रेषांचा पोत अत्यंत महत्वाचे असते, तलम रेशमी धाग्याचा पोत जसा स्पर्शाला दिसायला आल्हादायक असतो. त्या पद्धतीचा पोत हातावरील रेषांचा असल्यास त्या उच्च दर्जाच्या समजल्या जातात. रेषा जाड, ओबड धोबड, हातात रुतलेल्या, पसरट, हातावरील रंगापेक्षा अधिक गडद, छोट्या छोट्या रेषांनी छेदलेल्या, कधी जाड कधी पातळ, साखळीयुक्त, तुटक,रेषांचा एकत्रित गुच्छ, नागमोडी या प्रकारातील रेषा तळ हातावर असता त्या शुभ फळ देत नाहीत.

मुख्य रेषेंचा प्रवास तळहातावर निर्धारित असतो, रेषेचा प्रवास असे संबोधण्याचे कारण की, हातारील रेषांच्या प्रवासादरम्यान त्यांचा उगम व शेवट होईपर्यंत त्या त्या रेषेचे वय मोजले जाते. ते सर्वसाधारणपणे 1 ते 100 असते. रेषेचे वय मोजले जाते म्हणजे जातकाचे किंवा व्यक्तीचे वय सामुद्रिकतज्ज्ञाला जेव्हा सांगितले जाते, तेंव्हा जातकाच्या हातावरील मुख्य रेषेचा प्रवास अंकित केला जातो. जातकाच्या वयाच्या दरम्यान रेषा बिघडलेली असेल तर जातकाला उत्तम फळ देणार नाही, किंवा ती रेषा शुभ नसेल, रेषा शुभ असण्यासाठी वर नमुद केलेले रेषांचे बिघडलेले स्पॉट लक्षात घ्यावे लागतात.

आपण आधीच पहिले आहे कि रेषा त्यांच्या प्रवासात विविध ग्रहांवरून किंवा त्या ग्रहांना स्पर्शुन जातात. रेषा ग्रहांवरून जाताना त्या त्या ग्रहाचे कारकत्व त्य्या रेषांना मिळत असते, रेषेत दोष असेल तर ग्रहात दोष निर्माण होतो. प्रियंका गांधी वद्रा यांच्या हातावरील मुख्य रेषा बिघडलेल्या आहेत. त्यांचा हातावरील मुख्य रेषांचा पोत जाड – पसरट, हातावर खोल असल्याने त्यांना ग्रह रेषांची साथ मर्यादित आहे. ग्रह बिघडले कि ते नशिबाला आडवे येतात. प्रियंका यांच्यासारखे व्यक्तिमत्व क्वचितच कोणा राजकीय नेत्याला लाभले असेल. प्रियांका यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ जनतेवर निश्चित आहे. परंतु परमेश्वराने त्यांना आवाज कणखर न देता कोमल दिल्याने त्यांच्या बोलण्याची किंवा त्यांनी मांडलेल्या विषयाची पकड जनमानसावर होत नाही हा बुध ग्रहाचा दोष होय. प्रियंका यांच्याकडे उपजत हुशारी भरभरून आहे. पक्ष्याशी एकनिष्ठ माणसे ओळखण्यात त्यांची निवड करण्यात त्या तरबेज आहेत. कोणाकडून कसे काम करून घ्यावयाचे याचा हातखंडा आहे. व्यवस्थापनात निपुण आहेत. उजव्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषेत अंगठ्याच्या आत रेषेंच्या उगमापाशी दोनही रेषांमधील अंतर अगदी कमी आहे व रेषा स्वतंत्र आहेत.

मस्तक रेषा व आयुष्य रेषेत उगमापाशी अंतर कमी असेल तरी अशा व्यक्ती हुशार असतात. त्यांना आपण काय करतो, काय करणार आहोत, पुढचे पाऊल कसे टाकायचे याचा निर्णय क्षणात घेण्याची चलाखी लाभत असते व ती प्रियांकांकडे आहे. या हुशारीमुळेच काँग्रेस पक्षात सोनिया गांधी आपल्या लेकीचा सल्ला अंतिम मानतात, असे मानले जाते. आयुष्य रेषा व मस्तक रेषा यांच्यातील उगमापाशी अंतर जितके जास्त असेल तितक्या त्या व्यक्ती दुसर्‍याचे ऐकून घेण्यास तयार नसतात. आपल्या निर्णयावर ठाम असतात व या सारख्याच मस्तक रेषा व आयुष्य रेषेत सोनिया गांधी यांच्या हातावर खूप मोठे अंतर असल्याने त्या दुसर्‍याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. मस्तक रेषा व आयुष्य रेषेचा उगम, गुरु ग्रहावर अंगठ्याच्या आत तळहातावर होत असतो.

या रेषेत अंतर असता व यासोबतच गुरु ग्रह अत्यंत फुगीर असेल तर व्यक्तीच्या स्वभावात अहं ब्रह्मासि गुण समाविष्ट होतात. प्रियंका व सोनिया यांच्या हातावरील पहिल्या बोटाखालील गुरु ग्रह अत्यंत उभार घेतलेला व फुगीर असल्याने त्यांच्यात हा गुण ओतप्रोत भरलेला आहे. प्रियंका यांच्या हातावरील दोनही अंगठे मजबूत आहेत. त्यामुळे त्या कोणाच्या अधिपत्त्याखाली राहणे पसंत करीत नाहीत. त्यांचे स्वतःचे नियम व तत्वज्ञान असते व त्याला ते कायम चिटकून असतात. मनाप्रमाणे करण्याचा त्यांचा कल असतो. हातावरील चंद्र ग्रहाचा उभार मोठा हे मनगटाचे वर स्वतंत्र उभार चंद्राचा आहे व त्यावर परत गोलाकार घेतलेला मस्तक रेषेच्या खाली चंद्राचा उभार आला आहे. प्रियंका यांचे हातावर दोन चंद्र ग्रहाचे स्वतंत्र उभार असल्याने त्यांचेकडे पहिल्या चंद्र ग्रहाने व्यावहारिक गुण दिले आहेत व मनगटाजवळ असलेल्या चंद्र ग्रहाने कौटुंबिक निर्णय क्षमता स्वतंत्रपणे त्यांचेकडे आहे.

त्यांच्या हातावरील मुख्यतः हृदय रेषा व मस्तक रेषा जाड खोल व पसरत आहे. त्यामुळे या रेषेत न्यूनता अली आहे. हृदय रेषा शनी ग्रहाखाली जाड आहे व बुध ग्रहाकडे म्हणजे करंगळीकडे गेली आहे. या हृदय दोष पूर्ण रेषेने रवी व बुध ग्रह यांचे कारकत्व कमी केले आहे. हृदय रेषा गुरुग्रहावर जाऊन थांबली नसल्याने प्रेम, वात्सल्य, सहृदयता या गुणात न्यूनता अली आहे. मस्तक रेषा जाडी भराडी उगमापासून असून ती वळण घेऊन चंद्र ग्रहावर जाताना तिसर्‍या बोटाच्या कडेपर्यंत म्हणजे रवी ग्रहापर्यंत दोषपूर्ण आहे. त्यामुळे, अनुक्रमे, गुरु, शनी व रवी ग्रहांचे शुभ कारकत्व कमी झाले आहे.

चंद्र ग्रहावर मस्तक रेषा बारीक होऊन थांबल्याने व तिला दोन फाटे असल्याने उपजत हुशारी व विद्वत्ता मोठी आहे. भाग्य रेषा, रवी रेषा अतिशय तलम पातळ असल्याने त्या ऐश्वर्या बरोबरच मान सन्मान प्रदान करीत आहेत. आयुष्य रेषा खणखणीत आहे. परंतु वय वर्ष 65 पासून पुढे क्षीण होत गेल्याने वय वर्ष 65 पर्यंत सक्रिय असतील. प्रियंका सध्या 51 वषार्र्ंच्या आहेत. सोनिया गांधी आगामी सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत पक्षाचे नेतृत्व करतील. त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व म्हणून प्रियंका पुढे येतील. थोडक्यात काँग्रेस पक्षाच्या हायकमांड होण्याचे योग प्रियंका यांच्या हाती आहे.

पक्ष चालविताना कठोर व्हावे लागते. कठोर निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. पक्ष निष्ठा तपासावी लागते. कोण आपला, कोण दगाबाज हे शोधावे लागते. पक्षाच्या पदाधिकार्‍यांवरील नियंत्रण मजबूत ठेवावे लागते हे सर्व गुण प्रियंका गांधी यांच्याकडे असल्याने त्या सक्षमपणेे काँग्रेस पक्षाचा विस्तार करतील हे मात्र निश्चित.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या