भाग्याची साथ लाभलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती

भविष्य आपल्या हाती
भाग्याची साथ लाभलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती

प्रफुुुल्ल कुलकर्णी

प्रतिभाताई अनेक दशकांपासून भारतीय काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) त्यांची राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवड करताना हा एक महत्त्वाचा घटक ठरला. 19 जुलै 2007 रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी जवळपास दोन तृतीयांश मते मिळविली आणि 25 जुलै 2007 रोजी त्यांनी भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नांदगावात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आर.आर. विद्यालयात झाले आणि त्यानंतर जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईतील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. प्रतिभाताईंनी नंतर जळगाव जिल्हा न्यायालयात वकिली केली. 7 जुलै 1965 रोजी त्यांचा देवीसिंग रामसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. या जोडप्याला एक कन्या ज्योती राठोड आणि एक सुपुत्र रावसाहेब शेखावत, हे राजकारणात आहेत.

राजकीय कारकीर्द

1962 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी त्या जळगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून 1967 ते 1985 दरम्यान सलग चार वेळा विजय मिळवला. 1985 ते 1990 या कालावधीत त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. 1991 च्या दहाव्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. प्रतिभाताईंनी अमरावती मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. नंतरच्या दशकात राजकारणातून निवृत्तीचा कालावधी आला. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात विविध मंत्रिपदे सांभाळली होती आणि राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधीत्व केले. काही वर्षे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीजच्या संचालक म्हणून, तर राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 8 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांची राजस्थानच्या 17 व्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

उजवा हात व हाताचा आकार-सामान्यपणे स्त्रीच्या हाताचा आकार हा पुरुषाच्या हाताच्या आकारापेक्षा 30 ते 35टक्क्यांनी लहान असतो. पंजाची पकड अंगठ्याची व मनगटाची ताकद सुद्धा तितकीच कमी असते. हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार मानवाला प्रदान केलेल्या हाताच्या आकारानुसार त्या व्यक्तीतील मानसिक व शारीरिक ताकद मोजली जाते. अंगठा व अंगठ्याची ताकद मोजताना त्याचा आकार व लांबी हे त्या व्यक्तीतील निर्धार व निर्णय क्षमतेचे प्रमुख मोजमाप आहे. अंगठा जितका मजबूत निर्धारित लांबीचा व मनगटापासून जोडलेला असतो, तेव्हढी व्यक्ती महत्वाकांक्षी व करारी असते. महिला वर्गाचा निसर्गतःच छोट्या आकाराचा हात मृदू कोमल असतो. अंगठा सुद्धा छोटा असतो. त्यामुळे 95 टक्के महिला पुरुषांच्या किंवा दुसर्‍याच्या अधिपत्त्याखाली असतात. त्यांच्यात स्वतंत्र निर्णय क्षमता नसते.

1. चित्रात दाखविल्याप्रमाणे एक नंबरचा हात नाजूक आहे. बोटे बारीक, निमुळती व टोकाला टोकदार आहेत. अशा महिला स्वप्नाळू असतात. निर्णय क्षमता कमी असते .

2. दोन नंबरच्या हाताचा आकार एक नंबरच्या हाताच्या आकारापेक्षा थोडा मजबूत आहे. परंतु अशा आकाराचा हात असेल तर या महिला सुद्धा भावुक व दुसर्‍यांवर अवलंबून असतात.

3. तीन नंबरच्या हाताचा आकार आणखी एक व दोन नंबरच्या हाताच्या आकारापेक्षा रुंद व मजबूत आहे. अंगठा व बोटांची टोके बोथट आहेत. बाकीच्या दोन पंजातील अंगठ्याच्या आकारापेक्षा अंगठा मोठा व मजबूत आहे. या महिला घर कामात यशस्वी, त्यांच्या क्षेत्रातील निर्णय क्षमतेत हुशार व कर्तव्यदक्ष असतात.

4. चार नंबरचा हात व हातावरचा अंगठा बाकीच्या तीन हाताच्या आकारापेक्षा मजबूत आहे. त्यामुळे परिश्रम करण्याची जिद्द आहे. निर्णय क्षमता बाकी तीन हाताच्या आकारापेक्षा अधिक आहे.

प्रतिभाताई पाटील यांच्या हाताचा आकार हा 5 व्या नंबरचा आहे. कारण त्यांचा हात चौथ्या आकाराच्या हातापेक्षा मजबूत आहे. त्यांच्या हातावरचा अंगठा व त्याचे पहिले पेर रुंद व गोलाईयुक्त आहे. त्यामुळे त्यांच्यात कर्तबगारी आहे. नेतृत्व करण्याची ताकद आहे. बोटे रुंद व एकसारख्या जाडीचे आहेत. बोटांचे टोके बोथट आहेत ते टोकदार नाहीत. त्यामुळे सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे. बोटांपैकी गुरुचे बोट रुंद व रवीच्या बोटापेक्षा लांबीला मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे.

अंगठा- प्रतिभाताई यांच्या अंगठ्याकडे लगेचच लक्ष वेधून जाते. कारण त्यांच्या हातावरच्या अंगठ्याचे पेर मोठे पसरट आहे. तसेच दुसरे पेर हे कटिबंधासारखे असून निमुळते होत गेले आहे. हे पेर प्रमाणात आहे. अशा अंगठ्याचे वैशिष्ठ म्हणजे असे लोक हुकूमत गाजवतात. मनात येणार्‍या कल्पना प्रत्यक्षात उतरवितात. कोणाच्या अधिपत्याखाली काम करीत नाहीत. ठरविलेले काम वेळेच्या आधी पूर्ण करतात. या अंगठ्याचे वर्णन कर्तबगार अंगठा म्हणून करता येईल. या कर्तबगारीत ठामपणा आहे. महिलांच्या हातावरील अंगठा इतका मजबूत सहसा असत नाही. प्रतिभाताई यांच्या हातावरील अंगठा हा पुरुषाच्या अंगठ्याप्रमाणे मजबूत व करारी आहे. प्रतिभाताई यांच्या तळहाताकडे बघितले की, तो पंजा पुरुषाचा वाटावा इतका मजबूत बांध्याचा आहे. महिलेचा हात जर पुरुषासारखा मजबूत असेल तर त्या नक्कीच त्यांच्या जीवनात अद्वितीय कामगिरी करतात. मजबूत हाताच्या बांध्यामुळे कोणालाही त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करू देत नाही. त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी निर्धारपूर्वक करतात.

पहिल्या बोटांखाली असलेला गुरु ग्रह अति फुगीर असून त्याने शेजारच्या शनी ग्रहावरही अतिक्रमण केले आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे तळहातावरील कुठलाही ग्रह बाकीच्या ग्रहांच्या प्रमाणात जास्त फुगीर असेल तर त्या ग्रहाच्या गुणधर्मात न्यूनता येते किंवा त्या ग्रहात पंधरा ते वीस टक्के अशुभत्व येते. गुरु ग्रह अति फुगीर असता त्या व्यक्तीत अहं भाव खूप असतो. ते दुसर्‍याचे ऐकणाच्या मनःस्थितीत नसतात. अहं ब्रह्मासि मानसिकता असते.

गुरु ग्रहावरील चौकोन चिन्ह - प्रतिभाताई यांचा गुरु ग्रह अति फुगीर असला तरी त्या ग्रहावर चौकोन चिन्ह असल्याने त्यांचा सल्ला घेणारे, त्यांचे तत्वज्ञान ऐकणार्‍यांची संख्या खूप मोठी असते. प्रतिभाताईंच्या सल्ल्यामुळे त्यांचे निश्चितच भले होते. या गुरु ग्रहावरील चौकोनी चिन्हाने प्रतिभाताई यांच्यावर असंख्य लोकांचा विश्वास आहे व ते त्यांचे अनुयायी झाले आहेत. हृदय रेषेचा एक फाटा गुरु शनीच्या बोट मध्ये जाऊन थांबलेला, हृदय रेषेचा एक फाटा गुरु शनीच्या बोटामध्ये जाऊन थांबलेला असेल तर अशा व्यक्ती अत्यंत व्यवहारी असतात. कोणाकडून कसे काम करून घ्यायचे याची कला यांना उपजत असते. हृदय रेषेचा आणखी एक फाटा मस्तक रेषा व आयुष्य रेषेला छेदून खालच्या मंगळ ग्रहावर गेल्याने यांना प्रेमात वेदना सहन कराव्या लागतात. जवळचे ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले तीच मंडळी आत्यंतिक वेदना देतात.

मंगळ रेषा अधिकची ऊर्जा देते- प्रतिभाताई यांच्या हातावर वय वर्षे पासष्ठपर्यंत आयुष्य रेषेच्या बरोबरीने मंगळ रेषा उत्तम आहे. मंगळ रेषा प्रतिभाताई यांना कामात उत्साह व अठरा-अठरा तास विना थकता काम करण्याची ऊर्जा देते. उत्कर्षाच्या रेषा आयुष्य रेषेतून वयाच्या साठ वर्षापर्यंत उत्कर्षाच्या रेषा आहे त्यातली वयाच्या पंचावन्न वय असतानाची उत्कर्ष रेषा थेट शनी ग्रहावर जाऊन पोहोचली आहे. 60 वय वर्षात असणार्‍या उत्कर्ष रेषा मस्तक रेषेत जाऊन मिळाल्या आहेत. प्रतिभाताई यांच्या आयुष्यात वय वर्षे पन्नास पासून पासष्ठ वयापर्यंत राजयोग झाला आहे. आयुष्य रेषेतून उगम पावणारी बुध रेषा व व बुध रेषेतून उगम पावणारी रवि रेषा ह्या अत्यंत भाग्यकारक असल्याने मान सन्मान, कीर्ती व जागतिक प्रसिद्धी लाभली आहे. बुध रेषा अत्यंत हुशारी व चलाखी देणारी रेषा आहे. स्वतःला प्रसिद्धीझोतात ठेवण्याचे उपजत गुण बुध रेषा प्रदान करते आहे. बुध रेषेचा एक फाटा मस्तक रेषेत विलीन झाल्याने व त्याचे फाटे खालच्या मंगळ ग्रहावर गेल्याने सर्वांसाठी खंबीर असलेल्या प्रतिभाताईंना त्यांच्या आयुष्यात त्यांचे कुटुंबियांकडून वेदना मिळाल्या. प्रतिभाताई यांच्या उजव्या हाताच्या तळव्याकडे पहिले कीतो सामान्य वाटतो. परंतु हाताचा, बोटांचा व विशेतः अंगठ्याचा आकार पहिला कि स्त्रीच्या कर्तृत्वाची, हुशारी व चाणाक्षपणाची साक्ष पटते. त्याला साथ उत्कर्ष रेषांची, रवी व बुध रेषेची, मंगळ रेषेची ऊर्जा व हृदय रेषेची व्यवहारीकतेचा संगम पाहावयास मिळतो. चार वेळेस विधान सभेनंतर, खासदार, राज्यपाल व भारताचे सर्वश्रेष्ठ पद भूषविलेली एक विद्वान व राजकारणी महिला त्यांच्या अंगभूत हुशारीने व कर्तृत्वाने राष्ट्रपती झाल्या व एक मराठी आणि महाराष्ट्रीयन म्हणून त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा असेच त्यांचे कर्तृत्व राहिले आहे.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com