तू सुखकर्ता

तू सुखकर्ता

गणेशोत्सवाचा सण संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचा आवडता सण आहे आणि आपणही नक्कीच गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असाल. श्री गणेश बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात. त्यांना प्रत्येक पूजेत प्रथम पूजनीय स्थान प्राप्त आहे. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात. या काळात रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती म्हटली जाते. त्यांना मोदकांचा प्रसाद दिला जातो. 11 दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. 1982 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन रूप मंत्र गणानाम गणपतीम् हवामहे व विशू सिधा गणपती वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी, वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती ब्रह्मणस्पती वाचस्पती पासून पौरानिक गजवदन, गणेश, विघ्नेश्वर हे निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात. भारतातील अनार्यांच्या हस्ती देवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे. हा दुसरा अर्थ लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र व भारताच्या नाट्यशास्त्र आतही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित आहे, असे अभ्यासक मानतात.

हिंदू धर्मात गणेशोत्सवाचे महत्त्व खूप मोठे आहे. संकटांचा नाश करणारा, विघ्नहर्ता गणपती म्हणून त्याची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला सिद्धि विनायक चतुर्थी असते. हिलाच शिवा असेही म्हटले जाते. गणपत संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते. गणेश चतुर्थीची प्रचलित परंपरा ही खूप जुनी आहे. तसेच गणेशोत्सवाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे तो काळ पारतंत्र्याच्या असल्याने लोकांनी एकत्र यावे. त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी हा हेतू त्यामागचा होता. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायक चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते.

गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये गणपतीची मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुल, पत्री, नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध एकवीस पत्री अर्पण केल्या जातात. त्यामध्ये फराळ आगळा यांची 21 जोडी गणपतीला अर्पण केली जाते. पावसाळ्यात या सर्व पत्रे सामान्यता उपलब्ध असतात आणि प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.

मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तर पूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी काही मंत्रही म्हणतात. जिथे गणपती बसवायचा असतो, तेथे मखर किंवा विविध साधनांनी सजावट केली जाते, लाइटिंग लावली जाते, गणपतीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दररोज दिला जातो. लाडू व मोदक यांचा भोग लावल्या जातो. तसेच गणपतीची नावे वेगवेगळी आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश उत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म व भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला.

श्रीगणेश यांनी शिंदूर दैत्यावर विजय मिळवला. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा होता. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला ती पूर्व परंपरा आजही पाळली जाते. चतुर्थी श्री गणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती स्वप्न सुशुप्ती या पलिकडील अवस्था आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला गेला. व हा मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा केला जातो.

शिवपुराणाध्ये गणपतीविषयीचा एक उल्लेख आढळतो. त्यामध्ये पार्वती एके दिवशी नंदीला द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली असता यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती तिने निर्माण केली व त्यात प्राण फुंकले या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता, शंकर तेथे उपस्थित झाले. यावेळी त्या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारसोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील रागाप्रमाणे युद्ध झाले. शिव व सर्व देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडविले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तर प्रांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले व देवगण यांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व श्री गणेश नावाने प्रसिद्ध झाला.

तसेच आणखीन एक गणपती विषयी अख्यायिका आहे. एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप दिसल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझ्या रूपास चतुर्थीस कोणी दर्शन घेणार नाही. जो तुझे रूप पाहिल त्याचावर संकट येईल. असा शाप चंद्राला दिला, अशीही एक आख्यायि

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com