Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधप्रकाशाची ऊर्जा

प्रकाशाची ऊर्जा

आपण हे सर्व जाणतो की, या बाह्य जगात आपले अस्तित्व प्रकाशावर अवलंबून आहे. ब्रम्हांडाला प्रकाशित करणारी सूर्याची किरणं जर पृथ्वीवर आली नाहीत तर इथे सर्वत्र अंधारच होईल. सूर्याचा हा प्रकाश केवळ आपल्या जीवनाकरिता आवश्यक उष्णता प्रदान करतो. एवढेच नसून समस्त प्राणीमात्रांकरीता जीवन जगण्यासाठी भोजनासाठी लागणारी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो. झाडा-झुडपांची वाढ होण्याकरीता सुद्धा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच सर्व मानव आणि प्राणीमात्रांना जगण्यासाठी झाडा-झुडपांची आवश्यकता असते.

जर आपण बाह्य अंतरिक्षाला अवकाशाला पोकळी व अंधारी जागा मानत असू तर प्रकाशाची पहिली चमक कुठून आली? ज्याच्या परिणामी परमाणु आणि गॅस उत्पन्न झाला. ज्याद्वारे तारे, सूर्य आणि ग्रहांची निर्मिती झाली. वैज्ञानिक अजून सुद्धा सृष्टीचा प्रारंभ कसा झाला या प्रश्नासंबंधी विचार विमर्श करीत आहेत. जेव्हा की, संत महापुरुषांनी लाखो-करोडो वर्षापूर्वीच आपल्या वाणीतून सृष्टीच्या अस्तित्वाचे वर्णन केलं आहे आणि समजाविले आहे की या बाह्य जगताचा प्रकाश आपल्या अंतरातील प्रकाशाचे प्रतिबिंब मात्र आहे.

- Advertisement -

आपल्या सर्वांच्या मधील प्रत्येकाच्या अंतरी अनंत प्रकाश विद्यमान आहे, परंतु आपल्याला याची जाणीव नाही. कारण आपण बाह्य जगताच्या भ्रमातच जगत असतो. जर आपण ध्यान अभ्यासाद्वारे आपले ध्यान अंतर्मुख करुन एकाग्र केल्यास आपल्याला समजेल की, आपण प्रकाशाने परिपूर्ण आहोत. जेव्हा कधी आपण आपले आजारपण, आर्थिक समस्या, अपमान आणि नुकसान अशा संकटांना सामोरे जातो, तेव्ेहा आपण हे लक्षात ठेवावे की हे निघून जाणार्‍या ढगां प्रमाणे आहे. ते आपल्या पाठीमागे सुंदर अशा सूर्याच्या अनंत प्रकाशाला झाकून टाकतात.

याकरिता संत महापुरुष सांगतात कि आपले खरं अस्तित्व प्रेम आणि प्रकाशाने भरपूर आहे. ध्यान- अभ्यासाद्वारे ते आपणास अंतरातील प्रभूच्या दिव्यप्रेम व प्रकाशाचा अनुभव करवितात. जस-जसं आपण त्यांच्या शिकवणुकीला जीवनाचा अविभाज्य भाग बनवितो तेव्हा आपले जीवन प्रकाशमान होते. जेणेकरून आपल्या अंतरात इतरांप्रती सहानुभूती व दया भाव उत्पन्न होतो. आपण केवळ दुःखावर मलमपट्टी करत नसून, आपण त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक वर्तन सुद्धा करतो. कारण, त्यांचे जीवनसुद्धा सुख आणि शांतीपूर्ण होईल आणि हळूहळू प्रभूचा हा दिव्य प्रकाश संपूर्ण भूतलावर पसरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या