परमेश्वराची दिव्य देणगी

अध्यात्मवाणी
परमेश्वराची दिव्य देणगी
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

आपण फार भाग्यवान आहोत की, आपल्या आत्म्याला परमेश्वराने मनुष्य शरीर दिले आहे. जर आपण इतर योनीतील जीवांकडे पाहिले असता आपल्या लक्षात येते की; त्यांचे जीवन अत्यंत कठीणाईचे असते. त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याकरिता आश्रय शोधावा लागतो. त्या व्यतिरिक्त ते शिकारीच्या भीतीने भयभीत राहतात. प्रत्यक्षात अनेक लोक पाळीव प्राण्यांना परिवारातील सदस्य समजतात. तरीदेखील पाळीव प्राणी त्यांच्या गुलामासारखेच असतात. प्राणी अथवा पशु-पक्षी कधीही विचार करू शकत नाही की, ते कोण आहे? व येथे कशासाठी आले? आणि त्यांना कुठे जायचे आहे?

आपण भाग्यशाली आहोत कारण की आपण मानवाच्या रूपात जन्म घेतला आहे. ज्यामध्ये आपण स्वत:हाला ओळखू शकतो आणि समजू शकतो कि, प्रभूने आपल्याला इथे कशासाठी पाठवले आहे? मानव देह प्राप्त होणे हे मोठे भाग्य आहे कारण की, याच देहामध्ये आपण आपल्याला ओळखू शकतो आणि परमपिता परमेश्वराला प्राप्त करू शकतो. याकरिता परमेश्वराचे नेहमी उपकार मानले पाहिजे.

आपल्यातील असे किती लोक आहे जे मानव देह प्राप्त करण्याबद्दल आणि शरीर स्वस्थ्य राहण्याबद्दल प्रभूचे आभार मानतात? जेव्हा आपण एखाद्या गंभीर आजाराने त्याच्या संसर्गात येतो अथवा दुर्घटनाग्रस्त होतो, तेव्हा आपल्याला फारच वेदना होतात. अश्यावेळी आपण मोठमोठ्याने प्रार्थना करितो की प्रभू आपल्या पिडेला दूर कर व आपल्याला स्वस्थ कर. प्रभूच्या अपार कृपेने आपल्या आजाराची वेदना कमी होते. तेव्हा आपल्यातील एखादा, हे प्रभू आपला फार फार आभारी आहे असे शब्द बोलतो. जेव्हा आपण स्वस्थ असतो तेव्हा आपण प्रभूचे आभार मानत नसतो.

अनेक वेळा आपल्या जीवनात काही आकस्मित अप्रिय घटना होतात जसे की, आपल्याजवळ पंचवीस वर्षापासून नोकरी आहे. पण एखाद वेळी कंपनीतून काही लोकांना कमी करण्यात येते त्यात आपल्याला काढण्यात येते तेव्हा आपण म्हणतो परमेश्वर नाहीच आहे. जरी प्रभूने आपल्याला जीवनात बरेच काही दिलेले असेल परंतु एकदा जरी त्यात बिघडले तर आपण प्रभूला दोष देत असतो.

काय कधी आपण असा विचार करतो का? जेव्हा आपण असे वागतो तेव्हा परमेश्वराला कसे वाटत असेल. फारच मोजके लोक प्रभूच्या या बक्षीसा बद्दल प्रभूचे आभार मानतात आणि जर यात काही गडबड झाली तरी ते प्रभू ला म्हणतात 39;काही हरकत नाही प्रभू39;. मी तरीदेखील तुमच्यावर प्रेम करतो. मी आपल्या प्रति आत्तासुद्धा आभारी आहे. आणि मी हे जाणतो की, जे काही माझ्या बाबतीत घडलेले आहे त्यामुळे झाले असेल की यामध्ये माझी काही ना काही हित जरूर असेल.

प्रभू तर आपल्याला सर्व काही देऊ इच्छितो पण एक आपण आहोत की त्याच्याकडून छोट्या छोट्या गोष्टीच मागत असतो. प्रभु आपली एक इच्छा पूर्ण करतो तर आपली दुसरी इच्छा उत्पन्न होते जर ती देखील पूर्ण केली तर अजून इच्छा उत्पन्न होते. सतत इच्छा व समस्या तोंड वासून आपल्यासमोर नेहमी उभ्या राहतात.

प्रभूचे प्रेम आणि आशीर्वाद हेच आपल्या सार्‍या समस्यांचा अंत करू शकतात. जर आपल्याला अनुभव झाला तर प्रभू सदैव आपल्या बरोबर आहे. तेव्हा हीच भावना आपल्यात एवढी ताकद आणि साहस देइल की जीवनभर आपण आपल्या समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करू शकू.

आपण प्रभूशी त्याच्याशिवाय अजून काही मागावयास नको. जर असे आपण करतो तर ते आपल्याला एवढं काही देतात की आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. जर आपण काही मागत असू तर आपल्याला त्याच्या काही पटीने जास्त देतात. तर आपण प्रभू पासून प्रभूलाच मागणे, हे चांगले ठरेल.

Related Stories

No stories found.