टीव्ही मालिकांची ‘क’ क्वीन

भविष्य आपल्या हाती
टीव्ही मालिकांची ‘क’ क्वीन

90 च्या दशकात भारतात टिव्हीचा प्रसार सुरू झाला होता. त्या काळात मनोरंजनासाठी मालिकांचे प्रस्थही वाढत होते. याच दशकाच्या अखेरीस भारतीयांच्या घराघरात पोहचलेल्या टिव्ही मालिकांनी मनोरंजनाची संकल्पना बदलली होती. सोबतच टिव्ही मालिकांचा विषय, आशयही बदलत होता.

पौराणिक, सांस्कृतिक मालिकांकडून बोल्ड विषयांकडे वाटचाल सुरू होती. याच काळात एकता कपूर या नावाची टिव्ही मालिका निर्मिती विश्वास एन्ट्री झाली. एकेकाळी रूपेरी पडदा गाजवणारे सदाबहार अभिनेते जितेंद्र यांची ही लेक! 7 जून 1975 रोजी जन्मलेल्या एकताने टिव्ही मालिका विश्वावर आपले लक्ष केंद्रीत केले. 1994 मध्ये स्थापन झालेल्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करताना नवे कलाकार, नवे दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ज्ञ असा संच उभारणीकडे ती वळली. 2001 मध्ये बालाजी मोशन पिक्चर्सची स्थापना झाली. यानंतर कामाने अधिकच वेग घेतला. ‘क’ या अक्षराने सुरू होणार्‍या टिव्ही मालिकांची नावे ही तिच्या निर्मिती संस्थेचे वैशिष्ट्य. क्योंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कस्तूरी, कसोटी जिंदगी की, करम अपना अपना, कयामत या गाजलेल्या मालिकांची नावे वानगीदाखल घेता येतील. यामुळे ‘क’ क्वीन अस बिरूदच तिला मिळाले. टिव्ही मालिकांच्या माध्यमातून कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल 2020 मध्ये तिला पद्मश्रीने सन्मान मिळाला. एकताने विवाह केला नाही. मात्र सरोगसीद्वारे जन्म 27 जानेवारी 2019 रोजी तिला पुत्र लाभला. तिच्या एकूण स्वभावाप्रमाणे हा निर्णयही धाडसीच ठरला.

एकताने वयाच्या 17 व्या वर्षीच जाहिरात आणि फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनात चित्रपट निर्मितीचे धडे गिरवण्यास सुरूवात केली होती. वडील जितेंद्र यांच्या आर्थिक मदतीने बालाजी टेलिफिल्म्सची स्थापना करत मालिका निर्मिती क्षेत्रात उरतली. सुरूवात अडखळतच झाली. त्यांच्या टेलिफिल्म टिव्ही कंपन्यांची नाकारले. त्यामुळे आर्थिक फटका बसला. मात्र एकता प्रयत्न करत राहिली. 1995 मध्ये झी टीव्हीने ‘मानो या ना मानो’ आणि संगीतावर आधारित कार्यक्रम ‘शो धून धमका’ची दूरदर्शनने निवड केली. एकताने याच अनुभवातून धडा घेत कामाची दिशा बदलली. 2000च्या काळात ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि हिट झाली. सर्वाधिक टीआरपी मिळवणारा हा शो भलताच लोकप्रिय होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक मालिकांचा धडाकाच लावला. नव्या दमाच्या अभिनेत्री, अभिनेते, दिग्दर्शकांना यामुळे संधी मिळाली.

एकता कपूर टिव्ही मालिका उद्योगातील सर्वात प्रभावी नावांपैकी एक आहे. भारतातील अव्वल 25 महिला उद्योजकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. वडील जितेंद्र यांनी एकतावर विश्वास दाखविला. दीड कोटीचे नुकसान होऊनही प्रोत्साहित केले. त्यांचा विश्वास तीने सार्थ ठरवला. तिच्या बालाजी कंपनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रही गाजवले. अनेक सुपरहिट चित्रपट या कंपनीच्या नावावर आहेत. 130 पेक्षा जास्त मालिकांची निर्मिती केली आहे. अनेक चित्रपट, ओटीटी प्लॅटफार्म अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमात त्यांनी यश मिळवले आहे.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या त्यांच्या हातावर मस्तक रेषा दोनच्या संख्येने आहेत. एक मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ उंचवट्याकडे गेलेली. या रेषेने विचारपूर्वक निर्णयाची क्षमता व व्यवहार दिला. एकता यांच्या उजव्या हातावरील मुख्य मस्तक रेषेला एक फाटा असून तो रवी ग्रहाच्या बोटाखाली मस्तक रेषेतून सरळ खाली चंद्र ग्रहावर उतरला आहे. हा मस्तक रेषेचा चंद्र ग्रहावर उतरलेला फाटा कथा, पटकथा, दिग्दर्शन, कल्पना विस्तार व नव निर्मितीचा कारक आहे. हातावरील हृदय रेषा गुरु ग्रहावर जाऊन थांबलेली आहे. कथानकातील नाट्य, विविध पात्रे व त्यांची स्वभाव, मानवी भावनेचे कंगोरे सामाजिक परिस्थितीनुसार फुलविण्याच्या संकल्पना विपुल आहेत. प्रेक्षकांच्या मनातील पात्रे मालिकांमधून असल्याने प्रेक्षकांना खेचण्यात यश आले. एकता कपूर यांच्या हातावरील आयुष्य रेषा सुदृढ आहे. त्यामुळे त्या निरोगी आहेत. जास्तीचे कष्ट घेण्याची त्यांची क्षमता आहे. चंद्र ग्रह मणिबंधाकडे शुक्र ग्रहापेक्षा अधिक खाली मणीबंधाकडे सरकल्याने अधिकची विद्वत्ता प्रदान झाली आहे. मात्र त्याबरोबरच गूढ तत्वाचे आकर्षण मोठे आहे. त्यांना गूढ विज्ञानाबद्दल श्रद्धा व विश्वास आहे.

गूढ गोष्टींवर विश्वास निर्माण होण्यासाठी चंद्र ग्रहावर उतरलेली मस्तक रेषा, शुभ गुरु ग्रहाचे कारकत्व व रवीचे लांबीला मोठे कारणीभूत आहे. एकता यांची श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा इंग्रजीतील ‘के’ अक्षरावरून नावाची सुरवात असलेल्या चित्रपट व मालिकांच्या निर्मितीत त्यांना मोठे यश मिळाले. त्यांच्या दोनही हातावरील बोटांमध्ये विविध ग्रहांच्या रत्नजडित अंगठ्या, ताईत, गंडे दोरे, हातातील विविध प्रकारच्या माळा व त्यांचा नित्य परिधान करीत असलेल्यामुळे त्यांच्या रत्नावरील व गूढ शास्त्रावरील असलेली श्रद्धा दिसून येते. याचा फायदा झाला असावा म्हणून त्यांनी विविध प्रकारची रत्ने त्यांच्या बोटात असतात.

रत्नांचा उपयोग अचूक केल्यास त्या व्यक्तीला जीवनात फायदा निश्चित होतो. गुरुचे बोट जवळ जवळ मधल्या शनीच्या बोट इतके लांब आहे. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास लाभला आहे. तसेच विद्वत्ता, हुकूमत गाजविण्याची ताकद यांचा संगम आहे. गुरु ग्रहांमुळे सामाजिक विषयांची निर्मिती व त्यांचे पटकथा लिखाण झाले आहे. बुध ग्रह शुभ आहे. तो प्रमाणात फुगीर असल्याने हुशारी व कथा लिखाणांचा कारक आहे. परंतु बुध ग्रहावरील विवाह रेषा दोन तीन आहेत. परंतु त्या दोषपूर्ण असल्याने वैवाहिक सौख्याचा लाभ झाला नाही. त्यामुळे एकता अविवाहित राहिल्या. एकता यांनी 20 वर्षापासूनच भारतीय प्रेक्षकांची नस अचूक ओळखली आहे. त्यामुळे टिव्ही मालिका क्षेत्रातील या क्वीनचे अधिराज्य अबाधित आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com