Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधहळव्या मनाचे उद्धव ठाकरे!

हळव्या मनाचे उद्धव ठाकरे!

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जन्मतःच नशीबवान आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे घरात ते जन्माला आले. बाळासाहेब यांच्यासारख्या महान नेतृत्वाच्या पोटी जन्माला आलेले उद्धवजी यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरविण्यास मिळाले.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

बाळासाहेब ठाकरेंचा एकछत्री राजकीय वारस हाती असणार्‍या उद्धवजी यांच्या हातावरील रेषा, ग्रह, चिन्हे हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्या हातावरील हस्तसामुद्रिकदृष्टया राजयोगाच्या रेषा कशा आहेत, याची प्रचंड उत्सुकता असणार हे नक्की. हस्तसामुद्रिकशास्त्रात राजयोगाच्या दृष्टीने हातावर असलेल्या ग्रह, रेषा, चिन्हे यांची शेकडो वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. या राजयोगात, साहित्यिक, गायक, राजकारणी, राष्ट्राध्यक्ष, अभिनेते, संगितकार, धार्मिक गुरू इत्यादी अनेक क्षेत्रांतील ख्यातमान व्यक्तींच्या हातांच्या अभ्यासावरून भविष्यवेध मालिकेत भाग्य जाणून घेतले. व्यक्तीला भाग्याची साथ हवीच असते, 95 टक्के प्रयत्नात 100 टक्के यशासाठी 5 टक्के भाग्याची साथ जरुरी असते व ही भाग्याची साथ प्रत्येकाला नशिबानुसार असते व हे नशीब हाताच्या अभ्यासावरून अचूक कालनिर्णयासहित भूत, वर्तमान व भविष्यकाळ तंतोतंत हस्तरेखांद्वारे वर्तविता येतो.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाची संपूर्ण जबाबदारी उद्धवजी यांचेवर आली व त्यांनी ती समर्थपणेे उचलली. बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकार होते. सामाजिक व राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब त्यांच्या व्यंगचित्रात उमटत असे. त्यात समाज प्रबोधनाबरोबरच सामाजिक वास्तव मांडण्याची ताकद होती. बाळासाहेबांचे मनस्वी कलाकाराचे गुण उद्धवजी यांच्यात आले. परंतु ते उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून, त्यांचे गड किल्ल्यांचे छायाचित्रण प्रसिद्ध आहे. त्यांच्या हातावरील चंद्र ग्रह हा हातावर स्वतंत्र आहे. कुठल्याही व्यक्तीच्या हातावर चंद्र ग्रहाचे स्थान स्वतंत्र असले तर ते विविध विषयांत विद्वान असतात. कोणत्या क्षेत्रात विद्वत्ता आहे हे हाताची ठेवणं, बोटांचे आकार, मस्तक रेषा व बोटांवरील ठश्यांच्या छापा वरून सांगता येते.

उजवा हात

भाग्य रेषेतून उगम पावणार्‍या बुध व रवी रेषा मणिबंधातून उगम पावणारी भाग्य रेषा अत्यंत भाग्यकारी असते व ती उद्धवजी यांच्या हातावर आहे. भाग्य रेषेतून उगम पावणारी

बुध व रवी रेषा आहे व ती सुद्धा भाग्यरेषेच्या उगमानंतर जन्मतःच भाग्य घेऊन आली आहे. भाग्य रेषा मणीबंधातून उगम पावत असली तरी हाताच्या मध्यभागी असणार्‍या मस्तक रेषेला भाग्य रेषा छेद देताना तिचे वय सरासरी 35 असते. मस्तक रेषेखाली जवळजवळ 35 वर्षे खालच्या तळातून भाग्य रेषेतून रवी व बुध रेषेचा उगम असल्याने उद्धवजी यांचे वय शून्य असतानाच किंवा जन्मतःच रवी, भाग्य व बुध रेषेचा एकत्र उगम असल्याने तो मोठा राजयोग हातावर आहे. व्यक्तीचा तळहात, हातावरीर रेषा व ग्रह, हाताचा व बोटांच्या आकारावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळते. तिचा स्वभाव, निर्णय क्षमता, हुशारी इत्यादी अनेक बारीक पैलूंचा उलगडा होत असतो. व्यक्तीला तिच्या स्वभावातील दोष क्वचितच माहीत असतात किंवा माहीत असले तरी मूळ स्वभावाच्या पुढे त्या व्यक्तीचे निर्णय होत नाहीत किंवा व्यक्तिमत्वात बदल होत नाही. परमेश्वराने समस्त मंडळींना निरनिराळी स्वभाव वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. हातारील रेषा या आईच्या पोटात बाळ चार ते पाच महिन्याचे असताना व त्वचा प्राप्त होताना तयार होतात, हे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे.त्यामुळे हातावरील रेषा ब्रह्मनिर्मित आहेत. हातावरील रेषा व ग्रह यांच्या संगमाने तयार होणारा व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीपरत्वे भिन्न असतो. स्वभाव दोषाला औषध नाही. हातावरील मस्तक रेषा व हृदय रेषा यांचा व्यक्तीच्या स्वभावात पन्नास टक्के वाटा आहे. बाकीचे पन्नास टक्क्यांत अंगठा, ग्रह व हाताचा आकार येतो. अंगठ्याचे महत्त्व हस्तसामुद्रिक शास्त्रात खूप मोठे आहे. कारण अंगठा मजबूत असता स्वतंत्र निर्णय क्षमता प्राप्त असते. अंगठ्याची पेरे व अंगठ्यावरील आडव्या रेषा याही खूप व्यक्तिमत्वावर परिणाम घडून आणतात. उद्धवजी यांच्या हातावरील हृदयरेषा गुरु ग्रहाच्या पेरात जाऊन थांबली आहे. अशी स्थिती असता एखाद्या व्यक्तीच्या किंवा ते ज्यांना मानतात त्या व्यक्तींच्या अधिपत्याखाली ते कायम निर्णय घेत असतात. हृदय रेषेचा एक फाटा डाव्या व उजव्या हातावर गुरु ग्रहावर सरळ आडवा गेल्याने ह्या व्यक्ती खूप भावनिक असतात. यांना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वाईट वाटत असते. त्यांच्या बोटांवरील पहिल्या पेर्‍यांवर बारीक फोडासारखा फुगीर भाग आहे. या फोडासारख्या उभार घेतलेल्या भागामुळे, अत्यंतिक संवेदनशीलता प्राप्त होत असते. व्यक्ती अत्यंतिक भावनाशील असते. हृदयात रेषेचा एक फाटा गुरु ग्रहावर व बोटांच्या पहिल्या पेरावर अत्यंतिक संवेदनशीलता असल्याने उद्धवजी दुसर्‍याच्या सल्ला ऐकणे किंवा तो मान्य करताना दिसतात.

अंगठ्याचे पहिले पेर वाजवीपेक्षा मोठे, दुसर्‍या पेरावरील आडव्या रेषा व टोकदार अंगठा आहे. हृदय रेषा थेट गुरु ग्रहावर पहिल्या बोटाच्या पेरात जाऊन थांबली आहे व हृदय रेषेचा एक फाटा सरळ गुरु ग्रहावर आडवा गेला आहे. त्यांच्या अंगठ्याचे पहिले पेर वाजवीपेक्षा मोठे व टोकदार आहे व अंगठ्याच्या दुसर्‍या पेरावर तीन चार आडव्या रेषा आल्याने त्यांच्या एकंदरितच उपजत असलेल्या निर्णयक्षमतेत बाधा आली आहे. अंगठ्याचे बोट टोकदार असता असे लोक आपल्या प्रिय व्यक्तीने किंवा विश्वासू व्यक्तीने कथन केलेल्या घटनेवर किंवा दिलेल्या सल्ल्यावर शहानिशा न करता विश्वास ठेवतात. अंगठ्याचे दुसरे पेर हे निर्दोष असता त्या व्यक्तीत, साधक बाधक विचारअंती, त्वरित निर्णय घेण्याची किंवा अंमलबजावणीची क्षमता असते. अंगठ्याच्या दुसर्‍या पेरावरील आडव्या रेषा या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयात बाधा आणतात. एक तर निर्णय होत नाही, किंवा निर्णयाची घाई होते व यात व्यक्तीने घेतलेले बहुतेक निर्णय चुकतात. हृदय रेषे प्रमाणेच मस्तक रेषा व्यक्तीच्या एकंदरित असलेल्या हुशारीने घेतलेल्या निर्णयात महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यांच्या हातावरील मस्तक रेषेचा एक फाटा सरळ वरच्या मंगळ ग्रहावर गेला आहे, हा त्यांनी घेतलेल्या निर्णयात कठोरता आणतो. वरच्या मंगळ ग्रहावर मस्तक रेषा जाऊन थांबल्याने, वरच्या मंगळ ग्रहाचे म्हणजे प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठून नामोहरम करण्याचे गुण त्यांना प्राप्त आहेत. थोडक्यात घेतलेल्या निर्णयाची तमा न बाळगता शत्रू पक्षाला जेरीस आणण्याचे काम ही मस्तक रेषा वरच्या मंगळ ग्रहावर सरळ जाऊन थांबल्याने कारकत्व लाभले आहे. त्यांच्या हातावरील मस्तक रेषेला हाताच्या मध्यभागी एक फाटा फुटला आहे व तो जागेवरून एकदम खाली चंद्र ग्रहावर आला आहे. हा अचानक खाली वळालेला फाटा त्यांच्या विचारधारेत अचानक चलबिचल करणारा आहे. हा चंद्र ग्रहावर उतरलेला मस्तक रेषेचा फाटा त्यांना त्यांच्या स्वभावात निराशा आणणारा आहे. या निराशेच्या गर्तेत असता काही महत्त्वाचे निर्णय करताना ते आपल्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेतात व त्यामुळे त्यांचे निर्णय चुकण्याचा संभव असतो. चंद्रावर उतरणार्‍या मस्तक रेषेचा फाटा, सरळ वरच्या मंगळ ग्रहावर जाणार्‍या मस्तक रेषेचे गुणधर्म कमी करतो आहे.

चंद्र ग्रहावर अचानक खाली उतरणारी मस्तक रेषा, हृदय रेषा गुरु बोटाच्या पहिल्या पेरात, हृदय रेषेचा एक फाटा गुरू ग्रहावर आडवा, अंगठ्याच्या दुसर्‍या पेरावरील कृती व निर्णय घेण्यात अडथळा आणणार्‍या आडव्या रेषा, बोटांच्या पहिल्या पेरावरील उभार घेतलेली फोडासारखी रचना, त्यांच्या मनात भावनिक द्वंद्व निर्माण करण्यास जबाबदार आहेत व त्यामुळेच अखंड शिवसेना राहिली नाही. उद्धवजी भावनाशील असले तरी त्यांचे भावी राजकीय भविष्य मोठे आहे, प्रकृतीची साथ कमी असली तरी उत्साह दांडगा आहे. त्यांचे व त्यांच्या पक्षाचे राजकीय महत्त्व कमी होणारे नाही.त्यांना मानणारा मोठा वर्ग कायम राहील.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या