अशा भावांना नसते यमाची भीती

अशा भावांना नसते यमाची भीती

पौराणिक कथेनुसार सूर्य पुत्री यमी अर्थात यमुनेने आपल्या भाऊ यमाला कार्तिक शुक्ल पक्षाची द्वितीया तिथीला भावाला आपल्या घरी आमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार भोजन खाऊ घातलं त्यावर प्रसन्न होऊन यमराजाने वर मागायला सांगितले तेव्हा यमुनेने म्हटले की आजच्या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला घरी बोलावून भोजन करवून त्याला तिलक करेल त्याला यमाची भीती नसावी. असे म्हटल्यावर यमराज ने तथास्तू म्हणत आपल्या बहिणीला वर दिले.

भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना आपल्या भावाला निमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार स्वादिष्ट भोजन खाऊ घालावे. नंतर ताम्बूळ अर्थात विडा द्यावा. याने बहिणीचं सौभाग्य वाढतं. शास्त्रानुसार या दिवशी भावाने स्वत:च्या घरी भोजन केल्याने त्याला दोष लागतो. बहिणीच्या घरी जाणे शक्य नसल्यास एखाद्या नदीकाठी बसून किंवा गायीला बहीण समजून गायीजवळ बसून जेवण करणे योग्य ठरेल.

यम द्वितीयेला यमुना नदीत स्नान करणार्‍या बहीण आणि भावाला यमराजाची भीती नसते आणि त्यांना यमलोक बघावं लागत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com