Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधआपले खरे स्वरूप

आपले खरे स्वरूप

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा त्याला असे वाटते त्याचे हे शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. आणि त्याच्या सग्या-सोयरे यांची शरीरंसुद्धा एक दिवस मृत्युस प्राप्त होणार आहेत. यापासून बचावाचा कोणताच मार्ग नाही. याकरिता आपण आपले लक्ष नश्वर शरीरापासून हटवून आपल्या खर्‍या आत्मिक स्वरूपाला जाणावे आणि शाश्वत अमरत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.

आपल्यापैकी बरेच लोक या वास्तविकतेला मानत नाही की शारीरिक स्तरावर आपण नश्वर आहोत. मृत्यू अटळ आहे असे जे जाणतात केवळ तेच लोक दुःखापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या ध्यानाला अन्य मार्गाच्या शोधार्थ लावतात. ते स्वतःला शरीर न समजता आत्मिक रूपात ओळखणे सुरू करतात. संत आणि महापुरुष सांगतात की आपण सर्वजण आत्मा आहोत. एकाच परमात्म्यापासून आलो आहोत. ते जाणून आहेत की जेव्हा आपण स्वतःला आत्मिक रूपात जाणून घेतल्यावर आपल्याला एक खरं अंतरिक्ष यान मिळेल.

- Advertisement -

ज्याच्या सहाय्याने आपण या भौतिक जगताच्या गुरुत्वाकर्षणापासून चिदाकाशात भरारी घेण्यास गती प्राप्त करू शकू. आपला आत्मा भौतिक पदार्थापासून बनलेला नाही. हा तर आत्मतत्वापासून बनलेला आहे. आत्मा एकटाच या भौतिक जगताच्या पार आध्यात्मिक मंडलामध्ये भरारी घेऊ शकतो. आत्मा अविनाशी आहे. हा प्रभूच्या सारतत्त्वापासून बनला आहे. तसेच तो अमर आहे. जेव्हा आपण स्वतःला आत्मिक रूपामध्ये जाणून घेऊ तेव्हा आपण स्वतःला भौतिक अस्तित्वाच्या बंधनात लिप्त पाहणार नाही. आपल्या शरीराकरिता या जीवनाच्या बंधनापासून वाचविण्याचा कोणताच उपाय नाही परंतु आत्म्यासाठी अवश्य आहे.

आपण आत्मिक रूपात स्वतः अनुभूती कशी घेऊ शकतो? ध्यान-अभ्यास हा तोच मार्ग आहे ज्याद्वारे आपण आत्म्यावर पडलेल्या शारीरिक आवरणांना उतरवू शकतो. ज्याप्रकारे आपण आपल्या शरिरावर परिधान केलेला कोट, स्वेटर किंवा शर्ट काढतो. त्याप्रमाणे आपण आपल्या आत्म्याला झाकणार्‍या भौतिक शरिराच्या आवरणांना उतरवू शकतो. ध्यान-अभ्यास आपल्या शरिराची बाह्य आवरण उतरवून आपले खरे स्वरूप म्हणजेच जो आत्मा आहे त्याला प्रगट करतो. तेव्हा आपण हा अनुभव करू शकतो की आपण शरीर नाही. परंतु प्रत्यक्षात आत्मा आहोत. जो की केवळ थोड्या कालावधीकरिता या शरिरामध्ये निवास करण्यासाठी आला आहे.

प्रभू हेच इच्छितात की त्यांची सर्व बालके त्यांच्याशी एकरूप व्हावीत. जिथे सर्व सांसारिक व बौद्धिक ज्ञान संपते तिथुनच आत्मिक ज्ञानाचा आरंभ होतो. आध्यात्मिक खजिने आपल्याच अंतरी आहेत. आपल्या खर्‍या स्वरूपाचा शोध जर आपण बाह्य संसारात करू लागलो तर आपल्या हाती निराशाच लागेल. या भ्रमाला दूर करण्याचा आणि आपल्या खर्‍या स्वरूपाला जाणण्याचा केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण आपल्याच अंतरी ध्यान टिकवून स्वतः हा अनुभव घ्यावा की आपण आत्मा आहोत आणि परमात्म्याचा अंश आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या