क्रोधाचे प्रेमात रूपांतर

अध्यात्मवाणी
संत राजिंदर सिंह जी महाराज
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

प्रत्येक दिवशी अशा घटना घडतात ज्यांचे आपल्याला वाईट वाटते. कधी कधी भयंकर राग ही येतो जेंव्हा कोणी आपल्याला दुखवतो अथवा आपल्याला नाराज करतो. अशी देखील उदाहरणे आहेत कि दुसर्‍याची हानी होतांना व केलेला आघात पाहून आपल्याला राग येतो.

कधी कधी समाजातील एखाद्या समूहावर अन्याय होताना व सहन करताना पण बघायला मिळते. या सर्व प्रसंगी आपल्याला वाटते कि काही तरी चुकीचे घडत आहे. जे काही घडत आहे त्या कडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. फरक फक्त्त एवढाच आहे कि त्या अन्यायाकडे आपण आपली प्रतिक्रिया कशी व्यक्त करतो? आपण निर्णय कसा घेतो? एकतर रागाने प्रतिक्रिया व्यक्त करतो किंवा रागावर नियंत्रण ठेऊन त्याचे प्रेमात रूपांतर करतो. मदर टेरेसा यांनी क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा निर्णय घेतला होता.

जगात क्रोध व हिंसा भरलेली आहे. प्रत्येक गावात, शहरात, घरा घरा मध्ये रागाचा विस्फोट होताना दिसतो. या रागामुळे क्रोधामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न होतो. आपण रागावर पंखा चालवून त्याला विझवू शकत नाही. आपण या क्रोधाच्या अग्नीला प्रेमाच्या पाण्याने विझविले पाहिजे. क्रोधाच्या अग्नीला अग्नीने शांत करता येत नाही. रागाच्या या अग्नीला आपण प्रेमाने शांत करू शकतो. कोणतेहि भांडण झाल्यास रागाने बोलण्या ऐवजी प्रेमाने बोललो तर समोरच्याचा राग शांत होतो. वातावरणात रागीट विचारांचे तरंग वाढविण्या ऐवजी आपण प्रेमपूर्ण विचार पसरवुया. जेणेकरून वातावरण चांगले राहील.

या जगात सगळीकडे क्रोध व हिंसा पसरलेली आहे. तेंव्हा आपण सर्वांनी या जगात शांतता व प्रेमाचे भान ठेऊया. चला तर, या रागाला प्रेमाने जिंकूया आणि मग बघा आपल्या अशा वागण्याने प्रेममय लहरी सर्वत्र पसरतील आणि सगळीकडे शांतता व प्रेम नांदेल. मग तो दिवस दूर नाही की हे सर्व जग सुख, शांती व प्रेमाचे आश्रयस्थान बनेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com