सकारात्मक विचारांची शक्ति

अध्यात्मवाणी
संत राजिंदर सिंह जी महाराज
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

जर आपण आपले विचार, बोल आणि कृतींकडे लक्ष दिले तर, आपल्याला समजून येईल की या तिन्हींपैकी आपले विचार अधिक प्रभावशाली असतात. आणि त्यामध्ये प्रचंड शक्ति असते. बर्‍याचदा आपण असा विचार करतो की जे काही आपण इतरांविषयी विचार करतो त्याबद्दल कोणाला माहीत नसते. परंतु आपण इतरांविषयी जो काही विचार करतो त्यामुळे आपल्या अंतरी तरंग उत्पन्न होतात जे त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतात. जर आपण कोणाविषयी सकारात्मक विचार ठेवला तर दुसरा व्यक्तीसुद्धा त्यास सकारात्मकते प्रति चांगले विचार अनुभवतो. जर ठीक अशाचप्रकारे आपण कोणाविषयी वाईट विचार केला तर तेव्हा सुद्धा तो व्यक्ती त्या वाईट विचारांचा अनुभव घेत असतो.

जेव्हा आपण आपल्या ध्येयाप्रती सकारात्मक विचार करतो तेव्हा हा विचार आपणास यशाकडे घेऊन जातो. विद्यार्थी जीवनात जेव्हा आपण शाळेमध्ये अथवा आपल्या भविष्याविषयी विशेष क्षेत्र निवडतो तेव्हा आपण आपल्या सकारात्मक विचारांद्वारे यश प्राप्त करतो. जे लोक क्रीडा जगताशी संबंधित आहेत आणि ही खात्री बाळगतात की ते चॅम्पियनशिप जिंकू शकतात, जर ते या भावनेने प्रेरित होऊन निरंतर प्रयत्न करतात तेव्हा बर्‍याचदा असं पाहिलं जातं की ते निश्चित रूपाने जिंकतात. जे लोक कलाक्षेत्रात यश प्राप्त करू इच्छितात जर त्यांनी सकारात्मक विचार ठेवले तर ते भविष्यात चांगले कलाकार बनू शकतात.

जर आपण इतरांविषयी नकारात्मक प्रतिक्रिया ऐकली अथवा स्वतः आपण आपल्या डोक्यात नकारात्मक विचार ठेवले तर आपण बर्‍याचदा निराश आणि अयशस्वी होतो. ज्यामुळे आपण प्रयत्न करण्याचे सोडून देतो आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. याकरिता आपल्याला सदैव आपल्या विचारांवर कडक लक्ष ठेवले पाहिजे. चला तर! आपण दररोज चांगल्या विचारांना आत्मसात करून चुकीच्या विचारांना सोडून देऊया आणि त्या सर्व नकारात्मक गोष्टींना आणि प्रतिक्रियांना विसरून जाऊया ज्या आपल्या बाबतीत इतरांनी केलेल्या आहेत.

जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सर्वप्रथम आपण आपल्या परिवाराला भेटतो त्यानंतर दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येतो. आपण आपल्या विचारांना सकारात्मक ठेवले पाहिजे. जर कोणाच्या भेटीमध्ये या बोल-चालीदरम्यान आपल्याबरोबर काही नकारात्मक घटीत झाले असेल, तर आपण त्या घटनेला विसरले पाहिजे आणि त्या व्यक्तीला सुद्धा क्षमा केली पाहिजे. जेव्हा आपण कामकाज करण्यास जातो तेव्हा इतरांच्या सकारात्मक बोलण्यावर आणि कृतीवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर इतर कोणीही चुकीचे काम केले असेल अथवा बोलले असेल तर आपण त्याला विसरावे. अशाच प्रकारे जर आपण आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवीत असू तेव्हासुद्धा आपण त्यांच्या सकारात्मक बोलण्याचा आनंद घ्यावा आणि जर त्यांच्याबरोबर आपले एखादे नकारात्मक बोलणे झाले तर ते सुद्धा विसरून जावे.

जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा संसारिक आणि आध्यात्मिक रूपात आपली प्रगती धीमी होते आणि आपण कोणत्याच बाबतीत आपले काही चांगले करू शकत नाही. आपल्या सकारात्मक विचारांची शक्ती आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय, जे की स्वतःला ओळखणे आणि पिता परमेश्वराची प्राप्ती करणे यात सहाय्यक होते. पिता परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपणास प्रभू प्रेमाची अनुभूती आपल्या अंतरी केली पाहिजे. अध्यात्म हा असा मार्ग आहे जो आपणास प्रभू प्रेमाचा अनुभव कळवितो.

प्रभू प्रेेमाचा अनुभव करण्यासाठी आपल्याला ध्यान-अभ्यासाची विधी तत्कालीन पूर्ण सद्गुरूंकडून शिकली पाहिजे. योग्यप्रकारे ध्यान अभ्यास करण्याकरिता आपल्याला आपले मन स्थिर करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून विचार आपणास कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही. यावेळी आपले मन स्थिर असावे. मन स्थिर करण्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्यानाभ्यासाला दररोज वेळ दिला पाहिजे. आपल्याला कमीत कमी अडीच तास ध्यानाभ्यासाला दिले पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन आपणास हार मानण्यापासून परावृत्त करेल, ज्यामुळे आपले मन तेजगतीने सक्रिय होऊन ध्यानाभ्यासात लागेल आणि निश्चित रुपाने यशस्वी होईल. ज्या परिणामी आपण जीवनातील अन्य क्षेत्रांमध्ये सुद्धा यश प्राप्त करू शकू.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com