अनुभवाचे महत्त्व

अध्यात्मवाणी
अनुभवाचे महत्त्व
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

आपण आपले जीवन भौतिक आणि बौद्धिक ध्येयपूर्तीकरिता वापरतो. परंतु आपण अध्यात्मापासून अनभिज्ञ राहतो. जेव्हा भौतिक मृत्यूच्या उसळत्या लाटा आपल्यावर येतात तेव्हा आपल्यात कोणतेच आध्यात्मिक सामर्थ्य नसते की, आपण आपल्या जीवनाच्या अंतापासून सहजपणे बाहेर निघू शकू. जेव्हा आपणास बातमी मिळते की आपल्याला एखादा प्राणघातक आजार झालेला आहे किंवा अचानक आपला मृत्यू दिसतो तेव्हा आपण भयभीत होतो. आपल्याला समजत नाही की आपण काय करावे. आपण आपला वेळ जीवन आणि मृत्यूचा खरा अर्थ समजून घेण्यात लावला नाही आणि आपण आपल्या जीवनाच्या अंताला घाबरतो.

ज्या लोकांनी ध्यान-अभ्यासाद्वारा आध्यात्मिक चैतन्याच्या प्रवाहात भवसागर तरणे शिकण्यासाठी जीवन व्यतीत केले त्यांना कोणतीच भीती नसते. ते आपल्या जीवनाच्या अंतसमयी शांत आणि निर्भयपणे सामना करतात. कसे? त्यांनी याच जीवनात परलोकातील सौंदर्य पाहिलेले असते. त्यांनी देह भासावर येण्याची कला आत्मसात केलेली असते आणि त्यांनी स्वतः परलोकाची अनुभूती घेतलेली असते. त्यांचा भौतिक रुपाने शेवट येतो तेव्हा त्यांना कशाची भीती? अशा लोकांची शरीररुपी नाव बुडू लागते, तेव्हा असे लोक तरुन जातात.

बहुतांश लोक या जगात मृत्यूच्या सत्यतेकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा या जगात अंत समय येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यांना असे वाटते, बौद्धिक ज्ञान, धनसंपदा, नावलौकिक आणि सत्ता प्राप्त करणे हेच अधिक महत्त्वपूर्ण आहे. पण जेव्हा मृत्यू समीप येतो तेव्हा त्यांना समजते की बौद्धिक ज्ञान आणि सांसारिक धनसंपदा कामी येत नाही. त्याक्षणी त्यांना पश्चाताप होतो की, त्यांनी जीवनात आत्मा, परमात्मा आणि परलोक यांची माहिती करून घेण्यात जास्तीत जास्त वेळ का दिला नाही?

ज्या व्यक्ती लहान वयातच अध्यात्माची शिकवण प्राप्त करून घेतात त्या भाग्यशाली आहेत. ते दररोज काही वेळ आपल्या आध्यात्मिक अभ्यासात लावतात. जेणेकरून ते याच जीवनात देहभासावर येण्याच्या कलेत पारंगत होऊ शकतात. त्यांनी जीवनात भवसागर तरून जाण्याचा अभ्यास केलेला असतो. दैनंदिन ध्यान अभ्यासाद्वारे आपली आध्यात्मिक कुशलता विकसित होते. जेणेकरून आपण तिथे पोहोचू जिथे आपण आंतरिक आत्मिक मंडलाचा अनुभव घेऊ शकू.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com