शांत राहून सक्रीय रहा

jalgaon-digital
4 Min Read

बालपणापासून आपण आपल्या जीवनात काही ना काही कार्य करत असताना प्रत्येकवेळी त्यात व्यस्त राहतो. आई-वडील आपल्या मुलासाठी एक यादी बनवतात. आपले बालपणाचे जीवन एका मागे एक कार्य करण्यात जात असते.आपण शाळेत वेळेवर वर्गात पोहोचण्यासाठी धावपळ करतो. जेव्हा आपण पदवीधर होतो, तेव्हा आपण नोकरी किंवा इतर कोणतेही कामकाज करण्यासाठी धावपळ करतो. आपल्याला भरपूर प्रकारची कामे असतात त्यांना पूर्ण करण्यासाठी आपले सर्व जीवन व्यस्त राहते. यासाठी जेव्हा पण आपण अभ्यास करण्यासाठी बसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण शांत बसणे आणि आपल्या मनाला शांत करणे महाकठीण असते.

साधारणपणे आपण आपल्या कामकाजाला अधिक महत्त्व देतो. जेवढे जास्त काम करतो तेवढं जास्त चांगलं वाटतं. खूपच कमी माणसे शांत होऊन मौन अवस्थेत बसण्याला महत्त्व देतात. आपण विचार करतो की जर आपण शांत बसलो तर आपण काही करत नसतो. आपण घाबरतो की आपल्याला आळशी किंवा अकार्यक्षम म्हटले जाईल. वास्तविक प्रत्येक व्यक्तीने आपल्या सर्व व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून शांत होऊन मौन अवस्थेत बसले पाहिजे. शांत राहण्याचे जीवनात भरपूर फायदे आहेत. शांततेमध्ये आपल्याला रचनात्मक विचार येतात. शांत राहून आपण अडचणीतून मार्ग काढतो त्यामुळे आपले संबंध चांगले होतात. शांततेमुळे शास्त्रज्ञ, संगीतकार, कलाकार, कवी, लेखक,तत्त्वज्ञानी आणि संशोधक एक उत्तम रचना निर्माण करून प्रसिद्ध होतात. शांततेमुळे नवीन नवीन विचार येतात, जे विश्वात अद्भूत बदल आणतात.

अशाप्रकारे शांत होऊन आपण आपल्या आत्म्याला ओळखू शकतो आणि पिता- परमेश्वरला प्राप्त करू शकतो. आपण बाहेरच्या कामकाजामुळे परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. परमात्म्याला केवळ अंतरी प्राप्त करू शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या विकसित होण्यासाठी ध्यान व ध्यानासाठी शांतता खूप आवश्यक आहे. आपले जीवन व्यस्त रुळावरून पळणार्‍या रेल्वे प्रमाणे आहे. आपण व्यस्त राहण्यास इतके अधीन झालो आहोत की आपल्याला कामकाजाला थांबून शांत बसणे अवघड वाटते. जसे कोणत्याही समस्यांचा उपाय शोधण्यासाठी किंवा काही नवीन बनविण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण त्यावर लक्ष देतो. याप्रकारे स्वतःला ओळखणे आणि परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला शांत बसणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण शांत होऊन बसतो तेव्हा कदाचित दुसर्‍याच्या नजरेतून आपण काही करत नसतो. परंतु अशा अवस्थेत आपण स्थिर व शांत होऊन स्वत:ला ओळखणे व परमात्म्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. केवळ काहीच लोक परमात्म्याला प्राप्त करतात, कारण तेच लोक आपले ध्यान बाहेरून हटवून अंतर्मुख करतात. जर आपण शांत होऊन काही न करता बसणे शिकलो तर आपण सर्व काही प्राप्त करू शकू. हे चांगले होईल की आपल्यातील प्रत्येक व्यक्ती रोज वेळ काढून शांत होऊन बसण्याचा अभ्यासाचा सराव करावा.

जर आपण काही वेळ शांत बसलो तर याचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. आपण आपल्या कामातून काही वेळ शांत होऊन हा विचार करायला पाहिजे की का आपण आपले काम चांगल्या तर्‍हेने करतो का? आणि जर नाही तर यापेक्षा उत्तम कशाप्रकारे करावे? ज्यामुळे आपण काम करण्याचे नवीन आणि चांगले प्रकार जाणू शकतो. जर आपण घर चालवितो तर काही वेळ शांत राहून हे जाणू शकतो की आपण आपल्या परिवाराच्या समस्या कशा सोडवाव्या किंवा आपल्या परिवाराचे जीवन कसे चांगल्याप्रकारे बनवू शकतो? जर आपण कला क्षेत्राशी जोडलेले आहोत तर आपण शांत अवस्थेत बसून आपल्या रचनात्मकतेवर लक्ष देऊ शकतो.

जर आपण आपल्या जगातील कामात शांततेने बसण्याची कला शिकलो तर हे आपल्याला ध्यान-अभ्यासामध्ये फायदेशीर राहील. आपण स्वतःचा अनुभव कराल की आपल्यामध्ये अस्वस्थता आणि पळापळ कमीत कमी होते. तेव्हा आपण जास्त वेळेपर्यंत स्थिर राहण्याची क्षमता वाढवू शकतो. आपण आपल्या मनाला शांत करून आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू शकू. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण पाहतो की आपला आत्मा परमात्म्याला प्राप्त करण्याचा धावा करतो. जर आपण शांत राहिलो तर तेव्हा आपण परमात्म्याचा आवाज म्हणजे प्रभूच्या शब्दाला ऐकू शकू.

आपण शांत राहून वेळेबरोबर आपण सर्व कामकाजामध्ये संतुलन आणू शकतो. ज्याचे फायदे आपण आपल्या ध्यान-अभ्यासाच्या प्रगतीमध्ये होतात. असे केल्याने आपण मिळवितो की आपण प्रभूच्या प्रेमाचा अनुभव आपल्या अंतरी करू करतो आणि परमात्म्याच्या प्राप्तीच्या मार्गावर जलद प्रगती करू शकतो

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *