जीवनात प्राथमिकता कशी द्याल?

jalgaon-digital
3 Min Read

आपण भले व्यवसाय क्षेत्रात असाल किंवा शैक्षणिक किंवा चिकित्सा किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात असाल आणि आपल्या परिवाराचा सांभाळ करीत असाल आपल्याला वेळोवेळी आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच हे देखील लक्षात घेतले पाहिजे की आपण ते प्राप्त करण्यात सफल होत आहोत की नाही.

आपण स्वतःलाच विचारला पाहिजे की आपलं लक्ष कुठे आहे? आपल्या प्राथमिकता काय आहेत? अशी ही शक्यता असते की आपण आपल्या करिअर आणि जीवनातील आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष तसंच वेळ ही देतो, ज्यामुळे आपण आपला परिवार तसेच आपला व्यक्तिगत विकास आणि आपली अध्यात्मिक प्रगती या सर्वांकडे आपलं दुर्लक्ष होतं.

या संदर्भात एका तरुणाची एक रोचक गोष्ट आहे, ज्याला रस्त्यावर चालताना एक रुपयाचे पडलेले नाणे मिळाले. त्याला हे माहीत नव्हते की ते नाणे कोणाचे आहे, म्हणून त्याने ते ठेवून घेतले. ते नाणे मिळाल्यानंतर तो मुलगा खुश झाला. आणि नंतर तो जेंव्हा रस्त्यावर चालायचा तो नेहमी खाली पाहत जायचा की एखाद्या नाणे पडलेलं मिळेल. जसं जसं त्याचं वय वाढत गेलं तसं तसं त्याची रस्त्यावर चालताना ही सवय तुटली नाही. वृद्धावस्था आल्यावर एके दिवशी त्याने ही सर्व नाणी काढलीत जी त्याला आयुष्य भरात रस्त्यात पडलेली मिळालीत. ती सर्व रक्कम पन्नास रुपयाच्या आसपास होती. जेंव्हा त्याने ही गोष्ट आपल्या मुलांना सांगितली तेंव्हा त्याची मुलगी त्याला म्हणाली आपण आयुष्यभर खाली पाहून चालण्यात घालविले आणि केवळ पन्नास रुपये कमावलेत. परंतु, या कालावधीत आपण हजारो सुंदर असे सूर्योदय-सूर्यास्त, शेकडो आकर्षक इंद्रधनुष्य, मनमोहक वृक्षवेली, सुंदरसं निळे आकाश तसंच बाजूनी जाणार्‍या हजारो लोकांचे स्मितहास्य न पहाता वाया घालवलेत. खरोखरच आपण आपल्या जीवनात या सर्व सुंदर गोष्टींचा अनुभव घेतला नाही.

आपल्यापैकी असे किती लोक आहेत की जे या या स्थितीत असतात? शक्यता आहे की आपण रस्त्यावर असे पडलेले पैसे शोधत नसू परंतु आपण धनार्जन करण्यात, संपत्ती जमवण्यात इतके अधिक व्यस्त झालो असू की त्यामुळे आपल्या जीवनातील अन्य बाबींकडे आपलं दुर्लक्ष झाले असेल? यामुळे केवळ निसर्गाची सुंदरता आणि दुसर्‍यांशी गोड नाती जपण्यात आपण वंचित राहतो, एवढंच नाही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी संपत्ती जी आध्यात्मिक संपत्ती आहे ती सुद्धा आपण हरवून बसलो.

आजिविकेसाठी कमावणे काही चुकीचे नाही. परंतु पैसा कमवताना आपण त्याला एवढं महत्त्व देतो की आपले स्वास्थ्य, आपला परिवार, आपली आध्यात्मिक प्रगती या सर्वांकडे आपल्या दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपलं जीवन असंतुलित होत जाते. आपण सांसारिक जबाबदार्‍या सांभाळताना, त्याबरोबरच आपली आध्यात्मिक प्रगतीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. आपण असे समजतो की अध्यात्मिक मार्ग अवलंबताना सर्व वेळ ध्यान अभ्यास करण्यासाठीच द्यावा लागतो. परंतु सत्य स्थिती अशी आहे की आपण त्या क्षेत्रात मागे राहता कामा नये.

जीवनात प्राधान्य निवडतांना आपण रोज थोडा वेळ अध्यात्मिक साधनेसाठी, थोडावेळ निष्काम सेवेसाठी, थोडावेळ परिवारासाठी, थोडा वेळ नोकरी अथवा व्यवसायासाठी दिला पाहिजे. असे केल्याने आपल्याला जाणवेल की आपण सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम प्रगती केलेली आहे तसेच एक समाधानी जीवन जगून सर्व ध्येय प्राप्त केलेले असतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *