Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधजीवनात संकटाशी सामना

जीवनात संकटाशी सामना

अनेक वेळा आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांजवळ लहान-सहान गोष्टींच्या बाबतीत तक्रार करीत असतो. आपल्या बालपणात आपल्याला बाल्यावस्थेतील आजार होत असतात. नंतरच्या आयुष्यात देखील आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा आपल्या पोटात दुखते.

आपल्यातील बरेच लोक या गोष्टीमुळे त्रस्त होतात आणि तक्रार करतात. परंतु, आपण आपल्या आजूबाजूला जर दृष्टी टाकली तर कित्येक लोक अपंगत्वामुळे पीडित झालेले दिसतात. आपण पाहतो कोणाला शरीराचे एखादे अंग नसते, कोणी जीवघेण्या आजाराने ग्रासलेला असतो. यांच्यातील काही लोक असे देखील असतात जे कठीण परिस्थितीत देखील आनंदी जीवन जगत असतात. ते आपल्या शारीरिक वेदनांचा परिणाम आपल्या मनावर व आत्म्यावर होऊ देत नाहीत.

- Advertisement -

वास्तविक पाहता आपण आत्मा आहोत. आपले खरे स्वरूप आत्मिक आहे. शरीर हे केवळ आत्म्यावरील आवरण आहे. अध्यात्माद्वारे आपण आपल्या खर्‍या अंतरिक स्वरूपाला ओळखू शकतो. नामस्मरण, ध्यान आणि भजन तसेच प्रार्थनेच्या मदतीने आपण आपल्या आत्म्याला शरीरापासून वेगळे करू शकतो, जेणेकरून आपण वास्तवात कोण आहोत याची आपणास जाणीव होते.

आपल्यातील अनेकांजवळ मोटर कार आहे. अनेक वेळा ती नादुरुस्त पण होते. तेव्हा आपण तिला दुरुस्तीसाठी पाठवतो. यामुळे आपली काही दिवस असुविधा होते. अथवा दुसरी कार भाड्याने घ्यावी लागते. अथवा आपल्या कुटुंबातील कोणा एकाची किंवा मित्राची कार आपल्याला इकडे तिकडे जाण्यासाठी घ्यावी लागते. लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की,या अडचणीमुळे आपले जीवन संपले आहे असे आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्याला याची जाणीव असते की कार एक भौतिक वस्तू आहे. तिचा उपयोग एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरिता आपण करतो. त्याचप्रमाणे आपले शरीरदेखील आपल्या आत्म्यासाठी एक भौतिक साधन आहे. कधी कधी यामध्ये देखील बिघाड होत असतो. परंतु त्यामुळे आपल्या आत्म्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. आपण आपले जीवन आनंदात जगू शकतो, भलेही आपली भौतिक साधने खराब असो वा चांगली.

जीवनात कोणत्या ना कोणत्या पडावावर आपल्याला शरीरावरील वाढत्या आयुष्याच्या खुणा दिसायला लागतात. वैज्ञानिकांनी जीनोम प्रोजेक्टमध्ये जीन म्हणजे गुणसूत्रांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे आपले आयुष्य वाढविण्यास उपयुक्त ठरतील आणि असेही होऊ शकते कि एक दिवस असा देखील येईल जेंव्हा अनेक लोक शंभर वर्षापेक्षा अधिक काळ जगतील. तरी देखील एक दिवस असा अवश्य येईल, जेव्हा आपले हे चांगले शरीर काम करू शकणार नाही जसे तारुण्याच्या अवस्थेत करीत होते. परंतु यामुळे आपण निराश होता कामा नये. वृद्धावस्थेत बर्‍याच जणांचे शारीरिक स्वास्थ्य ठीक राहत नसते, परंतु ही बाब आपल्या अंत:करणात शांती प्राप्त करण्यापासून रोखू शकत नाही.

ह्याच प्रकारे आपण सुद्धा शारीरिकदृष्ट्या अनेक आव्हानांना तोंड देऊन जीवनात त्याचा भरपूर लाभ उठवू शकतो. आपल्या अंतरी प्रभू प्रेमाच्या संपर्कात येऊन त्याच्या दिव्य प्रेमामृताचा स्वाद इतरांना आपण वाटू शकतो, जे आपली काळजी घेतात. आपल्यापैकी प्रत्येकजण हे असे करू शकतो. सत्य परिस्थिती अशी की जे आजारी आहे ते आपले भौतिक आवरण आहे. आपला आत्मा तर सदैव स्वस्थ असतो. आपण आपल्या शारीरिक परिस्थितीचा आपल्या मनावर आणि आत्म्यावर प्रभाव पडू देत नाही. तसेच आत्मविश्वास आणि सकारात्मक मार्ग आत्मसात करून या परिस्थितीवर विजय प्राप्त करू शकतो आणि दुसर्‍यांच्याही जीवनात आनंद भरू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या