Saturday, May 11, 2024
Homeभविष्यवेधनभांच्या पलीकडे...

नभांच्या पलीकडे…

सध्या जगात भौतिक विकास खूपच झालेला आहे. आवागमना करिता कधी कधी आपण विमानात बसून प्रवास करतो. जेव्हा विमान जमीनीवरून आकाशात झेप घेते, तेव्हा त्याला घनदाट ढगांतून जावे लागते. जेव्हा आपण ढगांच्या मधून विमानाने प्रवास करत असू तेव्हा, आपण जर विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहिले तर आपल्याला काहीच दिसणार नाही.

त्यावेळी आपल्याला पांढर्‍या रंगाचे धुकं नजरेस पडते. जेव्हा विमान त्या ढगांच्या पलीकडे जाते आणि काही ठराविक फूट उंचीवर पोहोचते तेव्हा तिथे सुंदर निळे आकाश आणि चमकणारा सूर्य दिसतो. तेव्हा जर आपण खाली पाहिले तर, आकाशातील ढग पसरलेल्या कापसाचे ढिगां प्रमाणे हवेत तरंगताना दिसतात आणि हे दृश्य मोठं अद्भुत वाटतं.

- Advertisement -

जर आपण या गोष्टीचा विचार केला तर, आपले विमान जेव्हा घनदाट ढगांच्या पलीकडे जात होते त्यावेळी आपल्याला खूप व्यापक असं धुकं नजरेस पडत होते. त्यावेळी आपल्याला असही वाटत नव्हतं की, त्या ढगांच्या पलीकडे एखादं सुंदर तसेच मनमोहक आकाश सुद्धा आहे, जिथे सूर्याचा प्रकाश चमकत आहे. परंतु जेव्हा आपण उंच उंच जात असतो तेव्हा त्या ढगांच्या पलीकडे काय आहे हे आपण पहात असतो. तिथे त्या मनमोहक दृश्याच्या बरोबर प्रकाश सुद्धा असतो.

पावसाळ्यात जेव्हा घनदाट ढगांना पाहतांना सूर्याचा प्रकाश दिसत नाही, हे आपल्याला समजते. परंतु जेव्हा आपण विमानात बसून उंच उंच जातो तेव्हा आपण पाहतो की तिथे प्रकाशच प्रकाश आहे. सर्व महापुरुषांनी याचे वर्णन आपापल्या वाणीमध्ये व्यक्त केलं आहे.

ज्या लोकांनी आपल्या जीवनात अध्यात्मिक मार्ग स्वीकारलेला नाही त्यांच्याकरिता या गोष्टीवर विेशास ठेवण ही मात्र एक कल्पना आहे की, आपल्या अंतरातील अंधाराच्या पलीकडे प्रकाश सुद्धा आहे. सर्व महापुरुष आपणास हेच समजावितात की, आत्मज्ञानाचा अनुभव सुद्धा विमानात बसून झेप घेण्यासारखाच आहे.

जेव्हा आपण ध्यान-अभ्यासाला बसतो, तेव्हा आपण आपले डोळे बंद करतो, तेव्हा आपल्याला अंधारच अंधार नजरेला पडतो. परंतु जसजसा वेळ जात असतो, तेव्हा आपल्या अंतरातील अंधाराच्या पलीकडील प्रकाशाचा अनुभव आपण पण करू शकतो आणि त्याशिवाय अद्भुत अशी दृश्य दिसू लागतात. ज्याप्रमाणे विमानाचा कप्तान आपल्याला ढगांच्या पलीकडे घेऊन जातो जिथे सूर्याचा प्रकाशच प्रकाश दिसतो. अशाच प्रकारे आपल्या अंतरातील सूर्यदर्शन करण्यासाठी अनुभवी गुरूंची आवश्यकता आहे, जे आपणास ध्यान-अभ्यासाची कला शिकवतील. तेव्हा आपण ढगांच्या पलीकडे म्हणजेच आपल्या अंतरातील अंधाराला छेदून प्रकाशाने भरलेल्या अध्यात्मिक मंडलांचा अनुभव करू शकू. हि अध्यात्मिक मंडले सौंदर्याने आणि प्रभू प्रेमाने युक्त आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या