झोपेची दिशा आणि आपले आरोग्य

jalgaon-digital
2 Min Read

वास्तूनुसार घरात कोणत्या दिशेला काय ठेवावे, कोणत्या दिशेला देवांचे फोटो असावे,कोणत्या दिशेत झाडं लावावी, कोणत्या दिशेने दरवाजा असावा, कोणत्या दिशेने स्वयंपाकघर असावं कोणत्या दिशेला पाय करून झोपावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहे. काही नियमांना मनुस्मृती, महाभारत, विष्णुस्मृती, पद्मपुराण यांचा आधार देण्यात आला आहे. यातलेच काही वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहणार आहोत. झोपतांना या नियमांना लक्षात घेऊन झोपलात तर निरोगी आणि दीर्घायुष्य लाभतं.

मनुस्मृतीनुसार निर्जन घरात एकटेच झोपू नये. मंदिर आणि स्मशानभूमी मध्ये झोपू नये. असे सांगण्यात आले आहे. विष्णुस्मृतीनुसार झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. तो व्यक्ती घाबरून जाण्याची शक्यता असते. चाणक्यनितीनुसार विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर ते बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. देवी भागवतात सांगण्यात आले आहे की, निरोगी शरीर हवे असेल तर ब्रम्हमुहूर्त म्हणजे पहाटे 5 ते 7 च्या दरम्यान उठले पाहिजे. पद्मपुराणात सांगितले गेले आहे की पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नका.

अत्रीस्मृतीनुसार ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामाला मिळतो,असे म्हटले जाते. महाभारतानुसार तुटलेल्या खाटावर आणि उष्ट्या तोंडाने किंवा तोंड न धुता झोपू नये. ब्रम्हवैवर्तपुराणानुसार, दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपल्यास गरिबी येते आणि असहाय होतो.

दिशेनुसार झोपण्याचे फायदे तोटे – पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास विद्या प्राप्त होते, शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास तोटा होतो, मृत्यूचे भय कायम राहते. दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते. तसेच दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. यम आणि दुष्ट देवता यांचे ते निवासस्थान मानले जाते. त्यामुळे कानात अशुद्ध हवा भरते. त्यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण कमी होते. स्मरणशक्ती कमी होणे, मृत्यू आणि बरेच आरोग्य संबंधी समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसा कधीही झोपू नका. पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी तासभर झोप घेऊ शकतात. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होत जाते. कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे.

कधी झोपले पाहिजे – सूर्यास्ताच्या तीन तासांनंतर झोपायला पाहिजे. डाव्या बाजूस झोपण आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *