अनुभवातून स्व-परिवर्तन घडलंच पाहिजे

सद्गुरुंचा संदेश
अनुभवातून स्व-परिवर्तन घडलंच पाहिजे

आयुष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचे अनुभव आलेत याने काहीच फरक पडत नाही. ते अनुभव तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे रूपांतरण घडवून आणतात हे फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्यात स्व-परिवर्तन घडून येत नाही तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही. याचा अर्थ असा नाहीये की आपला कायापालट करायच्या मागे आपण लागायचं.

जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर परिवर्तन होतंच यात शंका नाही. प्रत्येकजण समान प्रकारच्या अन्नातून समान पोषण प्राप्त करतात असं नाही. हे वैद्यकीयदृष्ट्या सुद्धा सिद्ध केलं गेलं आहे. त्याचप्रमाणे, एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही. उदाहरणार्थ, एकाच कुटुंबातील दोन मुले जरी एक समान वातावरणात एकत्र वाढली असली तरी, दोघं एकमेकांपासून खूप भिन्नरित्या मोठी होतात. जरी दोघांना सारख्याच गोष्टी दिल्या गेल्या असल्या तरी एक या दिशेला तर एक दुसर्‍या दिशेला.

एक आध्यात्मिक प्रक्रिया, जर तिला जागृत करायचं असेल, तर त्यासाठी परित्यागापेक्षा फक्त शहाणपणाने जगणे गरजेचे आहे. कोणत्याही भारतीय भाषांमध्ये परित्याग असा शब्द नव्हता. बाहेरून आलेल्या विद्वानानीच असे म्हटले की, ह्या व्यक्तीने सर्वस्व त्यागले आहे. ते तसे नाही, त्याने संपूर्ण विश्वाला आपले मानले आहे. परुंतु त्या विद्वानांना असे वाटले की त्याने सर्वस्वी त्यागले आहे.

ही त्यांची समज होती, कारण काही ना काही गोष्ट आपल्या मालकीची आहे असा शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते: या धरतीचा एक भाग माझा आहे. याशिवाय लोक कसं काय जगतात हे त्यांना समजत नव्हते. ज्याने सम्पूर्ण ब्रम्हांडालाच आपलंस केलंय; त्याला आपण यासगळ्या गोष्टी आपल्याभोवती साठवून ठेवाव्यात असा विचारच त्याच्या मनात उदभवत नाही. तसंही सगळे ग्रह, तारे तर त्याचेच आहेत. संपूर्ण आकाशगंगा सुद्धा त्याचीच आहे. काहीतरी जमवून ते पोतडीत साठवावं किंवा बँकेत शाबूत ठेवावं असा विचारच कधी त्याच्या मनी उमटला नाही. हा काही त्याग नव्हे.

जीवन हे भौतिकतेच्या दृष्टीने नव्हे, तर आपल्या आंतरिक दृष्टिकोनातून आपण समजून घेतले पाहिजे, कारण जे काही तुम्ही बाह्य जगाचे आकलन करून घेता त्याचा उपयोग फक्त उदरनिर्वाहासाठी होऊ शकतो. तुम्हाला आंतरिक दृष्टीकोनाची गरज आहे. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभवानिशी आपले आयुष्य समृद्ध करावे की त्याचा वापर जीवनाचा अधिकाधिक प्रतिरोध करण्यासाठी, याचा निवडा तुम्हीच करायला हवा.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com