ही वेळही निघून जाईल

jalgaon-digital
3 Min Read

प्रत्येक मनुष्याला जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो टाळता येत नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण आपले जीवन मार्गक्रमण करीत असताना चढ-उतारांना सामोरे जातो, तेव्हा आपण शांतता गमावून अस्थिर होऊ इच्छितो का ?

आपण आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेमुळे स्वतःला प्रभावित होऊ दिले, तर आपल्याला असे वाटेल की आपण सर्व वेळ रोलर कॉस्टर वर चाललो आहोत. म्हणजेच आपण आनंदाच्या अतिउच्च शिखरावरून निराशेच्या खोल गर्तेत पोहोचू आणि मग पुढच्या क्षणी आनंदाच्या शिखरावर परत येऊ.

हा सततचा बदल अनेकदा भय, ताण आणि दहशत निर्माण करतो. कारण पुढे काय होईल हे आपल्याला कधीच माहीत नसते. कालांतराने भीती व तणाव असलेली हि अवस्था आपल्या मनाचा अविभाज्य भाग बनते. आपण शांत आणि तणावमुक्त होऊ शकत नाही, कारण जीवनातील चढ-उतारांवर आपले काही खास नियंत्रण नसते. आपण शांति व तणावरहित जीवन कसे जगायचे?

जीवनात वादळ आणि समृद्धी च्या दरम्यान एक शांत जागा शोधून आपण समतोल जहाजात स्थिर होऊ शकतो. आपण ध्यान-अभ्यास व प्रार्थनेद्वारे शांत अवस्थेत पोहोचू शकतो. आपल्या अंतरात सर्व दिव्यशक्ती आहेत. आपण फक्त शरीर आणि मन नसून आत्मा आहोत. आत्मा ज्योती, प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण आहे.

कसं काय? तर आत्म्याचा दिव्य स्रोत परमात्मा हा पूर्ण, ज्योती, प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. आत्मा त्याच्याशी सदैव जोडलेला असतो. सृजनशील शक्ती म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच तत्त्वाने बनले आहेत. जर आपण दररोज काही वेळ नित्य नियमाने ध्यान-अभ्यास केला तर आपण सुद्धा परम आनंद प्राप्त करू शकतो.

तेव्हा कुठे जीवनात आपण बाह्य परिस्थितीमुळे विचलित होणार नाही. शांति आणि समन्वयाने परिपूर्ण भरलेल्या ठिकाणी कसे पोहोचायचे ते आपण शिकू शकतो. ज्यामुळे जीवनाच्या चढ-उतारा नंतरही आपल्याला चिरंतन शाश्वत आनंद मिळत राहील. आपण आपल्या अंतरातील स्थिर अशा अवस्थेस पोहोचू शकतो जे जीवनातील चढ-उतारांशिवाय आपणास शाश्वत आनंद देऊ शकेल.

जेव्हा पुढील भविष्य काळात आपल्याला काही कष्ट होतील तेव्हा आपण लक्षात ठेवावे की,‘ही वेळही निघून जाईल’. हे पाच शब्द आपल्याला या संकटातून सहजपणे आणि विश्वासपूर्वक बाहेर येण्यास मदत करतील. हे आपणास लक्षात आणून देतील की, आपण आपल्या अंतरातील शांति च्या स्थानाला ध्यान-अभ्यासाद्वारे शोधू शकतो.

तसेच पुढील भविष्य काळात आपण खूप आनंदी असू तेव्हाही आपण लक्षात ठेवावे की, ‘ही वेळही निघून जाईल’ जेणेकरून या क्षणांचा आपण आनंद घेऊ शकू. ही वेळ गेल्यानंतर आपण उदास होता कामा नये. हे आपल्याला लक्षात आणून देतील कि हा आनंदाचा क्षण नष्ट होईल आणि कष्टाचे दिवस येतील, परंतु हा आनंद पुन्हा परत येईल.

हे आपणास आठवण करून देतील की आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरातील शांति स्थळाचा शोध घ्यावा, कारण तेच आपल्याला चिरशांति प्रदान करेल.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *