Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधतरुणाई अनेक शक्यता प्रदान करते

तरुणाई अनेक शक्यता प्रदान करते

आज अनेक तरुण योग आणि ध्यानाकडे वळत आहेत. तरुण म्हणजे घडत असलेली मानवता होय. ते अजून पुर्णपणे तयार झालेले नाहीत, परंतु त्या दिशेने वाटचाल करत आहेत; ही एक प्रचंड मोठी शक्यता आहे.

कारण ते घडत असतात, म्हणून ते त्यांना त्यांच्या इच्छेनुसार हवा तो आकार देऊ शकतात, आणि तरुणांकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. त्यामुळे तो काळ असा आहे ज्यात ते स्वतःला सर्वांग सुंदर मनुष्य किंवा सर्वात अभद्र मनुष्य घडवू शकतात, स्वतःला एक जबरदस्त शक्यता किंवा एक मोठा अनर्थ होऊ शकतात.

- Advertisement -

जेव्हा कुटुंबात काही तरुण मुले असतात, तेव्हा कुटुंबातील वडीलधारी लोक जरा चिंताग्रस्त असतात कारण, हे तरुण एक अद्भूत मनुष्य किंवा एक भयंकर अनर्थ बनण्याची शक्यता ते दररोज आपल्यासमोर पाहत असतात. यामुळे वडीलधार्‍या मंडळींच्या मनात भय निर्माण होते कारण हे तरुण अजून घडत असतात. तर एक तरुण म्हणजे तो अजूनही बदल स्वीकारायला तयार आहे, जी एक खूप सुंदर शक्यता आहे. तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आणि बुद्धिमता बहरून येते. पण त्याच वेळेस, त्यांची संप्रेरके किंवा हार्मोन्स त्यांच्या बुद्धीला वेठीस धरू शकतात; ही तरुणाईची एक मोठी समस्या आहे.

अचानक ते इतर कोणत्याच दिशेने विचार करू शकत नाहीत. जर युवकांना हे शिकवले गेले की ह्या गोष्टींना दडपून ठेवू नये आणि हा सर्वांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे, पण त्यापलीकडे जाण्याची आवश्यक तेवढी समज त्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे त्यांच्यामधील ही अनिवार्यता हाताळण्याची आवश्यक तेवढी जागृती आणि सजगता असेल, थोडे अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर, ते एक विलक्षण शक्यता आहेत. अन्यथा, तरुणवर्ग फार निवार्य आणि सक्तीपूर्ण विषयांमध्ये अडकू शकतात. पण ते जरा अधिक सजग बनले, तर मानवतेचेभविष्य उज्ज्वल आहे.

भारतीय संस्कृतीत मानवी जागृती वृद्धिंगत करण्यासाठी पूर्वी खूप मोठी गुंतवणूक करण्यात आली होती, पण आज मात्र ती संपुष्टात आलेली दिसते आणि अनेक मार्गांनी, आम्ही ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून दुर्दैवाने तसेघडलेले नाही, पण तसे घडून येईल अशी आम्हाला आशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या