तुमचा स्व-निर्मित हॉरर चित्रपट

सद्गुरुंचा संदेश
तुमचा स्व-निर्मित हॉरर चित्रपट

प्रश्न - सद्गुरू, आपण जर कशाला घाबरत असू, तर त्यावर कशी मात करावी? म्हणजे, मला स्वतःला अमानवी गोष्टी आणि भूतांची भीती वाटते.

सद्गुरू - म्हणजेच, तुम्ही अशा गोष्टीला घाबरत आहात, जी तुम्ही कधी पाहिली नाही. याचाच अर्थ असा की मनुष्याजवळ असलेलं एक मूलभूत आणि महत्वाचं वरदान, आता तुमच्या नियंत्रणाबाहेर झालेलं आहे. इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत, मनुष्याकडे अतिशय स्पष्ट अशी स्मरणशक्ती आहे. काल काय काय घडले ती प्रत्येक गोष्ट आपण आज आठवू शकतो. या स्मरणशक्तीमुळेच, आजचा दिवस कसा हाताळायचा, हे आपण समजून घेऊ शकतो. यालाच आपण ज्ञान किंवा माहिती असे म्हणतो. काल आपणाला जे समजले, उकलले किंवा अनुभवले, त्यालाच आज आपण ज्ञान असे म्हणतो.

स्मरणशक्तीची स्पष्ट जाणीव आणि असामान्य कल्पनाशक्ती हे दोन घटक मानवाला इतर प्राणिमात्रांपासून उदा. गांडूळ, टोळ व अशा सगळ्यांपासून वेगळे करतात. पण हेच दोन घटक बहुतांश माणसांसाठी वेदनादायी ठरत आहेत.

दहा वर्षांपूर्वी काय घडले याचा लोकांना त्रास होतो, आणि परवा काय घडणार आहे ह्याचासुद्धा त्रास लोकं आजच करून घेतात. किंबहुना, जे अस्तित्वातच नाही, त्यापासून ते पिडीत आहेत. त्यांची स्मरणशक्ती आणि त्यांची कल्पनाशक्ती त्यांना त्रास देते आहे. अशा दोन देणग्या ज्यांनी मानवाला वेगळेपण बहाल केले आहे.

तुम्ही त्यांच्या उत्क्रांती विकासाचा त्रास करून घेत आहात. म्हणजेच, वास्तविक की तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीपासून पीडित आहात. तुम्ही केवळ एक भयपट पाहत आहात. असं आहे तर मग तुम्ही त्याचा आनंद का लुटत नाही? अडचण ही आहे की, त्याचे दिग्दर्शन निकृष्ट दर्जाचे आहे. तुमची स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आहेत. आणि नाट्य आपोआपच घडत आहे.

लोकं म्हणतात, हा मनुष्य स्वभाव आहे. हा मनुष्य स्वभाव नाही. हा अशा लोकांचा स्वभाव आहे, ज्यांनी त्यांच्या स्वभावाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलेलंच नाही. तुमच्या मनात चाललेलं नाट्य कसं नियंत्रित करायचं हे जर तुम्हाला माहीत असतं, तर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवलं असतं, भयभीत नाही. माझ्या कामाचे सार हेच आहे - या नाट्याला काहीतरी अर्थ प्राप्त करून देणे, ज्यामुळे तुमच्या नाट्याचे उत्कृष्ठ दिग्दर्शक तुम्हीच बनाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com