स्वार्थी बनताना कंजुषी कसली?

सद्गुरुंचा संदेश
स्वार्थी बनताना कंजुषी कसली?

सद्गुरू म्हणतात, स्वार्थ अटळ आहे, कारण आपण केवळ आपल्या नजरेतून आयुष्याकडे पाहू शकतो आणि त्यापरीनं ते समजू शकतो.

प्रश्न : निस्वार्थी होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता?

सदगुरू : तुम्ही स्वतःला स्वार्थी होण्यापासून वाचवू शकत नाही. मला स्वार्थी नाही व्हायचं, मला स्वार्थी नाही व्हायचं... हे उदगारच मुळात खूप स्वार्थी आहेत. स्वतःकडे नीट बघा आणि मला सांगा, तुम्ही खरंच निःस्वार्थी बनू शकता का? तुम्ही कोणत्याही अनुषंगाने ह्या गोष्टीकडे पहा, तुम्ही आयुष्याकडे फक्त स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता. म्हणूनच निःस्वार्थी होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. स्वतःला नैतिकतेच्या मोजदंडात मापू नका. जरा पहा, निःस्वार्थी बनून जगता येतं का? स्वतःला असं समजावून स्वतःची फक्त फसवणूक होईल. निःस्वार्थीपणा हे असत्य आहे, जे नैतिकतेमुळे ह्या जगात जन्माला आलं आहे. यामुळे जगात फक्त लोकांची फसवणूक होत आहे.

लोकांना वाटतं, ते काहीतरी निःस्वार्थी हेतूने करत आहेत. पण ते निःस्वार्थीपणाने करण्याचं कारण म्हणजे, त्यांना त्या भावनेतून आनंद मिळतो. म्हणजेच निःस्वार्थी बनण्याचा प्रश्न येतच नाही. स्वार्थी व्हा, पूर्णतः स्वार्थी होऊन जा. तुमची समस्या अशी आहे की, तुम्ही स्वार्थी होतांना सुद्धा कंजुषी करता.

आत्ता तुमचा स्वार्थ मला आनंदी व्हायचंय इथपर्यंतच मर्यादित आहे. संपूर्ण स्वार्थी बना: अख्ख ब्रह्मांड आनंदात असलं पाहिजे. प्रत्येक अणून अणू संतुष्ट असला पाहिजे.पार स्वार्थी होऊन जा. मग कुठलीच अडचण आड येणार नाही. तुमची समस्या ही आहे की, तुम्ही स्वार्थी बनण्यात सुद्धा काटकसर करता. चला स्वार्थी होऊया, ह्यात अडचण काय आहे? असीमित, अमर्याद स्वार्थी होऊयात! निदान स्वार्थ जपण्यात कुठे कमी पडूया नको. आयुष्याच्या अनेक बाबतीत आपण काहीतरी कसर ठेवतो. पण मतलबी होतांना तरी पूर्णपणे होऊयात.

तुम्हाला एखादं शिखर गाठायचं असेल, तर तिथे 2 मार्गांनी जाऊ शकता: एकतर तुम्ही शून्य होऊन जा किंवा अमर्याद व्हा. हे दोन एकमेकांपासून भिन्न नाहीत. निःस्वार्थी होतांना तुम्ही खाली येता. स्वतःला 10 वरून 5 वर आणता, पण स्वतःला पूर्णपणे मिटवू शकत नाही.

शुन्य की अमार्याद - एकतर तुम्ही शून्य होऊन जा किंवा अमर्याद व्हा! भक्तीचा मार्ग आपल्याला शून्याकडे नेतो. तुम्ही शरण जाता आणि तुमचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व राहत नाही. तुम्हाला असं जमल्यास उत्तम. किंवा तुम्ही सर्व काही स्वतःमध्ये सामावून घेता आणि सर्वव्यापी होता. हेही जमल्यास उचित आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलू लागता, तिथे वेगळं अस्तित्व निर्माण होतं, आणि म्हणून शून्यात विलीन होणं कठीण होऊन बसतं. यासाठी तुम्ही अमर्याद होणं उत्तम. तो तुमच्यासाठी जास्त सोपा मार्ग आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com