समस्त जीवसृष्टीच्या कल्याणाचे धोरण

सद्गुरुंचा संदेश
समस्त जीवसृष्टीच्या कल्याणाचे धोरण
sadhguru jaggi vasudev

आज आपण ज्या प्रकारच्या आर्थिक संरचना निर्माण केल्या आहेत यावर तुम्ही जर नजर टाकलीत, तर त्या अत्यंत अवास्तव आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही एक आदर्श अर्थव्यवस्था म्हणून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले, कारण तो समाज या पृथ्वीवरील एक सर्वात श्रीमंत समाजापैकी एक आहे, आणि तुम्ही त्या स्तरावरील आर्थिक सोई सुविधा या पृथ्वीवरील 7.2 अब्ज लोकांना पुरवली, तर माझ्या मते 30 ते 40 वर्षांमध्येच आपण नामशेष होऊ. आपण ज्या प्रकारे अर्थव्यवस्था चालवतो आहे, तिला चालना देण्याचे मार्ग आपण नव्याने शोधणे आवश्यक आहे ज्यामुळे समृद्धी, संपन्नता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत ती स्वतःचाच विनाश करणार नाही.

विकास आणि समृद्धी म्हणजे काय हे आपण पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक आहे. समृद्धी म्हणजे केवळ जे आहे त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा अधिक, त्याही पेक्षा अधिक असे

नाही. आपल्याला जगण्यासाठी केवळ एकच ग्रह उपलब्ध आहे. आपण निरंतरपणे अधिक आणि अधिक पाहिजे याच्या मागे लागू शकत नाही. आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या संसाधनामधूनच प्रत्येकाचे कल्याण करण्याचे मार्ग समाजाने शोधून काढणे आवश्यक आहे.

सर्वांसाठी एकच उपाय नाही

दुर्दैवाने समाज धोरणे, व्यवस्था प्रणाली आणि विचारसरणी यांच्याशी ओळखी बांधतात आणि मानवाच्या कल्याणसाठीच ह्या सार्‍या गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या याचा आपल्याला विसर पडतो. कोणत्याही सरकारसाठी, त्या देशाच्या नागरिकांचे कल्याण हे प्रमुख धोरण असावे. इतर सर्व धोरणे त्याला पूरक असावीत. ते साध्य करण्यासाठी, आपण जे काही करतो आहोत ते सतत विकसित करणे आवश्यक आहे. परिस्थिती बदलेल त्यानुसार त्यात दररोज बदल करणे सुद्धा गरजेचे होऊ शकते.

आशियामधील सर्वात मोठे दुखः म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये अनेक देशांनी पाश्चात्य देशांच्या समाजाचे त्यांना कसे घडविले याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे

पूर्वेकडील लोकांचे विचार, भावना आणि कार्य करण्याच्या चौकटीत बसलेले नाही, आणि त्यामुळे लोकांना भयंकर संघर्षाचा सामना करावा लागत आहे. अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत, आणि त्याची इतरत्र अमलात आणताना अनेक दुःख आणि संकटे ओढवून घेतली आहेत. हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे प्रश्न हा नाहीच ये मुळी. हा प्रश्न केवळ एखादी संस्कृती किंवा राष्ट्रासाठी काय सुसंगत असेल याचा आहे.

इतिहासात पहिल्यांदाच

आज, इतिहासात पहिल्यांदाच, एक मानवजात म्हणून, आपल्याकडे पृथ्वीवरील लोकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने, तंत्रज्ञान आणि क्षमता उपलब्ध आहे. सर्वसमावेशक मानवी चैतन्य या एकाच गोष्टीचा अभाव जाणवतो. प्रत्येक समाजाने अशा योग्य व्यक्ती निर्माण करणे आवश्यक आहे ज्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सर्वव्यापी दृष्टीकोण आहे. जर आपल्याला सहृदय आणि करुणेने भरलेली अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल, जेथे प्रत्येक मनुष्याल आपले कार्य कौशल्य संघर्षाविणे वापरता येऊ शकते, तर हे फार महत्वाचे आहे सामाजिक धोरणे ही अधिकाधिक सर्वसमावेशकतेच्या जाणीवेतून आली पाहिजेत. तर मुख्यतः प्रत्येक मनुष्याने या पृथ्वीवरील सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष केन्द्रित करणे आवश्यक आहे. हेच मूलभूत धोरण असले पाहिजे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com