Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधब्रह्मांड निर्मिती अपघाती आहे की रचली गेली आहे?

ब्रह्मांड निर्मिती अपघाती आहे की रचली गेली आहे?

प्रश्न – सदगुरू, मी एक अभिनेता आणि लेखक आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे, की विश्वाची निर्मिती अपघाताने झालेली आहे की त्यामागे काही उद्देश आहे? आपण त्यामधले खेळाडू आहोत का आपल्याला खेळवले जात आहे आणि आपल्यावर नजर ठेवली जात आहे?

सद्गुरू – मला तुमचा प्रश्न जरा सोपा करू द्या. मी माझे जीवन ज्या पद्धतीने जगतो ते ठरवायचं स्वातंत्र्य मला आहे, की ते इतर कुठून नियंत्रित होतं आहे? मला खेळवले जात आहे, का मी माझ्या मनासारखे खेळू शकतो? तुमचं जीवन हे तुमचंच कर्म आहेफ अशी शिकवण देणारी या पृथ्वीतलावरील ही एकमेव संस्कृती आहे. तुमचे जीवन घडवणे तुमच्याच हातात आहे. जगण्याचा हा एक उत्स्फूर्त क्रियाशील मार्ग आहे. परंतु दुर्दैवाने, हा क्रियाशील दृष्टीकोन, आपण त्याकडे – अरे बापरे, कर्म? अशा नजरेने पाहून बदलवूनच टाकलेले आहे – जणू

- Advertisement -

काही तुमच्या जीवनातील घडामोडी दुसरीकडून नियंत्रित केल्या जात आहेत.

कर्म म्हणजे कृती – तुमची कृती. या क्षणी तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही विविध प्रकारच्या कृती करीत आहात. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जाप्रधान कृती; या सर्व कृती दिवसाचे चोवीस तास घडत आहेत. तुम्ही जागृत असाल, जागे असाल, किंवा झोपलेले असाल – तुम्ही चार प्रकारच्या कृती करीत असता. सकाळी झोपून उठल्यापासून ते आत्ता या क्षणापर्यंत, तुम्ही शारीरिक कृती, मानसिक कृती, भावनिक कृती, आणि उर्जाप्रधान कृती केल्या आहेत. त्यापैकी किती कृती तुमच्या मते जागरूकतेने झालेल्या आहेत? बहुतांश लोकांमध्ये त्या एक टक्क्याहूनही कमी आहेत! नव्याण्णव टक्क्यांपेक्षा सुद्धा अधिक कृती अजाणतेपणे घडत आहेत. जेव्हा तुम्ही नव्याण्णव टक्के कृती अजाणतेपणे करता, तेव्हा साहजिकच तुम्हाला असे वाटते, की कोणीतरी तुमच्याकडून त्या करवून घेत आहे.

आपण जेव्हा चेतनेविषयी बोलत असतो, तेव्हा त्याचा अर्थ अधिक सचेत होणे. जर समजा, तुमची जागरूकतेने केलेली कृती एक टक्क्यापेक्षा कमी असण्यापेक्षा, आपण असे म्हणू की तुम्ही त्याप्रती दोन किंवा पाच टक्के जागृत झालेले आहात. आणि अचानकपणे तुम्हाला अत्यंत सक्षम, समर्थ झाल्यासारखे वाटेल, हे केवळ तुमच्यातून काय येत आहे आणि तुमच्याजवळ काय काय येत आहे याप्रती जरा अधिक सजग झाल्याने, आणि तुमच्या भोवताली असलेल्या लोकांना तुम्ही एक महान व्यक्ती आहात असं वाटायला लागतं. मग तुम्ही पहाल: ही सगळी तुमचीच करणी आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो तुमच कर्म, आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुमचं जीवन ही तुमचीच करणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या