तुमच्याबद्दल इतर लोकं काय बोलतात ही चिंता कशी थांबवावी?

सद्गुरुंचा संदेश
तुमच्याबद्दल इतर लोकं काय बोलतात ही चिंता कशी थांबवावी?
Hindustan Times

प्रश्न- इतर लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला फार चिंता असते, आणि मग मला त्याचे दडपण येते. काही वेळेस माझ्या पाठीमागे बोलल्या जाणार्‍या गोष्टी मला समजतात. जीवन परिपूर्ण नसते असे आपण म्हटले आहे, परंतु जीवनातील काही गोष्टींना तोंड देण्यासाठी आणि माझे काही लोकांसोबत असलेले संबंध सुधारण्यासाठी माझा आत्मविश्वास कसा वाढेल याविषयी कृपया आपण मला मार्गदर्शन कराल का?

सद्गुरु - आत्ता, तुमच्या पाठीमागे काय सुरू आहे हे तुम्हाला माहिती नाहीये, होय ना? का घडत असेल याची तुम्ही केवळ कल्पनाच करू शकता. कल्पना करणे थांबवा. जर कोणी तुमच्याबद्दल काहीतरी विचार करत असेल, तर ती तुमची समस्या नाहीये. त्यांचे विचार ही त्यांची समस्या आहे. त्यांना हवा तो विचार करू द्या. तुम्हाला असे वाटते आहे का की तुम्ही खूपच महत्त्वाची व्यक्ती आहात ज्यामुळे प्रत्येकजण सतत तुमच्याबद्दलच विचार करत बसेल? नाही. तर मग सोडून द्या.

ते काय विचार करत असतील याचा विचार तुम्ही का करत आहात? ते हाताळायचा प्रयत्न करू नका. केवळ तुम्हाला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करा. कोणीतरी सतत तुमच्याबद्दल विचार करत आहे ही केवळ तुमची कल्पना आहे. बहुतांश लोक त्यांच्या स्वतःच्याच समस्यांमध्ये मग्न असतात. आपल्याबद्दल कोणीतरी विचार करत रहाणे आवश्यक नाही. आणि ते तसे करत नाहीयेत म्हणून आपण खरे म्हणजे आनंदी व्हायला पाहिजे, कारण त्याचा अर्थ तुम्ही मुक्त आहात.

इतर लोकं काय विचार करतात, त्यावर तुम्ही काहीही उपाय करू शकत नाही. कदाचित त्यांच्याकडे विचार करण्यासारख्या अधिक चांगल्या गोष्टी नसतील, म्हणून ते तुमच्याबद्दल विचार करतात. त्यांच्या मानसिक समस्या त्यांच्याकडेच ठेवा. ते कोणताही मूर्खपणाचा विचार करू शकतात. तुम्ही कोण आहात यावर त्याचा परिणाम का करून घेता? आपल्याबद्दल इतर कोणीतरी काय विचार करत असेल यामुळे आपण जर काळजी करत बसलो, तर आपण आपल्या जीवनात काहीही साध्य करणार नाही. आपल्याला काय साध्य करायचे आहे यासाठी आपल्याला प्रत्येकाची अनुमती कधीही मिळणार नाही. म्हणून फक्त तुम्हाला काय साध्य करायचे आहे यावर लक्ष केन्द्रित करा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com