लोकांची नकारात्मक मते कशी हाताळावीत?

सद्गुरुंचा संदेश
लोकांची नकारात्मक मते कशी हाताळावीत?

मिताली राज : नमस्कार सद्गुरूजी. माझ्या विरोधात दररोज प्रदर्शित केल्या जाणार्‍या मतांकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती कशी प्राप्त करायची हे मला जाणून घ्यायचे आहे.

सद्गुरु : नमस्कार, मिताली. लोकांची प्रत्येक गोष्टींवर मते असतात, पण त्यामुळे तुला किंवा इतर कोणाला का फरक पडावा? आपण जे काही करत आहोत त्याबद्दल आपल्या मनात स्पष्टता नसेल तरच आपल्या दृष्टीने त्यांच्या मतांना किंमत आहे. इतरांच्या मतांविरुद्ध लढण्यापेक्षा आपण जे करत आहोत ते का करत आहोत याबद्दल स्पष्टता निर्माण करणे सर्वात चांगले आहे. आपल्यात जर ही स्पष्टता निर्माण झाली, मग इतर लोकांच्या मतांना काहीही किंमत उरणार नाही.

लोकांची आपल्याबद्दल नेहमीच काही ना काही मते असतीलच, आणि त्यांचा तो हक्क आहे. कानडी संत अक्का महादेवी म्हणतात, तुम्ही जंगल डोंगरात घरे बांधलीत, आणि आता तुम्हाला वन्य पशुंची भीती वाटते. तुम्ही तेथे जायलाच नको होते. तुम्ही बाजारपेठेत घर बांधलेत, आणि तुम्हाला बाजारातील आवाजांची भीती वाटते. तर तुमच्यासाठी ती योग्य जागा नाही. आणि आता तुम्ही समाजात रहात आहात, आणि लोकं काय म्हणतील त्याला तुम्ही घाबरत आहात. सामाजिक जीवनाचा हा एक भागच आहे. कोणी न कोणीतरी सतत काही ना काहीतरी म्हणत राहतीलच. आज सोशल मिडियामुळे त्याला व्यापक प्रसिद्धी मिळते, परंतु लोक नेहेमीच मते बाळगत आलेली आहेत.

एके केाळी, तुम्हाला केवळ तीन ते चार लोकांच्या मतांचा विचार करावा लागत असे. आणि आज तुम्हाला पन्नास लाख लोकांच्या मतांना सामोरे जावे लागते आहे कारण ते सर्वत्र पसरलेले आहेत आपापली मते प्रदर्शित करत आहेत. पण ते ठीक आहे. त्यांना जे हवे ते मत मांडू द्या, परंतु आपण काय करतो आहोत आणि आपण ते का करतो आहोत यामध्ये आपल्या जीवनात संपूर्ण स्पष्टता आणणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला याबद्दल जर पूर्ण स्पष्टता असेल, तर लोकांची मते उठतील आणि ती बदलतील सुद्धा. मी असे ऐकले आहे की तू एक अतिशय चांगली फलंदाज आहेस. तू फक्त चेंडू चांगले टोलवत रहा. मग तू पाहशील, की प्रत्येकाची मते बदलतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com