Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधस्वतःच्याच मार्गात अडथळा बनू नका

स्वतःच्याच मार्गात अडथळा बनू नका

प्रश्न : जेव्हा गोष्टी खरोखर व्यवस्थित घडत असतात, नेमकं तेव्हाच माझी स्वतःचीच फसवणूक करण्याची प्रवृत्ती आहे. शांभवी महामुद्रा केल्याने मला यातून बाहेर पडण्यास मदत होईल का?

सद्गुरु : तुम्हाला तुमच्या स्वतःविरुद्ध खेळायला आवडते तर! खेळ खेळण्यासाठी आजूबाजूला पुष्कळ काही उपलब्ध आहे, तुम्हाला स्वतःसोबतच खेळ करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत असता, तेव्हा तो वेळ आपण स्वतःची देखभाल करण्यासाठी, स्वतःचे परिवर्तन आणि विकास करण्यासाठी असतो. तुम्हाला देण्यात आलेली शांभवी साधना ही काही विशिष्ट मूलभूत तयारीनंतरच देण्यात आलेली आहे ज्यामुळे आपण आपल्याकडे एक अविभाज्य व्यक्ती म्हणून पाहू शकतो.

- Advertisement -

अविभाज्य व्यक्ती म्हणजे, ज्याचे आणखी भाग करता येणार नाहीत अशी. ती व्यक्ती एकच असते, तुम्ही त्यातून आणखी दोन व्यक्ती निर्माण करू शकत नाही; पण लोक नेहेमी त्यातून दोन व्यक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात मग्न असतात. त्यांचा अहंकार, त्यांचा आत्मा, त्यांचे चैतन्य, आणि परम चैतन्य, अशा अनेक गोष्टीतून आपल्या वेगवेगळ्या ओळखी प्रस्थापित करण्यात मग्न असतात. लोक एकाच व्यक्तीत अनेक रुपे धारण करत असतात, जे सुरक्षित नाही. या व्यक्तीत एकुलती एकच व्यक्ती आहे – केवळ आपण.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी आणि ती म्हणजे ही एकच व्यक्ती आहे, यात इतर आणखी काही नाही, माझ्यात अनुभव म्हणून निर्माण होत असलेली प्रत्येक गोष्ट ही माझी करणी आहे. तुम्ही भाग घेतलेल्या ध्यान-योग कार्यक्रमांमध्ये तुम्हाला हे पुरेसे स्पष्टपणे समजावले गेले आहेे.

आपल्या देशात, आधीच्या पिढ्यांमध्ये हे माझे कर्म आहे असे लोकांकडून नेहमी ऐकायला मिळे. त्याचा अर्थ, ही माझीच करणी आहे. माझे जीवन ही माझीच करणी आहे, याला दुसरा कोणी जबाबदार नाही. इतर कोणी मला प्रभावित करू शकत नाही, केवळ मीच मला प्रभावित करतो आहे. हे अतिशय महत्त्वाचे आहे. हा एक घटक जर तुम्ही समजावून घेतला नाहीत, तर संपूर्ण आयुष्यभर तुम्ही स्वतःसोबतच हे खेळ खेळत रहाल.

तुम्हाला देण्यात आलेली साधना ही तुम्ही एक अविभाज्य व्यक्ती म्हणून तुम्हाला स्थापित करण्यासाठी, व्यक्तीगत स्थैर्य आणि बळकटी निर्माण करण्यासाठी दिली गेली आहे, जेणेकरून तुमच्या आत दोन नव्हे; केवळ एकाच व्यक्तीचे अस्तित्व असेल. एकदा असे घडले, की मनाचे हे खेळ कमी होतील. सुरूवातीला तुम्ही जरा कटिबद्ध होऊन ही साधना केली पाहिजे, काहीही झाले तरी पुढील संपूर्ण एक वर्ष तुम्ही ही साधना कराल. आपल्याला त्याचा काही फायदा होवो किंवा न होवो, तुम्ही ती करत रहा. प्रत्येक दिवशी, काय घडते आहे? हे झाले का, ते झाले का? याकडे बघत बसू नका. केवळ साधना करत रहा. मी कुठल्याही वस्तूची जाहिरात करत नाहीये. मी सांगतो आहे तेवढे करा, म्हणजे तुमचं काम झालं.

- Advertisment -

ताज्या बातम्या