Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधतुलना स्वतःची इतरांसोबत

तुलना स्वतःची इतरांसोबत

प्रश्न – आपल्या आयुष्यात सतत आपली तुलना इतरांशी केली जाते. अशा तुलना का केल्या जातात?

सद्गुरु- जीवनात अशी काही क्षेत्र आहेत जिथे आपली शिकण्याची संपूर्ण प्रक्रिया भूतकाळात घडून गेलेल्या अनेक गोष्टींमुळेच अस्तित्वात आहे. तुम्ही BC लिहू शकता कारण तुमच्या आधीदेखील कोणीतरी BC लिहिले होते. तुम्ही आपणहून BC लिहिले नसते. म्हणून तुम्ही जे काही करू शकता ते फक्त तुमच्यातूनच बाहेर येतं असे नाही. तुम्ही काय करू शकता हे मानवतेच्या अनुभवातून येत आहे. BC लिहिणे हे माणसांच्या हजारो पिढ्यांच्या भाषेच्या अनुभवातून पुढे येत आहे.

- Advertisement -

तुम्ही करू शकत असलेली इतर प्रत्येक गोष्ट केवळ तुमच्या कर्तृत्वाने तुमच्यातून येते असे नाही; तर तुमच्यासाठी प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळे ती येते. अनिवार्यपणे, तुलना आवश्यक बनते कारण जर तुलनाच नसेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कदाचित काहीतरी सर्वसाधारण कार्य करत राहिला असता पण तुम्हाला मात्र वाटले असते की तुम्ही काहीतरी महान कार्य करत आहात.

तुलना होणे अगदी योग्य आहे, पण ती तुमची नसून तुम्ही काय करू शकता याविषयी असायली हवी. ती केवळ तुमच्या कृतींची व्हावी. कोणत्याही कार्यात आपल्या सर्वांची क्षमता, कार्य कुशलता वेगवेगळी असते. म्हणून तुलना करण्यासाठी योग्य मापदंड नसतील, तर तुम्ही तुमच्या कार्यात सुधारणा करू शकत नाही; आणि प्रत्येक दिवशी आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करून त्यात सुधारणा करायला लागतील.

फक्त जर एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक चांगले काम करत आहे हे जर तुम्हाला आवडत नसेल, तर ही तुलना तुमच्यासाठी एक समस्या असेल. एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक चांगले काम करत आहे याचा तुम्हाला त्रास वाटू नये. मी कायमच माझ्यापेक्षा अधिक चांगले काम करणार्‍या व्यक्तीच्या शोधात असतो. जर ते एखादे काम माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकत असतील, तर माझे जीवन सोपे, अधिक चांगले आणि अधिक सुंदर बनते. पण तुमच्यापेक्षा अधिक चांगले कोणालाही करता येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही जर एक जुलमी नेता आहात. हा जगण्याचा एक अगदी मूर्ख मार्ग आहे. हा मूर्खपणा तुमच्यात यायचे कारण म्हणजे तुम्ही सतत एखाद्या व्यक्तीचे मोजमाप करत असता. मी त्याच्यापेक्षा मोठा आहे का? मी त्याच्यापेक्षा लहान आहे का?- कारण तुमचा संपूर्ण प्रयत्न नेहमी सगळ्यांच्या वर जाऊन बसण्याचा असतो.

तुमच्यात स्वतःबद्दल एक भयंकर असुरक्षिततेची भावना असल्यानेच ही अडचण निर्माण होते. इतर कोणापेक्षा थोडे अधिक चांगले दिसण्यातच तुमचे आयुष्य गुंतलेले असते. हे एक व्यर्थ, वायफळ आयुष्य आहे कारण बहुदा तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामधील पूर्ण क्षमता, कौशल्यांचा वापर करून घेऊ शकणार नाही. तुम्ही यशस्वी झाला नाही दुःखी व्हाल, आणि यशस्वी झालात तरीसुद्धा दुःखी व्हाल. कारण सतत कुणाच्यातरी पुढे राहण्याचा प्रयत्न करणे हा जगण्याचा एक अगदी दयनीय मार्ग आहे. सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे आयुष्य अनुभवण्याचा मार्ग निश्चित करणे. तुम्ही जर तुमच्या स्वाभाविक स्वरूपानेच आनंदी असाल, तर, तुम्ही जे काही करत असलात, तरी तुम्ही तुमच्या आत अशा लाचार अवस्था अनुभवास येणार नाहीत. तुम्ही कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकाल; तुम्ही तुमचे सर्वोच्च प्रयत्न पणास लावाल कारण तुम्ही स्वाभाविकपणेच आनंदी आहात. तुम्ही अगदी शेवटच्या क्रमांकावर आलात, तरी ती एक सुंदर गोष्ट असेल कारण तुम्ही तुमचे सर्वोत्तम दिलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या