पूर्णत्वाची प्राप्ती

सद्गुरुंचा संदेश
पूर्णत्वाची प्राप्ती

कोणत्याही कृतीमुळे परिपूर्णता साध्य करता येत नाही. तुम्ही केलेल्या एखाद्या कृतीमुळे परिपूर्णता लाभणार नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही एकामागून एक कोणती ना कोणती कृती का करत असता? ती पुर्णत्वाकडे जाणारी वाटचाल आहे. जेंव्हा तुम्ही अतिरिक्त कृती करणार्‍या लोकांना विचारता की, ते तसे का करत आहेत, तेव्हा ते उत्तर देतात, काय करणार?

उदरनिर्वाह, पत्नी, मुले या सवाची काळजी कोण घेईल? पण सत्य हे आहे, तुम्ही त्याच्या सर्व गरजा भागवल्या तरी, ती व्यक्ती एक दिवससुद्धा शांतपणे बसू शकणार नाही. तीन तास सुद्धा ती व्यक्ती गप्प बसू शकणार नाही! ती काही ना काहीतरी करणारच. त्याचे कारण असे, की तुमच्या आंतरिक स्वरूपाने अजून परिपूर्णता प्राप्त केली नाही आणि तुम्ही कृतींद्वारे तसे करण्याचा प्रयत्न करत आहात.

तुमच्या हातून घडणारी कृती, तुमचे अन्न किंवा तुमची सुखे या करता घडत नसून; त्या सर्व परिपूर्णतेच्या शोधात घडत आहेत. हे जाणीवपूर्वक घडले असेल किंवा अजाणतेपणे घडले असेल, पण त्या कृती अमर्याद होण्याचा शोध सूचित करतात.

जर तुमच्या आंतरिक स्वरूपात पूर्णत्व असेल, तरच तुमचे आयुष्य परिपूर्णता प्राप्त करू शकेल. जर तुमच्यात, तुमच्या आंतरिक स्वरूपाने पूर्णत्व प्राप्त केले असेल, तर तुम्हाला कोणत्याही बाह्य कृतीची आवश्यकता भासणार नाही. जर बाह्य परिस्थितीने काही कृतीची मागणी केली, तर तुम्ही ती आनंदाने करू शकता. तसे करण्याची जर आवश्यकता नसेल, तर तुम्ही शांतपणे डोळे मिटून बसू शकता.

जेव्हा एखादी व्यक्ती अशा अवस्थेला जाऊन पोहोचते, जिथे तिला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता भासत नाही, तेंव्हा ती व्यक्ती असीम, अमर्याद झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती अजिबातच काही काम करत नाही. जर बाह्य परिस्थितीची तशी मागणी असेल, तर ती चोवीस तास सुद्धा काम करेल. परंतु आंतरिक पूर्णतेसाठी तिला कृतीची आवश्यकता नाही. ती कृति करण्यासाठी बांधील नाही. कृतीरहित सुद्धा ती व्यक्ती परिपूर्ण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com