Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधपती-पत्नी आणि योग-साधना परस्परविरोध आहे का?

पती-पत्नी आणि योग-साधना परस्परविरोध आहे का?

प्रश्न : तुम्ही करणारा योगाभ्यास, ध्यानसाधनेशी तुमचा जोडीदार सहमत नसेल तर काय करावं आणि याचं महत्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

सद्गुरू : तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेत जोडीदाराचं सहकार्य हवं असेल तर, तुम्ही तुमची अध्यात्मिक प्रक्रिया त्याच्यासाठी फायदेशीर बनवली पाहिजे. योगाभ्यासामुळे तुम्ही किती उत्साही, आनंदी आणि अदभूत झालात हे त्याने पाहिलं पाहिजे. मग तो म्हणेल, चल, ध्यान करू या! तू आज ध्यानधारणा केलीस का? परंतु, तुमची अध्यात्माची संकल्पना जर तुमच्या कुटुंबाला असं

- Advertisement -

सांगण्याची असेल की, मी आजपासून जेवण बनवणार नाही, मी तुम्हाला फक्त शेंगदाणे खायला देणार. भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये सर्व काही असतं, असं मला ईशायोगामध्ये सांगण्यात आलं आहे तर मात्र हे लागू पडणार नाही.

तुमच्या अध्यात्माचा फायदा जर तुमच्या पती/पत्नीला झाला, तर तो/ती तुम्हाला रोज विचारेल, आज तू तुझी सकाळची क्रिया केलीस का? ही तुमची साधना असली पाहिजे. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की, तुमची योग साधना त्याच्या कामी येत आहे, आणि तो ज्याला ओळखायचा त्याहून कितीतरी अदभूत व्यक्ती तुम्ही आज बनला आहात. मग तो खात्रीने तुम्ही तुमच्या सकाळच्या क्रिया करत आहात का याकडे लक्ष देईल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं कल्याण साधलं जात आहे.

पण अशीही काही कुटुंबं आहेत, जिथं कुणी 15 मिनिटं जी ध्यान करत असेल, तर येतील आणि त्यांना हलवत म्हणतील, तू डोळे बंद करून का बसला आहेस? तुम्ही जर अशा परिस्थितीत सापडला असाल, जिथे प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध होत आहे, जिथे सर्वांना प्रत्येक लहान सहन गोष्टींबद्दल असुरक्षितता वाटते; मग तुम्हाला कुटुंब आहे, असं मला वाटत नाही. क्षमा करा, मी फार निर्दयी आहे, पण ह्याचा सामना करूया. कुटुंब म्हणजे 2 किंवा 4 लोक, जे एकमेकांच्या कल्याणासाठी झटत आहेत. त्यांना एकमेकांविषयी आस्था आहे. पण जर तिथं काहीच काळजी नसेल, तर मग तुम्हाला खरंच कुटुंब नाही. आणि ह्या गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची हीच वेळ आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या