Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधभारतीय संस्कृतीची सत्यशोधक वृत्ती

भारतीय संस्कृतीची सत्यशोधक वृत्ती

अगदी प्राचीन काळापासून, जगाच्या बहुतेक ठिकाणी, जेव्हा त्यावेळच्या अस्तित्त्वात असलेल्या संघटित धर्माव्यतिरिक्त कोणीही काही बोलले तेव्हा पहिली गोष्ट लोक म्हणत त्याला ‘त्याला ठार मारा.‘ उदाहरणार्थ, येशूने फार क्रांतिकारक असं काहीही केले नाही. त्यांनी मंदिर पाडण्याची, देवतांची जागा घेण्याविषयी किंवा नवीन धर्माबद्दल बोलले नाहीत. त्यांनी फक्त मंदिरातून धंदा काढून टाकण्याविषयी बोलले. आणि त्यासाठी त्याच्याबरोबर अशा भयंकर गोष्टी केल्या.

मग ते सोक्रेटीस असो, मन्सूर किंवा येशू – हे प्रसिद्ध लोक आहेत – लाखो इतर अज्ञात लोक जे जगाला माहिती नव्हते त्यांना सुद्धा याच कारणास्तव ठार मारण्यात आले. जगाच्या त्या भागात, बहुतेक आत्मज्ञानी माणसं मोठ्याने बोलून आणि मरून जाण्यापेक्षा, गुपचूप आपलं कार्य करण्याइतके शहाणे होते. असे असूनही, मी म्हणेन की त्यांच्यापैकी बरेच जण ठार मारले गेले.

- Advertisement -

संघटित धर्मासाठी धोकादायक मानले जाणारे असे काही गुण आणि वृत्तीं निदर्शनास आल्यामुळे युरोपमध्ये पुष्कळ स्त्रियांना सार्वजनिक चौकात जाळले गेले. पण भारतीय संस्कृतीत येशूच्या पाचशे वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी सर्व हिंदू देवतांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारला होता. पण त्याच्यावर दगडफेक करण्याचा किंवा त्याला वधस्तंभावर खिळण्याचा विचार कुणीही केला नाही. अशा गोष्टी आपल्या देशात कधीच घडल्या नाहीत.

लोकांनी गौतम बुद्धांना चर्चा, संवादांसाठी बोलावले आणि ते बसून कित्येक महिने वादविवाद करत. जेव्हा ते अशा संवाद चर्चांमध्ये अयशस्वी झाले, तेव्हा ते त्याचे शिष्य झाले. कारण एका साधकाचा शोधच सत्याचा आहे म्हणूनच लोक खाली बसून वाद घालू लागले की जे काही त्यांना माहित आहे ते सत्य आहे की जे समोरच्या व्यक्तीला माहित आहे ते सत्य. जर त्याचे सत्य तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान असेल तर तुम्ही त्याचाच एक भाग व्हाल. जर तुमचे सत्य त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान असेल तर ते तुमच्याशी एकजूट होतील. हा एक वेगळाच शोध आहे. लोक सत्याचा उलगडा होण्यासाठी शोधत होते. ते फक्त विश्वास ठेवत नव्हते आणि त्यांचा विश्वास बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नव्हते.

या संस्कृतीत, आम्ही एक अशी प्रणाली स्थापित केली जिथून अध्यात्मिक मार्गावरील कोणीही जे काही बोलेल आपण त्याच्याशी वाद घालू शकू आणि चर्चा करू शकू परंतु त्याला ठार मारण्याचा प्रश्न उद्भवला नाही. यामुळे ह्या देशात अध्यात्मिक प्रक्रिया वेगवेगळ्या, असंख्य मार्गांनी विकसित झाल्या. जीवनाचा प्रत्येक पैलू एक मार्ग बनविला गेला आणि असे लाखो वेगवेगळे मार्ग विकसित झाले. या संस्कृतीने तो सत्याचा शोध विकसित केला.

प्रत्येकजण शोधतो आहे. असा एक काळ होता जेव्हा, संपूर्ण देश आध्यात्मिक होता. या देशात आणि या संस्कृतीत जन्मलेल्या प्रत्येकासाठी एकच उद्दीष्ट होतं, आणि ते म्हणजे मुक्ती. तुमचे कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमचे जे काही आहे, ते सर्व फक्त दुय्यम होते. आज हळूहळू एम म्हणजे मुक्ति नाही तर एमटीव्ही बनली आहे, पण दोन पिढ्यांपूर्वी प्रत्येक पुरुषाचे मुख्य लक्ष्य परम कल्याण होते. संसारिक कल्याण ही काही फार मोठी गोष्ट मानली जात नव्हती.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या