आध्यात्म मार्गाने झपाटले जाणे

सद्गुरुंचा संदेश
आध्यात्म मार्गाने झपाटले जाणे

एकदा तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की तुम्ही त्याप्रती फक्त तीव्र इच्छा बाळगून भागणार नाही, तुम्ही त्याच्यापासून झपाटले गेले पाहिजे. तुम्हाला तुमच्यामधील जीवन चैतन्याचे शिखर गाठायचे असेल, तर तुमच्यापाशी असलेली सर्व ऊर्जा एकाच दिशेने केन्द्रित करणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही.

तुमच्याजवळ असणारी सर्व ऊर्जा जरी तुम्ही एकाच दिशेने केन्द्रित केली, तरीसुद्धा कदाचित ती पुरेशी पडणार नाही. आणि म्हणूनच गुरु तुमची ती पोकळी; गरजेनुसार भरून काढतात. पण तुम्हाला तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करायची असेल, तर ते नक्कीच व्यर्थ ठरेल.

म्हणून एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की केवळ त्यात तीव्र होऊ नका, तर त्यापासून झपाटून जा. तुमच्यासाठी आणखी दुसरं काहीही नाही. आणि मग इतर सर्वकाही तुम्हाला तेथपर्यंत पोचविण्यासाठी आहे. केवळ जेव्हा असं होतं, तेंव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी काहीसा महत्वाचा बनतो.

वास्तविकता जर अशी नसेल, अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक दुय्यम दर्जाचा छंद असेल, जणू एक प्रकारचं आध्यात्मिक मनोरंजन - कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन शोधत असतात आणि काही लोक अध्यात्मिक मनोरंजनात वेळ घालवतात - पण तरीसुद्धा हे तुमचं निवड स्वातंत्र्य आहे. परंतु तुम्हाला ज्ञानप्राप्तीची खरीखुरी आस असेल, तेंव्हा तुमचे संपूर्ण अस्तित्व फक्त एकाच दिशेने, एकाग्रतेने समर्पित असणे आवश्यक आहे. तुम्ही त्याने पूर्णपणे झपाटले गेले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अवास्तव बनावं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुटुंब सांभाळू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची सामाजिक जबाबदारी पार पाडू शकत नाही. यांचासुद्धा वापर तुमच्यासाठी एक आध्यात्मिक प्रक्रिया म्हणून करा.

जेंव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उचलत असलेले प्रत्येक पाऊल, तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक श्वास एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते, तेंव्हा आयुष्यात कोणाताच संघर्ष उरणार नाही. जेंव्हा तुम्ही असे म्हणता, हा माझा आध्यात्मिक मार्ग आहे, ते माझे कुटुंब आहे, तो माझा व्यवसाय आहे, तेंव्हा संघर्ष निर्माण होतो. पण जर तुम्ही ह्या उद्देश्याने वावरता, की मी जर काही खातो, तर ते केवळ सत्य जाणण्यासाठी, मी काही पितो, ते केवळ सत्याच्या शोधासाठी, मी जर काही कार्य करतो तर ते केवळ सत्य उमजण्यासाठी. असं असेल तर मग संघर्ष उदभवणार नाही.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.