Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधशिक्षण आणि संपत्तीचे अध्यात्मात स्थान

शिक्षण आणि संपत्तीचे अध्यात्मात स्थान

दुर्दैवाने शिक्षण आणि संपत्ती खूप लोकांसाठी अध्यात्म मार्गात अडथळा बनू शकतात, हे काही शिक्षण आणि संपत्ती चुकीच्या गोष्टी आहेत म्हणून नाही तर हे केवळ तुमचा त्यांच्याप्रती असलेला दृष्टीकोन आणि नातं. जर तुमच्या अस्तित्वाची संपूर्ण ओळख केवळ तुमची शैक्षणिक पात्रता किंवा तुमच्या बँक बॅलन्सपर्यंतच सीमित असेल तर हो, शिक्षण आणि पैसा दोन्ही तुम्हाला बाधक ठरतील.

फक्त अध्यात्मिक प्रगतीतच नव्हे तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक संपन्नतेच्यादृष्टीने सुद्धा. जर तुम्ही त्यांच्याकडे प्राप्तीचे केवळ एक साधन म्हणून पाहिलंत तर काही हरकत नाही. मग त्या अडथळा ठरणार नाहीत. या उलट त्या गोष्टी अतिशय सहायक ठरू शकतात कारण अनेकप्रकारे त्या गोष्टी तुमचं आयुष्य सुकर करतात आणि तुम्हाला मुक्त ठेवतात. त्या गोष्टींमुळे तुम्ही अधिक समजूतदार बनता आणि त्या पुष्कळ शक्यता निर्माण करतात.

- Advertisement -

शिक्षण हे मूलतः तुमच्या मनाच्या मशागतीसाठी आहे, सततनवनवीन शक्यता आत्मसात करण्यासाठी आहे. शिक्षण ही एक अशी शक्यता आहे जी बाह्य जगातील नवनवीन संधींचं दालन तुमच्यासमोर उघडतं. धन दौलत, पैसा यांचा हेतूही हाच आहे. तुमच्याकडे पैसे, धन-दौलत असेल तर ते तुमच्या आत आणि तुमच्या सभोवतालच्या जगात पुष्कळ शक्यता निर्माण करू शकतात.

जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला एखाद्या दिवशी कामाला जावंसं वाटत नसेल तर तुम्ही घरीच बसून ध्यान करू शकता. पण जर तुमची परिस्थिती अशी आहे की उदरनिर्वाहासाठी तुम्हाला दररोज, न चुकता काम करणं भाग असेल तर ही शक्यता तुमच्या नशिबी असणार नाही. जरी तुमची ध्यान करण्याची इच्छा असेल तरीही तुमची पोटाची भूक तुम्हाला गप्प बसू देणार नाही.

तर मग, शिक्षण आणि संपत्ती नवनवीन शक्यतांसाठी अडथळा आहेत का? होय! तसं पाहिलं तर कोणतीही गोष्ट अडसर होऊ शकते: शिक्षण, संपत्ती, सत्ता, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा. त्याचबरोबर कोणतीही गोष्ट एक प्राप्तीचे साधन सुद्धा होऊ शकते. तर शिक्षण किंवा संपत्ती तुम्हाला बंद किंवा खुले करत नाहीत, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या प्रकारचे नाते आणि ओळख बांधता यावर ते अवलंबून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या