योगमार्गात अन्नाचे महत्त्व

सद्गुरुंचा संदेश
योगमार्गात अन्नाचे महत्त्व

सामान्यतः योग मार्गावर असलेल्या व्यक्तींसाठी असे म्हटले जाते की, त्यांनी अन्नाचे केवळ फक्त चोवीस घास घेतले पाहिजेत. मी हे प्रत्येकाबाबत बोलत नाही, परंतु तुम्हाला दिवसभर झोप येते आहे असे वाटत असेल, तर फक्त चोवीस घासच अन्न घ्या म्हणजे अन्नाचे चोवीस मोठे घास. चोवीसच का? मी काही त्या आकड्यांच्या खेळाकडे वळणार नाही, परंतु त्यामागे एक वैज्ञानिक शास्त्र आहे. वेळेकडे पाहण्याच्या भारतीय पद्धतीनुसार, निमिशा नावाची काहीतरी एक गोष्ट आहे, जिचा चोवीस या आकड्याशी काहीतरी संबंध आहे. म्हणून तुम्ही अन्नाचे चोवीस घास घेणे उत्तम.

मूलभूतरित्या, आपण आपल्या ऊर्जेचे किती काळजीपूर्वक व्यवस्थापन करतो यावर आपली सतर्कता अवलंबून असते आणि तुम्हाला जर तुमच्या जीवनात ध्यानी व्हायचे असेल तर हे खुप महत्वाचे आहे. केवळ मनाचीच सतर्कता नाही, तर तुमच्या जीवन ऊर्जेची सतर्कता सुद्धा - म्हणजे तुमची ऊर्जा सतर्क आहे. ती उर्जा नेहमी सतर्क ठेवण्यासाठीच तर तुम्ही साधना करत आहात. त्या उर्जेला सहायक व्हावे म्हणून तुम्ही फक्त चोवीस घास अन्न ग्रहण करता. परंतु चोवीस घास अन्नग्रहण करायला लागणारा वेळ मात्र दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला संपूर्ण भोजन करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच लागायला हवा. त्यासाठी प्रत्येक घास तुम्ही चोवीस वेळा चावून खायला हवा. तो घास गिळण्यापूर्वी जणू पीठासारखा पेस्ट झाला पाहिजे. इतरांपेक्षा खायला तुम्हाला अधिक वेळ लागेल परंतु घास गिळण्यापूर्वीच तुमच्या अन्नाचे तोंडातच पूर्व पचन होण्यास सुरुवात झाली असेल. त्यामुळे तुम्हाला सुस्ती येणार नाही. पहाटे साडेतीन वाजताच तुम्हाला जाग येईल.

आपण ते अन्न जर व्यवस्थित चावून खाल्लेत, तर दीड किंवा दोन तासांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा भूक लागेल आणि अशा अवस्थेत असणे योग्यासाठी लाभदायक आहे. तुमचे पोट रिकामे आहे याचा अर्थ तुम्ही पुन्हा त्यामध्ये अन्न टाकलं पाहिजे असा नाही. फक्त पाणी पिलात तर पुरेसे आहे आणि तुम्ही सतर्क राहाल. तुम्ही खूप उत्साही, उर्जावान राहाल. तुमचे वजन घटणार नाही कारण तुमची शरीर प्रणाली तुम्ही खाल्लेले अन्न वाया घालवण्याऐवजी त्याचा वापर अधिक चांगल्या प्रकारे कसा करून घ्यावा हे शिकून घेईल. जगासाठी आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी, आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या सर्व प्रकारे ही खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर या पद्धतीने अन्नसेवन केलेत, तर कदाचित तुम्ही कधीही आजारी पडणार नाही.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com