स्वतःला जपणे थांबवा

सद्गुरुंचा संदेश
स्वतःला जपणे थांबवा

आजही, जगात 7.2 अब्ज लोकसंख्या असली तरीही, पृथ्वीवर अजूनही पुरेशी साधनं आहेत जर आपण शहाणपणाने जगायला शिकलो तर. पण ही शहाणपणाने जगण्याची समज अजून बहुतेक लोकांमध्ये आलेली नाही. जीवनाबद्दलची तशी संकुचित वृत्ती आणि विचार हे नेहेमीच होते पण आज ज्या प्रमाणात आणि ज्या क्षमतेने आपण गोष्टी साध्य करू शकतो त्यात अभूतपूर्व वाढ झाली आहे. आदिमानवांमध्ये सुद्धा, जो सर्वात बलवान असे तोच जास्तीत जास्त गोष्टी साठवण्याचा प्रयत्न करत असे. जरी त्याच्या गुहेत मांस सडले - कारण त्याच्याजवळ तेव्हा फ्रिज नव्हता - तरी काही फरक पडायचा नाही, तो इतरांपेक्षा जास्त गोळा करायचाच.

एकदा का तुम्ही अर्थव्यवस्थेबद्दल विचार केला आणि लोभी बनलात; की टंचाई ही तुमच्या मनात एक सर्वात मोठी गोष्ट बनते. आणि मग टंचाई ही एक मोठी गोष्ट बनली की स्वतःचा बचाव करणे महत्वाचे होऊन बसते. पण तुम्हाला हे कधीच कळले नाही की जीवन हे वाचवून ठेवणे शक्य नाही; ते फक्त वापरता येते. आणि जे काही तुम्ही वापरता किंवा इतरांशी वाटता तोच तुमचा गुण बनतो.

जर तुम्ही तुमचा आनंद जपून ठेवलात तर आयुष्याच्या शेवटी कोणीही ते हिशेबात धरणार नाही - तिने तिच्या आनंदाचा एकूणएक अंश जपून ठेवला. अगदी आनंदाने मरण पावली. नाही. उलट ते म्हणतील कार्टी, आयुष्यात साधं कधी हसलीसुद्धा नाही. पण जर तुम्ही तुमचा आनंद आणि तुमचं प्रेम रोज इतरांबरोबर वाटून टाकलत, तर लोक म्हणतील, अरे! त्या फारच आनंदी आणि प्रेमळ होत्या. जर तुम्ही ते जपून ठेवलंत तर तो काही तुमचा एक गुण बनणार नाही. जे तुम्ही जपून ठेवता तो कधीच तुमचा गुण होत नाही. जे काही तुम्ही इतरांबरोबर वाटता तोच तुमचा गुण बनतो.

निसर्गातील प्रत्येक गोष्ट, स्वतःला शक्य तितके आणि तिच्या संपूर्ण क्षमतेनीशी वाटून द्यायच्या प्रयत्नात आहे. फक्त मनुष्य प्राणीच आटोकाट जपून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण त्यांनी त्यांचा आनंद, त्यांचे प्रेम आणि त्यांच्यासाठी मौल्यवान असलेल्या सर्व गोष्टी जपून ठेवल्या आहेत, आणि म्हणून त्यांना नाना प्रकारच्या उठाठेवी आणि उधळपट्टी करावी लागते इतरांचे लक्ष वेधण्यासाठी. जर माणसं फक्त बसून पूर्णपणे आनंदी होऊ शकली असती तर त्यांनी त्यांच्या संध्याकाळच्या दारूचा किंवा व्हिस्कीचा विचार केला नसता. जर प्रत्येक क्षणी, ते; त्यांची खुशी, प्रेम आणि परमानंदाने ओथंबून वाहत असतील तर ते त्यांचा पेग, सेक्स किंवा अशा कशाची वाट पहात बसणार नाहीत? ते स्वाभाविकपणे छान असतील. असे विचार त्यांच्या मनात शिरणार देखील नाहीत.

हे जीवन जपून ठेवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. इतरत्र कुठे नव्हे, तर तुम्ही त्याला आत्ता, इथेच पूर्णतः बहरू द्यावे लागेल. म्हणून जीवनाचा सुगंध जपून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जे जपून ठेवतात त्यांचा दुर्गंध येईल. जे तो जगात उधळतात, ती सुवासिक माणसं बनतील.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. भारत सरकारतर्फे 2017 मध्ये ङ्गपद्मविभूषण ‘ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, जो एक असाधारण आणि प्रतिष्ठित सेवेसाठी, सर्वोच्च वार्षिक नागरी पुरस्कार आहे.

Related Stories

No stories found.