Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधनैसर्गिक आपत्ती ही संकटं नाहीत

नैसर्गिक आपत्ती ही संकटं नाहीत

प्रश्न : आध्यामिकता भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती रोखू शकली नाहीये.जर देव खरंच दयाळू आहे तर मग अशा आपत्ती का येतात?

सदगुरू : ज्वालामुखी, भूकंप आणि चक्री वादळं ही पृथ्वीच्या उत्क्रांती प्रक्रियेचा एक भाग आहेत. जसजशी पृथ्वी आपली पुनर्रचना करत वेगवेगळ्या अवस्थेत ती उत्क्रांत होत असते, असे परिणाम स्वाभाविक आहेत. भूकंप हा काही क्रूर नाहीये, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पृथ्वी जरा आपलं अंग मोकळं करतिये. समस्या ही आहे की मानवांनी आपले अर्धवट ज्ञान आणि जीवनाविषयीची ढोबळ समज यातून पृथ्वीवर लोकसंख्येची अनियंत्रीत आणि बेजबाबदार वाढ करून ठेवली आहे.

- Advertisement -

याचं कारण की, मानवाने रोगांचं, जीव वाचवण्याबद्दल आणि एकूण मानवी जीवनमान कसे वाढवता येते याबद्दल ोडं फार कळायला लागल्यामुळे आपण या भूमातेवर मोठं ओझं होऊन बसलो आहोत. आपण अद्भूत आहोत, पण संख्येने खूपच जास्त आहोत. आपण या धर्तीवरच्या इतर अनेक प्रकारच्या जीवांना लुप्त केले आहे आणि राहिलेल्या इतर प्राण्यांचे जीवन दुभर झाले आहे.

भूकंप ही काही देवाची करणी किंवा कुठल्या दुष्ट शक्तीचा शाप नाहीये. पृथ्वीच्या गर्भातील थरांची नैसर्गिक पुनर्चना होत असते. जर एवढ्या अवाढव्य प्रमाणात लोकसंख्या वाढली नसती तर कदाचित बहुतेक भूकंपांमध्ये जीवितहानी झाली नसती. परंतु, इतक्या प्रचंड संख्येने आपण या धरतीवर सर्वत्र पसरलो आहोत की पृथ्वीने थोडीशी जरी हालचाल केली की हजारो लोक मरतात.

या आपत्तीची प्रचंड भीषणता ही निसर्गामुळे नाही तर नैसर्गिक प्रक्रियांना जसे हाताळणे गरजेचे आहे तसे हाताळण्यात आपण असमर्थ आहोत. केवळ भूकंपांसारख्या आपत्तीच नैसर्गिक प्रक्रिया नाहीत तर प्रजनन सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आज आपण 740 कोटी लोक आहोत, तर साहजिकच, लहानसं जरी कंपन झालं तरी सुद्धा लोकं मरतील.

लोकसंख्या ही देवाची देण नाही. ती आपण निर्माण केली आहे. आपण ते मान्य केले पाहिजे. म्हणून जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात, तेव्हा आकाशाकडे बघायची गरज नाही. आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे आपण या जगाचं काय करत आहोत, या देशाचं आणि सर्वात महत्वाचं स्वतःशी काय करत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या